Skip to main content

नव्या फ्लूची लागण

लेखक मोहन यांनी गुरुवार, 24/09/2009 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो सावधान. वराह तापापेक्षाही भयंकर अशा नव्या ज्वराचे आगमन मिपावर झाल्याचे दिसून आले आहे. ह्या ज्वराची लागण झालेले रूग्ण भयकथा, भूतकथा प्रसवू लागले आहेत. अत्यंत निरागस मथळ्याच्या लेखात "भयानक" कथा दडलेली आढळते. सामान्य मिपाकर कुतूहलाने अशा मथळ्यांच्या कथांवर लेखकांवरच्या विश्वासाने "क्लिकतात" आणि हां हां म्हणता कथेतली भूते त्यांच्या मनाचा ताबा घेतात व सामान्य वाचक असामान्यत्वाला पोहोचून स्वत:च भयकथा प्रसवू लागतो. अशा रितीने ही साथ झपाट्याने पसरत आहे. ह्या ज्वरावर अजून पर्यंत तरी लस किंवा औषध निघालेले नाही. मिपा मालकांनाच लागण झाल्याने मिपा प्रशासन सैरभैर झाले आहे. ज.

सात ऑळींची गोष्ट

लेखक संतोषएकांडे यांनी गुरुवार, 24/09/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
कारगीलला युध्ध सूरु झाल्या मूळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द झाल्या. शहरातून सरहदीवर जाणार्‍या सैनिकांच्या अभिवादनाचा कार्यक्रम होता. देशाच्या रक्षकांच्या अभिवादनाला दूसरे रक्षक "रक्षामंत्री" येणार होते. दिल्या वेळा पेक्षा फक्त "तीन तास" लेट ते स्वतःच्या 'लिमोझीन' मधे आले. कार्यक्रम 'शॉर्ट' मधे आटोपुन ते निघून ही गेले. थोड्या वेळानी नातेवाइक-मित्रांचा निरोप घेवून सैनिक 'खडखड खटारा' ट्रक मधे बसून सरहदी कडे रवाना झाले. आज पर्यंत कळले नाही की, देशाचे खरे 'रक्षक' कोण....!

राज यांचे अभिनंदन

लेखक अ-मोल यांनी गुरुवार, 24/09/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम्स नाउ या वाहिनीला मुलाखत देताना आवर्जून मराठीच बोलून निर्भीड विचार मांडल्याबदृल राज ठाकरे यांचे अभिनंदन. मुलाखतीसाठी खालील दुवा पहा - http://www.timesnow.tv/videoshow/4328045.cms

मुळपुरूष .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 24/09/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल अनेक व्यावसायिक वृत्तीच्या शेतकर्‍यांनी पैसे कमावण्याचा एक छान मार्ग शोधुन काढला आहे. हुरड्याच्या दिवसात ते त्यांच्या शेतांवर शहरी लोकांसाठी हुरडा पार्ट्या आयोजीत करतात. दर डोइ १५०-२०० रुपये आकारुन तुम्ही यात सहभागी होवु शकता. शहराच्या प्रदुषीत वातावरणाला कंटाळलेल्या लोकांना एक बदल हवाच असतो. एक दिवस नेहेमीच्या रहाटगाडग्यापासुन दुर, मस्त निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे. विहीरीत मनसोक्त डुंबायचे. हुरडा, भुइमुगाच्या शेंगा दाबुन खायच्या. चुलीवरच्या भाकरी, झणझणीत वांग्याची भाजी बरोबर तव्यावरचा हिरव्या मिरच्यांचा खरडा.............

सागर किनारा

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 24/09/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो, पुण्यापासुन १५०-२०० कि मी पर्यंतच्या परीसरातील समुद्र किनारे आणि तिथली व्यवस्था (खाणे-पिणे समग्र) अशी माहीती मिळेल का? अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, हरी-हरेश्वर, मुरुड-जंजिरा, दापोली, मालवण, रत्नागिरी आदी भाग सोडुन, म्हणजे हे जगद्विख्यात किनारे बघुन झाले आहेत, इथे २-३ ट्रीप झाल्या आहेत. आता जरा हटके, जरा शांत असा किनारा हवा आहे. गावापासुन जरा लांब असला तरी चालेल, खाण्याची-रहाण्याची बरी व्यवस्था असली तर उत्तमच !! कोलाडची माहीती कळली होती, पण कोलाडला बीच आहे का?

