Skip to main content

आमचे काही पूर्व-जन्म....

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे काही पूर्वजन्मः आणखी काही पूर्वजन्म पुन्हा कधीतरी...... १६२४ साली इंग्लंड मधील एक लढवय्या..... एक संस्थानिक..... अर्धांगिनीसहः

मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्री हरले बीग बी जींकले

लेखक बाबुराव यांनी रविवार, 28/03/2010 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
अभामराठी साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री गैरहजर राहिले. ते काहून गैरहजर राहिले हे काय सांगाची गरज नाय.बीग बी उपस्थित राहिले. सात ठराव पास झाले. बेळगावच्या मराठी माणसावरचा अन्याव सहन केला जाणार नाय. कोर्टात महाराष्ट्र शासनाने मजबूत बाजू मांडावी. पुणे विद्यापीठाला क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे, असे काय ठराव मंजूर करण्यात आले. प्राचार्य आन अभासामहामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यायनी तीन वर्ष मात्र गाजीले.विश्वसाहित्य संमेलन काय घेतले. अध्यक्षपदाची सुत्रे स्वताच काय दिली.आन पुण्याच्या साहित्य संमेलनात मिरून काय घेतले. काय काय केले आन काय नाय केले.

आपल्या मोना(लिसा) वहिनी

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या संग्रहातील मोना वहिनी: आणखी नंतर पाठवू. छबिदार छबी: मोनाताई: चारचौघी: मोनाकाकू: Mona vahini1 मोना वहिनी: M

दुधी हलवा

लेखक प्रभो यांनी रविवार, 28/03/2010 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
दिपालीताईने परवा दुधीचे पराठ्याची पा़कृ टाकली, आमचं तोंड खवळलं... आता असं नाही की मला दुधीचे पराठे आवडतात..आवडतो दुधीचा हलवा. तर पेश करतो आहे दुधी हलवा. साहित्य : १. १ दुधी - धुवून आणी साल काढून. २. २५० ग्रॅम खवा किंवा २ मोठे ग्लास दुध ३. ३-४ चमचे साजूक तूप ४. ८-१० मोठे चमचे साखर ५. सजावटीसाठी काजू, बदाम, बेदाणे. कृती: सर्वप्रथम साल काढलेला दुधी किसून घ्या. एका नॉन स्टीक पातेल्यात अथवा लोखंडी कढईत ३-४ चमचे साजूक तूप घ्या. तूप गरम झालं कि त्यावर दुधीचा किस टाका. दुधीचं सगळं पाणी अटेपर्यंत हालवत रहा. पाणी अटल्यावरही २ मिनिटे दुधी खरपूस होईपर्यंत भाजा. आता त्यात खवा हाताने चुरून टाका.

आदाब अर्ज है !( २६-०७-११) हार जाने का हौसला है मुझे.........

लेखक अश्फाक यांनी रविवार, 28/03/2010 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सुचना आणि प्रतिक्रिया माझ्यासाठी अमुल्य आहेत, प्रतिक्षेत ......... २६-०७-११ ज़िन्दगी से यही गिला है मुझे ! ( गिला = तक्रार ) तू बहुत देर से मिला है मुझे !! हमसफ़र चाहिये हुजूम नहीं ! ( सहप्रवासी हवा गर्दी नको ) इक मुसाफ़िर भी काफ़िला है मुझे !! तू मोहब्बत से कोई चाल तो चल ! हार जाने का हौसला है मुझे !! लब कुशां हूं तो इस यकीन के साथ ! ( लब कुशां = तोंड उघडने ) कत्ल होने का हौसला है मुझे !! दिल धडकता नहीं सुलगता है ! वो जो ख्वाहिश थी, आबला है मुझे!!
काव्यरस

जलते है जिसके लिए

लेखक अरुंधती यांनी रविवार, 28/03/2010 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं हसणं, तिच्या चेहर्‍यावर उमटणार्‍या सुरेख भावछटा, तिचं डोळ्यांतून चांदणं बरसणं....नूतन म्हणजे चित्रपटसृष्टीतील एक सुमधुर काव्य होतं. नूतनचे सर्वच चित्रपट एक से एक होते. पण तिचा ''सुजाता'' फार गाजला. मला विशेष लक्षात राहिला कारण एरवी कडक धोरणे असणार्‍या आमच्या शाळेत तो आम्हाला चक्क चित्रपटाची रीळे आणून सभागृहातील पडद्यावर दाखवला गेला.

