Skip to main content

देवा तुझ्या द्वारी आलो

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 31/12/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ - कंपनीतील गणपती मंदिर. वेळ : संध्याकाळचे ७. ०० वा. दिनांक २९ डिसेंबर २००९ साधारण ७०-८० जणांचा ग्रुप कंपनीतील सांस्कृतीक मंडळाने आयोजीत केलेल्या ' सिध्दिविनायक पदयात्रेला' जाण्यासाठी जमला होता. यापुर्वी चार वेळा असा उपक्रम मंडळाने यशस्वी पार पाडला होता. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पदयात्रेत जात असल्याने एक उत्सुकता निर्माण झाली होती. कंपनीच्या आवारातील गणपतीच्या मंदिरात आरती करुन दिंडीला सुरवात झाली. ' गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया ! उंदीर मामा की जय !!!! ' चा जयघोष सुरु झाला . आणि सुरु झाली रात्रीची भटकंती.

गोरी गोरी पान (विडंबन)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 31/12/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: Behind every successful man there is a woman. Behind every unsuccessful man there are her parents. दुष्ट सासरा नावाचा दुष्टग्रह ज्यांच्या पत्रिकेत लग्नस्थळी ठाण मांडून बसला आहे, अशा तमाम जावयांच्या दु:खाला ही कविता नक्राश्रूपूर्ण नयनांनी समर्पित........ गोरी गोरी पान फुलासारखी छान सासर्‍या तुला एक तिरडी आण. सासर्‍याला उचलायला दारुड्यांची टोळी कशीबशी रचलेली लाकडांची मोळी मसणात बैस आता मांडुनिया ठाण सासर्‍या तुला एक तिरडी आण.. सासर्‍याच्या ताटीवर गुलाल पसरला घाई आणि गडबडीत कोळसा विसरला लायटरने पेटवू रे आता तुझा कान सासर्‍या तुला एक तिरडी आण.. सासर्‍याला जाळताना कवटी तडकली भु
काव्यरस

नशीब भाग २१ ते २५

लेखक विनायक रानडे यांनी गुरुवार, 31/12/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
"नशीब भाग १५ ते २०" शब्दाचे भाषांतर केल्यास विनोद निर्माण होणार परंतु कवी भावना समजल्यास कवितेचा आनंद घेता येईल, जगात सगळीकडे कवी भावना सारख्याच असतात बदलतात ते फक्त शब्द. भाषांतर काराने त्या भावना समजूनच त्या त्या भाषेत भाषांतर करणे आवश्यक असते.

"निरोप नवव्या वर्षाचा, स्वागत नव्या वर्षाचे..."

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 30/12/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
चला उरलेल्या आयुष्याला, नव्याने सामोरे जाऊ परत! आणि करुया एका नव्या वर्षाचे, जोमाने स्वागत! सोबत असू द्यावी, शुभ विचारांची संगत! मग वाढेल, जीवन जगण्यातील रंगत! चला तर मग करूया, २०१० चे जोमाने स्वागत...!!! "निरोप नवव्या वर्षाचा, स्वागत नव्या वर्षाचे..."
काव्यरस

"हीएइ ह्योए ह्याई हीयेहे" चे रहस्य...!!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 30/12/2009 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
टशन या हिंदी चित्रपटातले शिर्षक गीत ऐकले असेलच. (ताली बजावे, नचे गावे). इतर गाण्यांपेक्षा त्यात काहीतरी वेगळेपणा हवा म्हणून त्यांनी वरील "हीएइ ह्योए ह्याई हीयेहे" अशा विचित्र कोरस ने त्या गाण्याची सुरूवात केली आहे. आठवून बघा गाणे! असलाच काहितरी आवाज आहे तो! असे वाटते की चार पाच भूते कुणालातरी घाबरवायला आली आहेत आणि अचानक त्यांना थंडी वाजते. आणि त्यांचे दात दुखायला लागतात. तेव्हा मग त्या स्थितीत माणसांना घावरवतांना त्यांचा होणारा आवाज म्हणजे "हीएइह्योए ह्याईहीयेहे" दर शुक्रवारी अर्धा डझन चित्रपट रिलीज होतात. त्या प्रत्येकात किमान चार तरी गाणी असावी लागतात.

२०१०-विजयी भव!!!

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 30/12/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० च्या वर्षाची सुरवात होण्यास काही तासांचाच अवकाश आहे. एक वर्ष संपणार आणि दुसरे सुरु होणार. पाश्चात्य विचारांत जी काही कमी अथवा आक्रमकता असो, पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र उत्साहाचा आणि उमेदीचा आहे. माणुसमात्र अनेक अनियमितता अथवा बंधनाने बांधला गेला आहे, परंतु अश्या वर्षाच्या सुरवातीस मात्र त्याचा कल हा आशावादी आणि संकल्पाचा असतो ही बाजु मला जमेची वाटते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक गोष्टी करण्याच्या राहुन जातात त्यांना अश्या वर्षाच्या सुरवातीच्या कल्पनेने परत एकदा उजाला देता येतो.

धागे

लेखक कवटी यांनी बुधवार, 30/12/2009 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
मला १ ओळीचे धागे काढायचे आहेत. तुम्हाला माहीत असतील तर मदत करा प्लिज.

भारतातून चावट शोध बंद...

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 30/12/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वाचनात आलेल्या खबरीनुसार याहू शोध, फ्लिकर आणि बिंग शोध या संस्थळांनी भारतीय जनतेला आंतरजालावरील अश्लील स्थळांपर्यंत पोहोचू न देण्याचा विडा उचलला आहे. बातमीमध्ये असेही प्रतिपादन केले आहे की आपल्या भारतमातेच्या सुकन्या/पुत्रांचे 'सेक्स'शी संबंधित शोध करण्याचे प्रमाण इतर देशांच्या पुत्र/कन्यांपेक्षा अधिक आहे.

धाकोबा आणि दुर्ग

लेखक जीएस यांनी बुधवार, 30/12/2009 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्‍या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे. उजवीकडे सिद्धगड, त्याच्या मागे भीमाशंकर, समोरचा दमदम्या, बाजुला आहुपे गावाकडे वर जाणारी घाटवाट, त्याही बाजुला दुर्ग, अजून पलिकडे, जीवधन, नानाचा अंगठा अशी सगळी ओळखपरेड सुरू असतांनाच, या सर्व उत्तुंग भिंतींवरूनही डोके वर काढून आकाशात घुसलेले एक रूंद शिखर दिसते.

गेम्स

लेखक जागु यांनी बुधवार, 30/12/2009 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला ३१ च्या पार्टी सेलिब्रेशन साठी कपल गेम व लहान मुलांचे गेम हवे आहेत. तुम्हाला माहीत असतील तर मदत करा प्लिज.