जौहरी की गत जौहरी जाणे *....
लेखनप्रकार
प्रत्येक बाजाराची स्वत:ची अशी खास भाषा असते.सांकेतीक असते.रानडे रोडवर जसा *बापट भाव आहे तसा हा प्रकार.जव्हेरी लोक फार पूर्वी एक सांकेतीक भाषा वापरायचे. भाव करण्यासाठी हथ्था वापरायचे. हाताच्या खूणांनी एकमेकांना भाव सांगायचे .काही जव्हेरी बोली भाषा वापरायचे जी फक्त त्यांनाच समजायची. हे सगळं करण्याचा उद्देश असा की खरा भाव ग्राहकाला कळू नये. रत्नपारख्यांच्या राज्यात या सांकेतीक भाषेला फरच महत्व आहे.ग्राहकाची हौस आणि नड यावरच रत्नांचा भाव ठरतो.
(व्यावहारीक नजरेतून पाहीलं तर सगळी अनमोल रत्ने फेरविक्रीस घेऊन गेलं तर कवडी मोलाची असतात. एखादे रत्न खरेदी करणे म्हणजे अनोळखी व्यक्तीला उधार पैसे देण्यासारखे आहे. परतीचा मार्ग नाही.याला अर्थात काही सन्मान्य अपवाद आहेत.)
आता थोडी ओळख जव्हेर्यांच्या सांकेतीक भाषेची.
एक महत्वाचा मुद्दा असा की ही भाषा आता कोणीही वापरत नाही.
आधुनीक साधनांनी त्याची आवश्यकता संपवून टाकली आहे.
रंजकता हा एकच मुद्दा.
एक = कणी
दोन = मेली
तीन = एकवई
चार = एरण
पाच= मूळ
सहा = बेड
सात = समार
आठ = थाल
नऊ =बन
दहा = दाही
पंचवीस = सळीसूत किंवा पान
पन्नास = मूळदाही
पंचावन्न = मूळमूळ
सत्तर =समार दाही
पंचाहत्तर = तीन पान
शंभर = कणी सो
हजार = बडा घर.
एक उदाहरण म्हणून ही यादी दिली आहे .
याचा वापर कसा करायचा यासाठी एक नमुना.
एकवई_एरणदाही अदिती म्हणजे ३_१४ अदिती.
ही सगळी माहीती मला बरीच पुस्तके वाचल्यावर आणि काही माहीती व्यापार्यांकडून मिळत गेली.
बरीचशी मराठीतली माहीती १९४०-४१ दरम्यान प्रकाशीत झालेल्या लघुरत्न परीक्षा रत्न प्रदीप खंड ह्या पुस्तकांतून मिळाली.
या पुस्तकाची आवृत्ती आत कुठेच मिळत नाही.
वर दिलेली सांकेतीक भाषा वामन हरी पेठे यांनी रत्न प्रदीप खंडाच्या लेखकाला लिहीण्यास बरीच मदत केल्याचा उल्लेख आहे .
पण आमच्या सारख्या संतांना ह्या रत्न संपत्तीचा काय उपयोग ?
झूठा माणिक मोतीया री झूठी जगमग जोति ।
झूठा सब आभूखणा री सांची पिया जी री पोती ।
झूठा पाट पटंबरा रे झूठा दखणी चीर *।
सांची पियाजी री गुदडी जामे निर्मल रहै सरीर ।
*या लेखाचे शिर्षक मीरेच्या हे री मै तो दरद दिवाणी या पदातून घेतले आहे.पूर्ण ओळ अशी आहे .
जौहरी की गत जौहरी जाणे की जिण जौहर होय.
*दखणी चीर = दख्खनी साडी =दक्षीणी साडी हा संदर्भ सोळाव्या शतकातला आहे.
बापट भाव = सांगीतलेल्या भावाचा अर्धा भाव.
वाचने
7041
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
बापट दोनशे नंबरी !
In reply to बापट दोनशे नंबरी ! by मुक्तसुनीत
ह्या वयात ?
एटमॉलॉजी
In reply to एटमॉलॉजी by रामदास
शिसानविवि
In reply to एटमॉलॉजी by रामदास
_/\_
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to _/\_ by नंदन
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
+१
भारी
अरे वा!
'जव्हेरीबा
रामदासा,
:-)
वेगळ्या विषयावरिल माहिती पुर्ण लेख
व्वा !
प्रत्येक वेळेस
माहीती
मस्त
पुन्हा रामदास!
+१
नवनवीन माहिती