खाणे आणि त्याचे आपल्यावर होणारे परीणाम हा मोठा विस्तृत विषय आहे. ह्या अनुषंगाने लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण जमून येत नव्हते. नुकताच मिपा वर आलेला शिल्पा चा
लेख आणि त्यातील प्रतिक्रिया वाचून शेवटी लिहायला सुरूवात केली...
आपण खातो ते अन्न , त्याचा आपल्या शरीरावर, मनावर होणारा परीणाम आणि मुख्य म्हणजे अन्नप्रक्रीयेच्या ओद्योगीकरणामुळे होणारे परीणाम ह्यावर बरेच संशोधन झालेले आहे. ह्या (आणि अजून बर्याच) विषयातील तज्ञ
डॉ. पीटर सींगर हे आहेत. जन्माने ऑस्ट्रेलीयन असलेले पीटर हे ख्यातनाम तत्वज्ञानी (नैतीकतावादी) सध्या प्रीन्सटन विद्यापीठात प्रोफेसर आहेत. त्यांनी जीम मॅसॉन या सहयोग्या बरोबर लिहिलेले
"द वे वुइ ईट : व्ह्याय अवर फूड चॉईसेस मॅटर" हे पुस्त़ वर्शभरा पूर्वी माझ्या वाचनात आले. (मराठीत : The Way We Eat : Why Our Food Choices Matter)
सध्या पुस्तक हाताशी नाहिये, पण आठवलं त्या प्रमाणे माहिती द्यायचा प्रयत्न .....
पीटर आणि जीम द्वयीने चार - पाच वर्शे अथकपणे प्रयत्न करून, ठिक-ठिकाणी फिरून माहिती गोळा करून , संपुर्ण विदा सहित हे पुस्तक तयार केले आहे. त्यात त्यांनी आपण जे अन्न खातो ते कसे तयार होते, तयार प्रोसेसड फूड कसे बनते ह्याचे संपूर्ण वर्णन केले आहे. पुस्तकातील बराचसा विदा अमेरिकेत गोळा केलेला आहे, त्या मुळे तो काही ठिकाणी भारताला / भारतीयांना लागू पडणार नाही परंतू त्यातील निष्कर्श जरूर लागू पडतील / उपयोगी येतील.
१) आपण काय खातो :
पीटर ह्यांनीं ३ कुटुंब निवडली आणि त्यांच्या खाण्या पिण्याचा, जिवन शैलीचा अभ्यास केला. त्यात ते कुटुंब कुठले अन्न घेते, कुठुन घेते, त्यांचा महिन्या चा खर्च किती होतो वैगेरे बर्याच अंगाचा विचार केलाय.
एक कुटुंब सर्वात स्वस्त जिथे मिळेल (पक्षी वॉल-मार्ट) तीथुन खरेदी करते. त्यातही मांस, जंक फूड वर जास्त भर कारण मुलांना तेच आवडते. अर्थात खरेदीला मुले पण जोडीला त्या मुळे त्यांना जे दिसते, चांगले वाटते त्या साठी हट्ट पण आलाच. कुटुंबातील मुलांना वारंवार दवाखान्यात न्ह्यायला लागत असते हे विषेश.
दुसरे कुटुंब हे जास्त जागरूक. त्यांचा कल नैसर्गिक आणि पौष्टीक खाण्याकडे. त्यातही ट्रेडर जो , व्होल फुड्स ह्या ठिकाणि खरेदी करणारे आणि जास्त प्रमाणात मांस खाणारे. त्यांचा असे खाण्यामागील उद्देश उलगडून दाखवला आहे. ह्या कुटुंबाचा मांस खाण्याचा मुख्य उद्देश की शरीराला आवश्याक ते प्रोटीन्स मिळावेत. (जे डॉ. पीटर सांगतात की आजकाल व्हिटॅमीन्स्च्या सारख्या
गोळ्यातून पण मिळू शकते.) नैसर्गीक खाण्याची ईछ्छा असली तरीही वेगवेगळ्या लेबल्स मधून (सर्टीफाइड ऑर्ग्यानीक, सर्टीफाइड ह्युमन , फ्री रेंज ..) होणारी फसवणूक इथे दाखवली आहे.
