Skip to main content

एका रिक्षावाल्याची गोष्ट

एका रिक्षावाल्याची गोष्ट

Published on बुधवार, 12/05/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
मला नेहमीच असे काहीतरी अनुभव येत असतात...कुर्ल्याला होते तेव्हा स्टेशनवर बसने जायचे...बसथांब्याशेजारीच रिक्षा उभ्या राहायच्या...बरेचदा लोक बसची वाट पाहण्यापेक्षा २-३ मिळून शेअर रिक्षा करून स्टेशनला जायचे...बसच तिकीट ३/- म्हणून माणसी ३/- घ्यायचे रिक्षावाले....एकदा दुपारी मी बसची वाट पाहत थांबले...एक रिक्षावाला "स्टेशन... स्टेशन " करत आला...इतर कोणीच नव्हतं..मी त्याला विचारलं " तीन रुपयात नेणार ना? ", उत्तरादाखल त्याने मन हलवली आणि बस म्हंटला...मी बसले...स्टेशनच्या रिक्षा थांब्यावर थांबलो आणि मी उतरून त्याला ३/- दिले...लगेच त्याने ओरडा आरड चालू केली " आठ रुपये द्या" "आठ कसले ? मी विचारलं तर तीनच म्हणाला...घ्यायचे तर तीन घे" ...लगेच अजून आवाज चढवत "पैसे देत नाही" वगैरे बोलायला लागला...तेव्हड्यात बर्यापैकी गर्दी जमली...जमणारच... मग मी पण जरा लांब उभं राहून गम्मत बघत असलेल्या हवालदाराला हात करून बोलावलं...साहेब आले...तोंडातून एक शब्द नाही....मी सांगितलं कि आमच्या घरासमोरच्या बस stop वरून इथे यायला रिक्षावाले ३ रुपये घेतात...तरी बसताना मी याला विचारले तर " हो " म्हणाला....आणि इथे आल्यावर ८ रु. मागतोय...मी देणार नाही...तो रिक्षावाला लगेच " इतकेच पैसे नाहीत तर हे घे तुझे ३ रु....मला आता वैताग आला...मी सरळ ३रु . घेतले आणि चालायला लागले...हे हवालदार साहेब आणि रिक्षावाला बघतच राहिले...
लेखनप्रकार

याद्या 4520
प्रतिक्रिया 22

छान ! पण तीन रुपे म्हणजे फारच स्वस्ताईचा जमाना होता वाटतं !

In reply to by सोम्यागोम्या

अहो फक्त दोनच stop च अंतर होते...म्हणून एवढा कमी भाव...minimum बस भाडे पण ३/- होते...साधारण ९६-९७ साल... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

हाहाहा ... वा रे वा चालु =)) =)) =)) बरंय .. ही क्लुप्ती एकदा चालवायला पाहिजे ... !! - टार्झ न

नाही मला वाटतं "communication gap" झालीये काहीतरी. त्या रिक्षावाल्याला परवडलं नसतं ३ रुपयात. त्याचं म्हणणं होतं - अजून २ गिर्‍हाइकं मिळाली तर प्रत्येकी ३ रुपये नाहीतर ८ रुपये. असं मला वाटतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

हा हा हा लै भारी. यावरुन आठवण झाली. आमच्या औरंगाबादच्या बसस्टँडवर [आज बसस्टँड प्रतिसादात दोनदा आले. :( ]भटके ज्युस विक्रेते खेड्यापाड्यातील लोकांना असेच फसवतात. सुरुवातीला ज्युस दोन रुपयाला म्हणतात. एकदा ग्राहकाचे ज्युस अर्धे पिऊन होत आले की, हा ज्युस वाला त्या ग्राहकाच्या आजूबाजूच्या लोकांना दस रुपये मे एक. दस रुपये मे एक असे म्हणतो. वरीजनल कष्टमर भांडायला लागला की हा आजूबाजूच्या लोकांना म्हणतो. ओ,भाय साब मैने ज्युस कितने मे बोला था ? आता बोला. -दिलीप बिरुटे

अगदी सेम सेम अनुभव चुनाभट्टीच्या मैदानात भरलेल्या expo मध्ये आला...मी, आई, तिची मैत्रीण तिच्यामुलीबरोबर आम्ही गेले होतो..भेल पुरी का असं काहीतरी चार डिश घेतल्या ....आधी १०/- म्हणाला आणि डिश हातात घेतल्यावर लगेच २०/-...असं झाडला त्या भैयाला....आणि एक माद्रशीसुद्धा...दोस्याची order दिली आणि मग विचारायला आला तेल का butter ..मी म्हंटला butter ..आणि मग त्या butter चे वेगळे ५/- लावायला लागला...त्यालापण झाडला... =)) =)) =)) =)) =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

कॉलेजमधे असताना ... सारसबागेत पाणीपुरी घेतली होती आम्ही तीघी जणी होतो. आम्हाला आधी चव पाहून मग ठरवायचं होतं अजून घ्यायची की नाही ते. म्हणून फक्त एकच डीश मागवली. तर गाढवानी एका डीशमधे ३ प्लेट पाणीपुरी देऊन टाकल्या. आम्ही चापतोय. आम्हाला वाटलं एकच प्लेट संपत नाहीये. तो म्हणाला "झालं". मग आम्ही ठरवलं ही १ च प्लेट पुरे अजून नको घ्यायला.... पैसे द्यायची वेळ आली तेव्हा कळलं ३ प्लेट चे पैसे द्यावे लागणार आहेत. :( ..... "communication gap" : सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

