Skip to main content

नवे जग

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 17/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
देवा हवाय मला एक खोडरबर ... नको असलेल्या आठवणी, मनपटलावरुन अलगद , हळुवार एकही ओरखडा न ठेवता पुसणारा... हवाय मला एक आयुष्याचा कॅनवास , अगदी कोरा कोरा, पांढराशुभ्र एकही रंग नसलेला , एकही ओरखडा नसलेला... सगळच नवं कोरं... रंगही नवे , कुंचलाही नवा... चित्र चितारणार तेही नवेच... देवा हवाय मला एक नवा कोरा आरसा अगदी नवा... कुणीच, कधीच त्यात आपले प्रतिबिंब पाहिले नसावे... ज्या आरश्यात मी स्वता:लाच नव्याने ओळखावे, असा आरसा...
लेखनविषय:

वाचने 1412
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

=D> चुचु