Skip to main content

एस्.टी आरक्षण साईट

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 11/01/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय रेल्वेच्या आरक्षण साईट प्रमाणेच आपल्या एस्.टी ने ही ऑनलाईन आरक्षणाची सुविधा चालू केली आहे. त्याची लिंक या साईटवर प्रथम आपले अकांट काढावे लागते. व त्यानंतर टिकिट बूक करता येते. ठाणे-पुणे मार्गासह, दादर, बोरीवली, नाशिक, औरंगाबाद या मार्गावरील बसेसचे आरक्षणही ऑनलाइन उपलब्ध असेल. इतर मार्गा बद्दल माहिती नाही. अमोल ------------------------------------------------------------------------------------------- मला इथे भेटा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2387
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

उपउक्त माहिती!! धन्यवाद.. - कोकणी फणस

उपयुक्त माहिती. अकाउंट काढला. पासवर्ड फक्त सहा अक्षरांचाच का पाहिजे ह्याचे कारंण कळले नाही."Search Bus Services' मध्ये गेलो. मुंबई-रत्नागिरी १९ जानेवारी/night express निवडले. Journey Time मध्ये काय टाकायचे कळत नाही. २०:०० म्हणजे रात्री आठ नंतरच्या गाड्या बघायच्या होत्या.म्हणून २०:०० लिहिले.ह्या दिनांकास ह्या वेळेस गाडी उपलब्ध नाही अशी सुचना आली. आता रात्री आठ नंतर किती गाड्या आहेत हे कसे बघायचे? अवांतर- साईट म्हणावी तेवढी सुरक्षीत दिसत नाही. उ.दा.From मध्ये मी "%" लिहिले आणि To मध्ये %% %%लिहिले,AC-Shivneri सिलेक्ट केले आणि search बटन दाबले .एकूण ८ गाड्यांचे पर्याय दिसले. काही गाड्या परळहून तर काही गाड्या शिवाजीनगरहून.! भेंडी P = NP

In reply to by चिरोटा

असाच अनुभव मला ही आला.. कुरुंदवाड-स्वारगेट शोधताना ह्या वेळेस गाडी उपलब्ध नाही अशी सुचना आली, पण स्वारगेट - कुरूंदवाड शोधताना ८ ची वेळ दिल्यानंतर दुपारी ३ ची गाडी दिसली.. एकूणात स्तुत्य प्रयत्न असला तरी नाक्यावरच्या किराणावाल्याकडे जाऊन बुकींग केलेले परवडेल (तसे पुण्याहून सांगली-कोल्हापूरला जाणार्‍यांना बुकींगची गरज पडत नाहीच म्हणा..!) --सुहास

अंबेजोगाईला जाते का हो? चुचु

मला सीट क्रमांक दिसला नाही.

आव एस्.टी ला आधीच आरक्षण आसतांना त्याच्यावाल्या साईटी बी निगाल्या का आता? आम्हा ओपन वाल्यांच्याबी साईटीला आरक्षन कवा येनार? का आमी मेजर, मायनर झाल्याव येनार? ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

सभासदत्व घेतल, एकदम YZ साईट आहे, वेळ टाकताना तर ज्याम गोंधळ उडतो. त्यातुन भर म्हणजे वेळापत्रक बघायची सोय नाही. आपल्या कांतानी सवलती दरात यापेक्षा चांगली साईट बनवली असती. --टुकुल