गोष्ट जरा नाजुक आहे. अडचणीची आहे. खासगीतली आहे. पण सांगणं मनोरंजक आहे. शेअरिंगनं दुःख हलकंच होणार आहे. मनावरचा ताण कमी होणार आहे. खटके कमी होण्याची संधी मिळणार आहे.
घरात भांड्याला भांडं लागण्याचे प्रसंग काही नवे नाहीत. नव्याची नवलाई संपल्यानंतर, कधी संपायच्या आधीच, तर कधी सुरूही व्हायच्या आधी घरात या वाक्युद्धाला सुरवात होते. चूक कोण, बरोबर कोण, याला अर्थ नसतो. भांडण्याची खुमखुमी जिरवणं महत्त्वाचं असतं. आपल्या भांडण्याच्या मुद्द्याला काही विशेष अर्थ नाही हे कळत असतं, पण आयत्या वेळी माघार घेणं परवडणारं नसतं. मग कधीतरी टिपलेली निरीक्षणांची हुकमी अस्त्रं बाहेर काढली जातात. टॉवेल जागेवर न ठेवणं, चहा पिण्याची पद्धत, कुठलाही मुद्दा मग वणवा पेटवणारी ठिणगी ठरू शकतो.
तुम्ही भांडता तुमच्या नवऱ्याशी/बायकोशी कचाकचा? काय काय असतात कारणं? "सीरिअस' भांडण किती दिवस/तास टिकतं? हे "शेअर' करावंसं वाटत असेल, तर त्यासाठी हा धागा. मागे तात्यांनी मिपाच्या सुना-जावयांची माहिती घेणारा एक धागा सुरू केला होता. आता हा त्यांच्या भांडणकौशल्याची माहिती जाणून घेण्यासाठीचा त्याच्या पुढचा प्रयत्न...अर्थातच, काही हलकेफुलके, गमतीदार किस्से ऐकायला मिळावेत, हा शुद्ध आणि निखळ हेतू. कुणाची मनं दुखावण्याचा किंवा कुणाच्या घरात आग लावून गंमत बघण्याचा उद्देश अजिबात नाही!
आमच्या घरी भांडणाला...आपलं...भांड्याला भांडं लागण्याची कारणं ः
माझ्या दृष्टीने ः
1. फोन घेण्यातली "तत्परता' ः आपण काही उत्साहानं सांगायला जावं आणि सहधर्मचारिणीनं फोनच उचलू नये, हा कित्ती आनंददायी अनुभव नाही? मग काही मिनिटांनी/तासांनी तिचा पुन्हा फोन आल्यावर "सांगत नाही ज्जा!' म्हणून फणकाऱ्यानं फोन न उचलण्यानं अस्सा काही भडका उडतो म्हणून सांगू!
2. टापटीपीच्या व्याख्या ः तिच्या दृष्टीनं टापटिपीची व्याख्या म्हणजे तरातरा, वसवस करीत सगळा ओटा-टेबल आवरणं. मग नवऱ्याला वेळ देणं, पेपर-बिपर गेलं खड्ड्यात! माझ्या दृष्टीनं माझं पेपरवाचन, निवांतपण, फोन, सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर वेळ उरला, तर कचरा, आवराआवरी यांच्याकडे लक्ष द्यायचं! बरं, या "टापटीपसम्राज्ञी'ला आंघोळीचा टॉवेल उचलायला मात्र ऑफिसातून परत येईपर्यंत वेळ नसतो बरं का! मग मीही तो रागंरागं तसाच पाडून ठेवायचा आणि वर मी न केलेल्या चुकीसाठी संध्याकाळी शिव्या खायच्या!
3. इतर फुटकळ मुद्दे ः आमच्या स्वयंपाकघरात चमच्याचा एक स्टॅंड आहे. त्यात कात्री ठेवायच्या जागी इतर काहीही ठेवलेलं मला खपत नाही. त्यामुळं कात्री चटकन हाती येत नाही. सगळा स्टॅंड हलतो. आणि कात्री नसली, की दोन-तीन चमचे तरी तिथे खोचून ठेवणं हा गृहस्वामिनीचा आवडता छंद! नवऱ्याला छळल्याचा विकृत आनंद तिला त्यातून मिळत असावा!! बाकी, पाण्याचा तांब्या भरून न ठेवणं, पेपर वेळच्या वेळी न आवरणं वगैरे गहन आणि गंभीर प्रश्न आहेतच!!
वाचने
9225
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिजितराव,
हाहाहा !!
मला घरात
In reply to हाहाहा !! by टारझन
त्यात योगायोग कसला विजूभाऊ
In reply to मला घरात by विजुभाऊ
भांडण
मस्त धागा
ह्म्म...वाच वाच!
In reply to मस्त धागा by ऋषिकेश
उद्या...
In reply to ह्म्म...वाच वाच! by धमाल मुलगा
होमवर्क साठी...
In reply to मस्त धागा by ऋषिकेश
मी पण वाट
In reply to मस्त धागा by ऋषिकेश
सूरात लागण्यासाठी
हा हा ..
In reply to सूरात लागण्यासाठी by रामदास
हा हा!
In reply to हा हा .. by लिखाळ
अनुमोदनास
In reply to हा हा! by चतुरंग
टाळ्या!प्रचंड टाळ्या!
In reply to अनुमोदनास by लिखाळ
वा वा! जीवनभाष्य आवडले!!
In reply to अनुमोदनास by लिखाळ
नियतीच्या
In reply to वा वा! जीवनभाष्य आवडले!! by चतुरंग
ते तुला लग्न झाल्यावर कळेल!
In reply to नियतीच्या by Nile
हे तुमचं
In reply to ते तुला लग्न झाल्यावर कळेल! by चतुरंग
अरे, तुला ते वाक्य माहीत असेलच
In reply to हे तुमचं by Nile
छे हो!
In reply to अरे, तुला ते वाक्य माहीत असेलच by चतुरंग
वा वा..
In reply to वा वा! जीवनभाष्य आवडले!! by चतुरंग
फोल्डींगचा नवरा
हे राम!
चर्चा
आमच्याकडे
वा वा
In reply to आमच्याकडे by भाग्यश्री
कारण
वरची
छे हो!
In reply to वरची by रेवती
रेवती हा
In reply to वरची by रेवती
निषेध
In reply to रेवती हा by भाग्यश्री
रणछोडदास की नाना फडणवीस तुम्हीच ठरवा
In reply to वरची by रेवती
श्री
In reply to वरची by रेवती
तात्पुरते बहिरेपण
In reply to वरची by रेवती
ज्ञानदेवांनी भिंत चालवली
In reply to तात्पुरते बहिरेपण by संदीप चित्रे
कानाने बहिरा...
In reply to वरची by रेवती
मजेशीर
असेच म्हणतो !
In reply to मजेशीर by अवलिया
आम्ही
मला वाटतं की
हा हा हा! कसलं जबराट निरीक्षण आहे!
In reply to मला वाटतं की by रामदास
आमच्याकडे
एक अनुभव...
परवाच मी
In reply to एक अनुभव... by मस्त कलंदर
आणखी एक..
आहे ना!
In reply to आणखी एक.. by मस्त कलंदर
व्वा!
In reply to आहे ना! by धमाल मुलगा
हॅ हॅ हॅ
In reply to आणखी एक.. by मस्त कलंदर
एक कुठेतरी