रिंगटोन्सच्या रम्य राज्यात!!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 27/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
रिंगटोन्सबद्दल माझ्याजवळ असलेली काही उपयुक्त माहिती व टीप्स सगळ्यांना माहिती व्हाव्यात व आणखी काही माहितीची देवाण घेवाण एकमेकांत करता यावी यासाठी हा चर्चेचा प्रस्ताव. आजकाल प्रत्येकाजवळ मोबाईल असतो. ज्यांचेजवळ साधा मोबाईल असतो (ज्यात फक्त साधे रिंगटोन्सच वाजू शकतात)त्यांच्या प्रत्येक रिंगटोन्साचा आवाज / टोन / पीच हा जवळपास सारखाच असतो. उदाहरणार्थ- नोकिया ११००. पण ज्यांचेजवळ 'एमपी थ्री' रिंगटोन्स ची सोय आहे, त्यांच्यासाठी खालील उपयुक्त माहिती/शिफारस देत आहे- जर साधे संगीत/गाणे असलेला रिंगटोन आपण लावला तर बाहेर गर्दीत तो ऐकू येत नाही.

विहीर: खोल अन गुढ अंधारी, काळीकुट्ट, सगळ्यांना कवेत घेणारी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 27/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच विहीर (थेटरात) 'पाहीली'. 'वळू' चीच बरीचशी टिम यात आहे. कथा दोन मावस भावांमधील आहे. पुण्याचा समिर (मदन देवधर) अन गावाकडचा नचिकेत (आलोक राजवाडे). सम्या आपल्या नचादादावर फार प्रेम करतो. प्रत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. सम्या त्याच्या आई, बहिणीबरोबर त्याच्या मावशीच्या लग्नासाठी नच्याच्या घरी, गावी येतात. वाड्यात खेळतात. विहीरीत पोहतात. सम्या पट्टीचा पोहणारा असतो तर नचादादा सांगड लावून पोहोतो. नचादादा गुढ बोलतो. त्याचा जीव नेहमीच्या वातावरणात गुदमरतो. त्याला त्याच्या पलीकडे कोठेतरी दुर निघून जायचे असते. गायब, अद्रूष्य व्हायचे असते. तसे तो सम्याला बोलूनही दाखवतो.

चित्रपताच्या पोस्टरवरील पुरुष अभिनेता बहुतेक वेळा उजवीकडेच असतो. असे का?

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 27/03/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही चित्रपटाचे किंवा जाहिरातीचे वर्तमानपत्रातील छापील पोस्टर किंवा चित्रपटगृहावर लावलेले पोस्टर असो, एक गोष्ट निरिक्षण करून माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे जेव्हा पोस्टरवर मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री ठळकपणे असतात, तेव्हा नेहेमी अभिनेता (हिरो) हा अभिनेत्रीच्या (हिरोईनच्या) उजवीकडेच असतो.उदाहरणादाखल खालील दिलेल्या चित्रपटांची पोस्टर्स पेपरमध्ये बघा: थोडा प्यार थोडा मॅजिक, लव्ह स्टोरी २०५०, कहो ना प्यार है, दे ताली असे का असते? की येथेही (कळत किंवा नकळत) पुरुष हा स्त्रीपेक्षा उजवा (श्रेष्ठ) आहे असे दाखवायचा प्रयत्न (योग्य की अयोग्य तसेच कोण श्रेष्ठ ही चर्चा येथे अपेक्षीत नाही ) असतो?