चांगला अनुभव. रिक्षेवाल्याने पैसे परत केलेत आणि तुम्ही घेतलेत म्हणल्यावर रिक्षेवाला आणि हवालदार हवालदिल झाले असतील... :-) बाकी, पुणेरी रिक्षेवाले अनुभवाल तर मुंबईच्या रिक्षेवाल्यांना संतसज्जन म्हणायची वेळ येईल ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

एकदा मी आणि माझी पुणेकर वहिनी मंडईहून कोथरूडला रिक्षाने जायचं म्हणून मंडईजवळच्या एका रिक्षास्टँडवर गेलो. तिथे उभ्या असलेल्या रिक्षावाल्याला इमानदारीत "कोथरूडपर्यंत येणार का?" विचारलं तर त्याने चक्क नाही सांगितलं. पुढच्या एकाला विचारलं तर त्यानेही नाही म्हणून सांगितलं. मग मी चिडले आणि विचारलं "अहो पण मग तुम्ही स्टँडवर रिक्षा कशाला लावली आहात?" तर त्याने शांतपणे वरच्या "इथे रिक्षा थांबतील" या बोर्डकडे शक्तीतु-याचा सामना जिंकल्याच्या थाटात बोट दाखवलं. माझी बोलती बंद. पण वहिनी पुण्याची होती. ती लगेच म्हणाली,"असला माज दाखवाल तर लवकरच तुमचे नशीब पण इथेच थांबलेले असेल." लगेच दोघेही तयार! खरंच मुंबईचे रिक्षावाले बरे.

रिक्शावाले आणि प्रवासी या विषयावर घाटकोपर ते अधेंरी असा दुर्दैवी प्रवास रोज करणारे (माझ्यासारखे) एक पुस्तक लिहू शकतिल. रिक्शाचे मीटर कितीही होवो मी पैसे मात्र माझ्या मीटर प्रमाणे देतो आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by Dipankar

रिक्शाचे मीटर कितीही होवो मी पैसे मात्र माझ्या मीटर प्रमाणे देतो येस्स... आमचा मुलुंड चेकनाका ते विक्रोळी रोजचा प्रवास आता तर चेकनाक्याला ज्यांचे मिटर फास्ट आहे असे रिक्षावाले मी दिसल्यावर विचारायला पण येत नाहीत. तुम्ही म्हणता तसे एक पुस्तक लिहिण्या ईतके किस्से तर नक्कीच आहेत निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

शिल्पा आयडिया आवडली एकदा वापरुन बघायलाच हवी *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

वा वा.. वाचून मन एकदम भुतकाळात गेलं.. माझ्याही त्या रिक्षाच्या लायनीतल्या काही रमणीय आठवणी आहेत.. एकाला सणसणीत ठेवून दिल्याच्या! हाहाहा..

In reply to by स्मृती

खरंच फटकावल का ग त्याला ? हाताचा प्रसाद? का ग ? ......बाकि भारी अनुभव तुझा.. B) =D> *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

हाहाहा .. .हात बीत उचलायची काय गरज ? मी एका आघाऊ बिहारी भैय्याची रिक्षा रोडमधेच आडवी केली होती ... म्हंटलं उचल आता. ... साला सांताक्रुज ते चकाला १२० रुपये लावत होता =)) ~ मलिदा हो , मी ज्याला इग्नोर करतो , त्याच्याच नावाने ४ प्रतिसाद लिहीतो.. एवढा हुशार आहे मी

हल्ली मिड डे ने टॅक्सीवाले आणि रिक्षावाले यांच्याविरुध्द एक मोहीम सुरू केली आहे. मला धागा कसा द्यावा ते कळत नाही. कोणी जाणकार असेल तर कृपया येथे माहीती द्यावी ही विनंती.

>> मी सरळ ३रु . घेतले आणि चालायला लागले...हे हवालदार साहेब आणि रिक्षावाला बघतच राहिले... :applause: :applause: :applause: :applause: :applause:

चांगलं केलंत. माझ्या मेहनतीचा (http://www.misalpav.com/node/4798) उपयोग झाला म्हणायचा.

ऑ, तुमी सगळे लोकं रिक्षेवाल्याचे उणेदुणे काढूं र्‍हायलेत बॉ. आमी रिक्षावाले परत्येक अनुभवात येगयेगळे वागतो. त्याच्यामधूनच कधीकधी आगळीक व्हती. आन भौ, तुमाला सांगतो, गिर्‍हाईकंबी आजकाल लई चावनट झालेत. आवो सुट्टे पैसे देतच न्हाई. सकाळच्या पयल्या पट्यालाच १०० रुपयाची नोट काढतात. आन हवालादार किती तरास देता ते काय कमी हाय का? जावूद्या सालं, चालायचच ह्ये. चला पुडी खायची का? हिरा आहे माझ्याकडे. तुमचाच वाट बघणारा रिक्षावाला- पाभे (रिक्षावाला)