तिसरे कुटूंब हे पुर्णपणे व्हेगन आहे (जे कुठल्याही प्रकारचे प्राण्यांपासून बनलेले अन्न खात नाहीत - त्यात गायीचे दुध, अंडी, मांस सर्व आले) ह्या कुटूबाच्या अभ्यासावरून , त्यातील व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणितून, ते सर्व जण पुर्णपणे निरोगी असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. कुटुंबातील टिन-एजर मुलगी शाळेतील फुटबॉल टिमची कप्तान आहे!
तात्पर्य : पीटर ह्यांनी बरेच मुद्दे सांगीतले आहेत, त्यात महत्वाचे म्हणजे - तुम्हाला अन्न स्वस्त मिळाले असे वाटले तरी त्याचे दूरगामी परीणाम होत असतात आणि त्याची अप्रत्यक्ष किंमत बरीच जास्त असते.
आपण जे मांस , मछ्ची खातो, त्याचा अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर , मनावर परीणाम होत असतो (मला सध्या पुर्ण विदा अथवा उदाहरण आठवत नाहीये, पण ह्या बाबत पुस्तकात नेमकी माहिती आहे असे आठवते.)
२) प्रोसेसड फूड कसे बनते :
मांस (ज्यात चिकन, बीफ, पोर्क आणि फिश आले) कसे बनते ह्याचे फार विदारक चित्र डॉ. पीटर ह्यांनी मांडले आहे. मांसाचे हे वेग वेगळे प्रकार जरी वाटत असले तरी त्यांचा प्रक्रिया व्यवसाय एकत्र गुंफलेले आहेत. बीफ करताना , गायी / बैल हे पटापट वाढावे म्हणून त्यांना अनेक हार्मोनल इंजेक्षन देणे हि तर नित्याचीच बाब झाली आहे. अँटि-बायोटीक्स्चा मारा, स्वस्त असते म्हणून जनावरांना कडब्या ऐवजी कॉर्न (मका) खायला द्यायचा आणि त्याचा पचनावर परीणाम होतो म्हणून अजून वेगळि औषधे द्यायची हा प्रकार सर्रास चालतो. हे सर्व केमिकल्स असले बीफ खाल्यावर आपल्या शरीरात येते आणि त्याचे वेगवेगळे आजार होतात.
खालील परीच्छेद मुद्दाम अदृश्य केलेला आहे, हळव्या मनाच्या लोकांनी वाचू नये.
कोंबड्या वाढवताना सुद्धा बरेच अमानुश प्रकार चालतात. छोट्या खुराड्यात भरपूर कोंबड्या टाकणे , त्यांना पंख फडफडायलाही जागा नसणे ह्या दुय्यम गोष्ठी आहेत. पाच - सहा आठवड्याने कोंबड्यांचे मांस निबर होउ लागते त्यामुळे त्यांचे खाणे बंद करतात. अत्यंत अश्या उपासमारीमुळे कोंबड्या हिंसत्मक होतात, एकमेकांची पिसे ओरबाडून काढतात, काही त्यात मरतात पण. नंतर एक-दोन आठवड्याने त्यांचे खाणे परत सुरू करतात. ह्या प्रकाराने कोंबड्याचे एकूण वजन पण भराभर वाढते आणि त्या बाजारात लवकर विकता येतात.
