Skip to main content

पुन्हा कधी येशील?

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 09/08/2010 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
लिफ़्टचा दरवाजा दहाव्या मजल्यावर उघडला, तेव्हा आधीच चार माणसे आत होती. तरीही मारीयाने सॉरी म्हणत म्हणत कशीबशी चाकांची खुर्ची आतमधे घुसवलीच. खुर्चीत बसलेल्या अंकल मॅथ्युने कोरडा आवंढा गिळून आपला ह्या कोंबाकोंबीत काहीच भाग नसल्याचे दर्शवले. त्याची बहुदा काही गरज नव्हती. लिफ़्टमधल्या माणसांनी विकलांग अंकल मॅथ्युकडे पाहिले देखील नसावे. त्यातले दोघे लिफ़्टच्या भिंतीला सावलीसारखे चिकटून जागा करून देण्याचा प्रयत्न करत होते. बाकी दोघांनी मारीयाच्या दोन्ही बाजुंना आपापली जागा मिळवली.

शिवचरित्र :- काही अज्ञात व्यक्ति, घटना आणि नोंदी

लेखक जिप्सी यांनी सोमवार, 09/08/2010 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वासराव नानाजी मुसेखोरेकर :- महाराजांच्या पदरचे एक प्रभु सरदार.यांनी वारंवार अफजलखानाच्या तळावर फकिराच्या वेशात जाउन तेथील सर्व खबर महारांजाना पोचवली. उमाजी बिन संभाजीराजे भोसले :- महारांजाचे थोरले भाऊ संभाजीराजे यांचे पुत्र. अफजलखानाच्या पोवाड्यात खालील प्रमाणे उल्लेख आढळ्तो. पुतण्या उमाजी राजाला ! पाचशे लोक दिले त्याला !! आणि सराईत उमाजी ! राज्य होईल तुम्हाला ! अफजलखानाच्या वधाप्रसंगी उमाजीचे वय ५ होते. या साहसात महारांजाना काही अपाय झाला तर राज्य उमाजीने सांभाळावे असा बेत होता.

गोची-१

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 09/08/2010 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
कधी येणार ही बस? शेअर टॅक्सी केली तर बरे झाले असते. की चालत जाऊ? नको.

काही मल्ल्याळी शब्दोच्चार

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी सोमवार, 09/08/2010 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
***ही एक फोर्वडेड मेल आहे...मी फक्त भाषांतर केले आहे. गंमत म्हणून. त्यात कोणाळाही दुखवण्याचा अथवा खिल्ली उडवण्याचा हेतु नाही. क्षमा असावी. १) मल्ल्याळी माणसाच्या आयकरावरच्या tax ला काय म्हणतात ? उ. इन्गम डैक्स २) मल्ल्याळीज कुठे शिकतात ? उ. कोळेज्ज ३) कामात असल्याचे मल्ल्याळी कसे सांगेल? उ. ही इस वेरी बिस्सी ४) मल्ल्याळी विमानाचे तिकिट का घेतो? उ. टू गो टू थुबाई,झिम्पळी टू मीट हिस अंकळ इन गेळ्फ. ५) मल्ल्याळी गल्फ ला का येतात? उ. टू येर्न मणि ६)घराला आग लागल्यावर मल्ल्याळी न काय केलं? उ. ही झिम्प्ळी जेम्ब्ड डौन द व्हिंडो

[ती दोघ] लहान वयातील लग्न चा॑गले कि वाईट? एक अनुभव.

लेखक बरखा यांनी रविवार, 08/08/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ती दोघ हे सदर वाचले.ल्हान वयात लग्न आणि त्याचे परिणाम.आज काल हे सगळी कडे पहायल मिळ्ते.मी अगदी जवव्ळुन अनुभवलेली एक कटु सत्य घटना.आमचे अगदी जवळ्चे नाते समबधातील,त्या॑न्च्या मुलाचे ७वर्षा पुर्वी लग्न झाले.मुलाचे वय अवघे २५.मुलिचे वय अवघे१८ पुर्णला २महिने कमी.तशी घरची आर्थिक परिस्थिती खुप छान.मुलाने लग्नास नकार दिला,पर॑तु घरच्या दबावा मुळे लग्न केले.एक मुलगा झाला,पहिलै ३वर्ष सुखात गेली.मुलगी एकुलती एक असल्या मुळे,आई ने सर्व लाड पुरविले.पहिल्या मुला न॑न्तर पुन्हा दुसर्‍या मुलगा झाला.दोघातील अन्तर ४वर्ष्.बाळा॑त होउन १महिना पण झाला नाई तर भावाच्या लग्न खरेदी साठि बाळाला घेउन बाहेर फिरली,दोन

फ्रांकफुर्टर ग्रुनसॉसं

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 08/08/2010 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रांकफुर्टची खासियत म्हणजे सात हिरव्या हर्ब पासून बनवलेलं हे हिरवं सॉस. ग्यॉथेची ही आवडती डिश! इस्टरच्या आधीच्या दिवशी म्हणजे ग्रुन डोनर्सटागला म्हणजेच होली/माँडी थर्स्टडे ला हे खाण्याची प्रथा आहे. अर्थात त्यानंतर मे ते सप्टेंबर हे ग्रुनसॉस फ्रांकफुर्ट आणि परिसरातल्या मॉल्स मध्ये,रेस्तराँमध्ये हमखास मिळतंच मिळतं.

कुंडलीने घात केला

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 08/08/2010 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलीने घात केला कसा कुंडलीने असा घात केला दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला असे वाटले की शिखर गाठतो मी अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला विचारात होतो, अता झेप घ्यावी तसा पाय मागे कुणी खेचलेला खुली एकही का, इथे वाट नाही हरेक पथ येथे कुणी हडपलेला? पटू संसदेचा, तरी दांडगाई म्हणू का नये रे तुला रानहेला? दिशा दर्शवेना, मती वाढवेना कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला? "अभय" चेव यावा अता झोपल्यांना असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला गंगाधर मुटे ................................................... (वृत्त-भुजंगप्रयात)