आप मुझे अच्छे लगने लगे-२
भाग-१:
https://www.misalpav.com/node/49462
(पुढे चालू)...
'भाभी,असं कसं विसरून जाऊ सपनाला? माझा दिल
दुखतो. मला आत्ताच सपनाला जाऊन भेटलं पाहिजे'
रोहित-निशिगंधाभाभीचा होस्टेलच्या गेटवर संवाद चाललाय.
ह्यावर भाभीचं म्हणणं असं पडतं की, 'तू सुरक्षित रहावास ह्या भूमिकेतूनच सपनाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे..! ह्यामध्ये माझा काही विशेष रोल नाही. मी फक्त हा निरोप सांगण्याचं कर्तव्य करत आहे..! याउप्परही तुला तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर तू स्वतंत्र आहेस..!
मिसळपाव