काश्मिर आणि माध्यमे
आजच्या डिएनए च्या संकेतस्थळावर एक बातमी वाचण्यात आली: RSS may go against J&K autonomy (जाने ११, २०१०)
काय आहे म्हणून उत्सुकता वाटली. तर बातमीप्रमाणे, जस्टीस शागीर अहमद समितीने काश्मिरला ऑटोनॉमस स्टेटस (मराठी?) देण्याबद्दल शिफारस केली आहे त्याला संघाने विरोध करण्याचे ठरवले आहे असे त्या बातमीतील म्हणणे होते. बातमीतील पहीले वाक्य आहे: "The right-wing Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) may announce an action plan against the recommendations of justice Shagir Ahmed committee, which has advised an autonomous status for Jammu and Kashmir."
वास्तवीक माझ्यालेखी अशी काही शिफारस केली गेली आहे हीच एक मोठी बातमी असायला हवी पण त्याबद्दल विशेष माहीती दिसली नाही. म्हणून मग गुगलून आजच्या ताज्या बातम्यात इतरत्र कुठे दिसते का ते पाहीले. तर आजच्याच काय कुठल्याच बातम्यात दिसले नाही. रिडीफ आणि दि ट्रायब्यून चंडीगढ मधे या समितीवरून पुर्वी उल्लेख आलेले दिसले पण या शिफारसीबाबत काहीच नाही!
देवेगौडा यदुरप्पांना काय म्हणाले, शशी थरूरनी कुठले विधान नाकारले यावरून भराभर आजची ताजा खबर अपडेट करणारी माध्यमे या बाबत मात्र इतकी गप्प कशी काय?
नक्की काश्मिरसंदर्भात काय चालले आहे जे आपल्याला सांगितले जात नाही अथवा किमान पक्षी मला माहीत नाही?
वाचने
2410
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
हल्ली
In reply to हल्ली by II विकास II
+०.५ / -१
एकदम बरोबर बोलता आहत
http://www.google.co.in/searc
अभ्यास करावा लागेल कारण परिस्थिती सारखी बदलते आहे.