व्यथा

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 24/09/2009 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा ------------------------------------ जरी वाटतो नवाच आहे ऋतु कालचा तसाच आहे.. प्रतिबिंबासही रोज वाटते मीही देखील खराच आहे.. रामासाठी सीता होणे खरा दोष हा तिचाच आहे.. इथे थांबलो घटकाभर मी प्रवास अजुनि बराच आहे.. किती भरावे सूख तरिहि अर्धा प्याला रिताच आहे.. मला नकोसा शेवट झाला किती कथांची व्यथाच आहे..! - योगेशु

इस्रोचे अभिनंदन

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 24/09/2009 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
इस्रोचे अभिनंदन काल ओशनसॅट-२ या दूरसंवेदन उपग्रहासह एकूण सात उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात पाठविलल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) अभिनंदन. सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण झाले. ओशनसॅट-२ उपग्रहाबरोबरच जर्मनीचे चार छोटे उपग्रह, तुर्कीचा एक व स्वित्र्झलडचा एक असे एकूण सहा उपग्रह अवकाशात एकाचवेळी सोडले गेले. एप्रिल २००८ मध्ये इस्रोने एकाचवेळी दहा उपग्रह एकाचवेळी सोडून एक जागतिक विक्रम केलेला आहे. इस्रोचे पुन्हा एकादा अभिनंदन! (सतत निगेटिव्ह बातम्या वाचाव्या ऐकाव्या लागतांना असल्या बातम्या म्हणजे एक 'सिल्व्हर लायनिंगच' आहे. )

टोटल रीकॉल - उर्फ इ-मेमरी रेव्होल्युशन

लेखक चित्रा यांनी गुरुवार, 24/09/2009 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचे असे होते का माहिती नाही, पण माझ्या बाबतीत कधीतरी असे होते की काहीतरी महत्त्वाचे आठवायचे असते, पण काही केल्या त्याक्षणी तरी आठवत नाही. मागून कधीतरी गरज नसताना आठवूनही जाते, पण त्याक्षणी जी माहिती हवी असते ती काही मिळत नाही. अशाच प्रसंगांमधून गेलेल्या दोन सॉफ्टवेअर संशोधकांनी समोर ठेवलेल्या पर्यायाबद्दल ऐकण्याचा प्रसंग आताच मागील काही दिवसांमध्ये आला. यांची नावे आहेत - गॉर्डन बेल आणि जिम गेमेल. हे दोघे मायक्रोसॉफ्टमध्ये कामाला आहेत. त्यांच्या संशोधनाची दिशा ही आपल्या (म्हणजे मानवी आयुष्याबाबतीत) अनेक मूलभूत असे प्रश्न उपस्थित करेल अशी वाटली.

सत्यकथा

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी गुरुवार, 24/09/2009 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो बंगला गूढच दिसतो. खूप वर्षांपासून कुतुहल होतं की तिथं राहणारे लोक नेमके कोण असतील. साधारणपणे चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा पुण्यात आजच्यासारखा पैशाचा पूर वाहात नव्हता, आयटी हब इ काहीच नव्हते, गुंठामंत्री नव्हते. टिप्पिकल पेन्शनर आणि विद्यार्थ्यांचे गाव होते ते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी नवीन कार घेऊन उंडारणारा 'त्या' बंगल्यातला फक्त पंधरा वर्षांचा मुलगा पाहून आम्ही सायकलवर दातार क्लासला जाणारे तोंडात बोट घालत असू. ज्याम हेवा वाटायचा. सालं काय नशीब आहे असं वाटायचं. त्या बंगल्यात क्वचितच वर्दळ दिसायची.