Skip to main content

आदाब अर्ज है !

लेखक अश्फाक यांनी शनिवार, 27/03/2010 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसलपाव च्या सन्माननिय सभासदाना नमस्कार , आपले लेखन वाचुन असे लक्शात आले कि गझल आनि शेर-ओ-शायरि बद्दल फार लोकाना जानुन घ्यायाचि इच्छा अस्ते , पन जास्त करुन गझल उर्दु भाशेत असतात आनि ते समजाय्तला कठिन असतात.तरि मि माझ्या परिने शक्य तित्के सोप्या भाशेत रोज काहि तरि नवीन ( भाशान्तर) द्यायचा प्रयत्न करेल .
काव्यरस

काही प्रश्न...

लेखक चक्रमकैलास यांनी शनिवार, 27/03/2010 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला काहि मूलभूत प्रश्न पडले आहेत..ते माझ्यासारखेच आणखी कोणाला पडले असतील तर तो/ती इथे मला भेटण्याची शक्यता वाटली म्हणून हा तुमच्या डोक्याला ताप देतोय. आपण रोज सकाळी ऊठतो,जे काही काम असेल ते म्हणजे,कॉलेज,नोकरी,धंदा ई.ई. करतो..पैसे कमावतो,मजा करतो,पण हे सगळं करताना कुठेतरी एक पोकळी जाणवत असतेच..हे काय चाललंय?,आपण हे का करतोय याचा कधी विचार केलाय का..?? कितीही सुखी असलो तरी आपण शांत का नसतो..??

लिहा आणि कमवा - ऑनलाईन डिजीटल लायब्ररी.

लेखक II विकास II यांनी शनिवार, 27/03/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.sahityasampada.com/ ह्या संस्थेचा स्टॉल संमेलनात पाहीला. या संकेत स्थळाद्वारे आपण पुस्तके ऑनलाईन वाचु शकतो. जर तुम्ही लेखक असाल तर तुम्ही ह्या कंपनीशी करार करुन पैसे देखील कमावु शकता. नोंदणी शुल्कः १५ रु मासिक शुल्कः ३० रु अधिक माहीती साठी पत्ता: fuzzysoft@gmail.com sahityasampada@gmail.com दुरध्वनी: ०२४०-२३४७६३२ ९४२२२ ०९४८६ टिपः ह्या कंपनीशी माझा/मिसळपावचा कोणताही संबध नाही अथवा कोणताही प्रकारचा मोबदला मला/मिपा ला मिळत नाही.

मराठी सॉफ्टवेअर उपकरण - घरपोच फुकट सी डी

लेखक II विकास II यांनी शनिवार, 27/03/2010 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी सॉफ्टवेअर उपकरण घरपोच फुकट सी डी - सौजन्य भारत सरकार ०१ मराठी भाषेचे ट्रू-टाईप फॉन्ट्स व कि-बोर्ड ड्रायव्हर ०२ मराठी भाषेचे ट्रू-टाईप मल्टीफॉन्ट कि-बोर्ड इंजिन ०३ मराठी भाषेचे युनिकोड आधारीत ओपन टाईप फॉन्टस ०४ मराठी भाषेचे युनिकोड कि-बोर्ड ड्रायव्हर ०५ मराठी भाषेचे विभिन्न प्रकारचे फॉन्टस आणि स्टोरेज कोड परिवर्तक ०६ भारतीय ओपन ऑफीस(ओपन सोर्स) मल्टीप्रोटोकॉल संदेशवाहकचे मराठी स्थानीकरण ०७ मराठीचे अक्षर जोडणी तपासणीस ०८ मराठी-इंग्रजी शब्दकोश ०९ मराठी डेकोरेटिव्ह (अलकांरीक फॉन्ट) डिसाईनर उपकरण १० मराठी डाटाबेस सॉर्टीग ११ मराठी टंकलेखन सहाय्यक १२ मराठी मायक्रोसॉफ्ट शब्द उपकरण १३ मराठी मायक

नांदुरमधमेश्वर ची भटकंती

लेखक jaypal यांनी शनिवार, 27/03/2010 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाची २४ जानेवारी २०१० ची दुपार उजाडली. गाडी काढली आणि निघालो नासिकला एकटाच. खुप दिवस ठरत होत पण योग जुळत न्हवता. कधी हवामाना मुळे आलेल मळभ तर कधी रजेचा प्राब्लेम. या वेळेस मी ठरवल होत ग्रुपमधल कुणी बरोबर येओ अथवा राहो मी जाणारच. नांदुरमधमेश्वर नासिक पासुन साधारण ३०/३५ कि.मी वर आहे. येथे खुप जुना (ब्रिटीश कालीन असावा) मातीचा मोठ्ठा डॅम आहे. या डॅमच्या बॅक वाटर मधे चरण्यासाठी खुप लांबुन आणि परदेशातुन सुध्दा खुप पाणपक्षी येतात असे समजले होत आणि त्यांना (कॅमे-यात) शुट करण्यासाठी मी चालालो होतो. शनिवारचा हापडे टाकला होता.

आनंद ओवरी

लेखक सोम्यागोम्या यांनी शनिवार, 27/03/2010 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक नाटक पाहिलं आनंद ओवरी ! कान्होबा म्हणजे (तुकारामांचे बंधु) त्यांच्या दृष्टीतून तुक्याचे हे दर्शन निराळेच वाटले. किशोर कदमांचा अभिनय फार जबरी आहे असं काही मी कौतुक करणार नाही पण एकच पात्र असूनही जो काही परिणाम कथेला साधायचा आहे तो अचूक साधला जातो. मी काही नाट्य समीक्षक नाही.

मराठी ग्रंथालयासाठी सॉफ्टवेअर हवे...

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 26/03/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
बेळगावात नुकतेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने लोकमान्य ग्रंथालय सुरु झाले आहे. येत्या वर्षभरात ११११११ पुस्तके विकत घेतली जाणार आहेत. सध्या पुण्याच्या साहित्य संमेलनात ग्रंथ खरेदी सुरू आहे. पुस्तकांची माहिती, सदस्यांची माहिती, पुस्तकांची देवघेव, वर्गणी, स्मरण पत्रे, पुस्तकांची वा लेखकांची अकारविल्हे यादी हे सर्व मराठीतून करु शकणा-या एखाद्या सॉफ्टवेअरच्या शोधात आहोत. कुणी काही सुचवेल का?