Skip to main content

शांताराम कादंबरी: घ्यावी का विकत???

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 29/05/2010 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच "शांताराम" ह्या ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स लिखित मुळच्या आंग्ल भाषेतील कादंबरीचा मराठी अनुवाद मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. (किंमत-९९० रूपये) तर ह्या कादंबरीचा सारांश कुणी सांगेल काय? मला शांताराम संग्रही ठेवायची आहे पण जास्त किंमतीमुळे धाडस होत नाही. पण अर्थातच उत्कृष्ट असेल तर मी ती घेइनच. तरी जाणकारांनी शांताराम संग्राह्य आहे का ते सांगावे.

नदीकाठी सासूरवाशीण

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/05/2010 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नदीकाठी सासूरवाशीण
अल्याड आहे सासर माझं, पल्याड माहेरा पाहते मधी वाहे चंद्रभागा, त्यात धुनं मी गं धुते || पानी वाहे दुधगंगा, जसं अमृताच्या चवीचं त्याची गोडी काय सांगू, त्याची गोडी अविट || नदीकाठची शाळू वाळू, बारीक बारीक मदी आसतील गोटे, बी संगे खारीक || माहेर मोठं दांडगं, नाही कसली वनवा सासर बाई आसलं द्वाड, त्याला कसली पर्वा || सोडले मोकळे पाय नदीच्या ग पान्यात, ऐन्यात रूप दिसे, रूपे सोनेजडीत || जा ग माय जा ग माय, अशीच ग तू वाहत भरव तुझ्या लेकरांना, चारा देई दुष्काळात || कितीकदा येते
काव्यरस

त्याचे तिचे प्रश्नोत्तरे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/05/2010 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचे तिचे प्रश्नोत्तरे सिच्यूएशन: हिरो हिरवीनीची छेडाछेडी चाल: थोडीशी सवाल जबाबासारखी
तो: गोरा गोरा रंग अंगी चोळीही तंग पदर कमरेला विळखा घाली असती आपल्यातच दंग चाल तुझी मोरावानी हरणापरी चपळ अंग कुठं जाशी कुठून येशी सांग सांग सांग पोरी सांग सांग सांग
ती: गोरा गोरा रंग माझा नाही गर्वाने धुंद शिंप्याची चुक झाली केली चोळी त्याने तंग मोर हरणावानी चाल चपळ न्हाई तुझ्यागत फोपशी अंग नसत्या चौकशा करू
काव्यरस

जौहरी की गत जौहरी जाणे *....

लेखक रामदास यांनी शनिवार, 29/05/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक बाजाराची स्वत:ची अशी खास भाषा असते.सांकेतीक असते.रानडे रोडवर जसा *बापट भाव आहे तसा हा प्रकार.जव्हेरी लोक फार पूर्वी एक सांकेतीक भाषा वापरायचे. भाव करण्यासाठी हथ्था वापरायचे. हाताच्या खूणांनी एकमेकांना भाव सांगायचे .काही जव्हेरी बोली भाषा वापरायचे जी फक्त त्यांनाच समजायची. हे सगळं करण्याचा उद्देश असा की खरा भाव ग्राहकाला कळू नये. रत्नपारख्यांच्या राज्यात या सांकेतीक भाषेला फरच महत्व आहे.ग्राहकाची हौस आणि नड यावरच रत्नांचा भाव ठरतो. (व्यावहारीक नजरेतून पाहीलं तर सगळी अनमोल रत्ने फेरविक्रीस घेऊन गेलं तर कवडी मोलाची असतात.

कलकात्याजवळ माओवाद्यांनी ट्रेन उडवली

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 28/05/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/india/Maoists-trigger-train-crash-10… सकाळची बातमी http://72.78.249.107/esakal/20100528/5461284406080672712.htm आज पहाटे १.१५मि. मुंबईला जाणारी ट्रेन कलकात्याजवळ उडवली...अधिकृतरीत्या १०० ठार आणि १६० जखमी...ट्रेन उडवल्यानंतर जवळूनच जाणार्या मालवाहू गाडीखाली आली...इंजिनावरच ६० + मृतदेह...

बालपण...

लेखक मानस् यांनी शुक्रवार, 28/05/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण... दिवाळी चे दिवस … आम्ही सारे आजीच्या घरी सुट्टी साठी आलेले.सारे काके, आत्या वगैरे… दिवाळी म्हणजे फटाके, नवे कपडे, आणि मुख्य म्हणजे सगळ्या चुलत-आते भावंडाना भेटून खेळणे मस्ती करणे. दिवाळी ची रात्र. थंडीचे दिवस.आजीचे घर म्हणजे जुना प्रचंड मोठा वाडा होता… मोठ-मोठे तीन चौक, १५-२० पोरांना पळापळी खेळता येईल एवढे पटांगण होता एकेक चौक म्हणजे!! त्याच्या भोवती ओवर्या आणि मग खोल्या… सहा खोल्यांचे घर आजीचे होते… समोरच्या प्रचंड चौकात एका बाजूला केळीचे एक बेट असल्या सारखे… म्हातारी रखमाबाई तिथे भांडी घासत असे. दिवसभर दंगा करून आम्ही पोरे दामून जात असू.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

फसवणुक - कायदेशीर मदत हवी आहे.

लेखक अभिज्ञ यांनी शुक्रवार, 28/05/2010 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
५ हजार वर्षापूर्वी वेगवेगळ्या ऋषी-मुनींनी माझे भविष्य आणि मला मार्गदर्शक गोष्टी एका नाडीपट्टी वर माझ्यासाठी लिहून ठेवलेल्या होत्या. त्या फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासाठीच लिहिलेल्या आहेत. त्यावर माझे नावही कोरलेले आहे. शिवाय त्या पट्टीचा या जगातील दुसर्‍या कुणालाही उपयोग नाही. असे असुनही नाडीकेंद्रातल्या लोकानी महर्षींनी फक्त माझ्या साठी लिहिलेली ही पट्टी लपवून ठेवलेली आहे. मला ते देत नाहीतच शिवाय ती वाचायचे पैसे मागत आहेत.

अरे कोणीतरी भीती दाखवाल का?

लेखक sagarparadkar यांनी शुक्रवार, 28/05/2010 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्ष मी असा एखादा तरी अनुभव, कथा, किंवा चित्रपटाच्या शोधात आहे ज्यामुळे जरा तरी भीती वाटेल. ८वी-९वीत असेपर्यंत जरा भीती वाटेल असे सिनेमे निदान इन्ग्लिश्मधे तरी येत असत, जसे की Exorcist, Omen, Evil Dead वगैरे वगैरे. माझ्या आत्त्याची एक मैत्रीण तेव्हा पुण्यात ओब्झर्वेट्रीत नोकरीला होती. एका शनिवारी हाफ्-डे नंतर ती ऑफिसच्या समोरच्याच 'राहूल' ला 'The Exorcist' बघायला गेली.