सर्वात गलिछ्च प्रकार म्हणजे कोंबड्याच्या फार्म मधील कोंबड्यांची विष्ठा ! ही उच्च किमतीला विकली जाते, कारण त्यात भरपूर प्रोटिन्स असतात आणि तिचा वापर मत्स्यतळ्यात होतो. माश्यांना योग्य प्रकारचे खाद्य देण्यापेक्षा कोंबड्यांची विष्ठा आणि हॉटेलातले उष्टे पडलेले अन्न असे टाकले जाते. ह्यामधे अपायकारक जीव-जंतू पसरायचा खूप मोठा धोका असूनही त्याकडे काणाडोळा केला जातो.
दुध !!! अतिशय सहजपणे आपण वापरतो... पण दुध बनवण्याची प्रक्रिया अतिशय अमानवी आहे. गाय साधारणपणे व्यायल्यावर तीन ते चार महिने दुध देते. व्यायल्यावर जर पिल्लू गाय झाली असेल तर तिची रवानगी लगेच दुसर्या विभागात करतात - जेथे त्या पिल्लाला लवकरात लवकर वाढवून "दुध देण्यायोग्य" कसे करता येईल हे बघतात. हे तरी ठिक वाटेल असा प्रकार बछडा झाला तर करतात. बछड्याचा असल्या फार्म वर काहीच उपयोग नसतो. गायी गाभण करायला खास वाढवलेले बैल असतात. त्यामुळे जनमल्या जनमल्या त्या बछड्याला मरायला सोडून देतात. बर्याच वेळा त्याची आई तेथेच शेजारी उभी असते. साधारण आठवडा भरात त्या बछड्याचा जीव जातो, मग त्याचे मांस "कोवळे मांस" म्हणून विकतात आणि मांस नसलेले भाग इतरत्र खाद्य म्हणून. एखादी गाय जर आजारी पडली / घायाळ झाली तर ईलाज करयच्या खर्चाऐवजी तीला मरयला सोडून देतात.
त्याबरोबरच, जास्तीत जास्त उत्पादन करण्याच्या वॄत्तीमुळे गायींना पाठोपाठ गाभण करतात , त्यात त्यांच्या प्रकॄतीची काळजी वैगेरे शुल्लक बाबतीत कोणी काळजी करत नाहीत. गाय दुध देईना झाली की तिचे काय होत असेल हे आपल्या लक्षात आलेच असेल.
३) अन्न प्रक्रियेतील ओद्दोगीकरणाचे (दुशः) परीमाण :
अन्न प्रक्रियेच्या अनेक दुषःपरीमाणं पैकी एक म्हणजे पर्यावरणाचा र्हास. अमर्याद मछ्ची पकडल्याने काही प्रदेशांचा अगदी कायापालट झाला आहे (चांगल्या अर्थाने नव्हे, हेवेसानल). ज्यासमुद्राच्य्या भागात जाळी नुसती फिरवली की ढीगभर मासे मिळत, तिथे आता मछ्ची चा मागमुसही राहिलेला नाही. गायी आणि बैलाचे मोठ मोठाले पांजर्पोळ काढल्याने शेकडो मैल परीसरात माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. अश्या प्रदेशात मुलांना घराबाहेर खेळणे सुधा परवडत नाही कारण हवेतील मिथेन चा दर्प, इतर जंतु संसर्ग ह्याने तब्येतीवर परिणाम होतो. (कॅलीफोर्नीयात, हायवे-५ वर ह्याचा अनुभव बर्याच जणांनी घेतला असेल - तरीही ह्या प्रश्नाची सर्वात जास्त व्याप्ती मिड-वेस्ट आहे)
दुसरा प्रभाव म्हणजे अन्नाच्या ठोक (पक्षी: मास) उत्पादनामुळे दळणवळणाची वाढलेली गरज. अमेरीकेत दरवर्षी हजारो टन तांदुळ बांगलादेशातून जहाजाने येतो - त्यात कितीतरी इंधन वापरले जाते , त्यामुळे तो तांदुळ स्वस्त पडला तरी त्याचे दूरगामी दुषपरीणाम जास्त आहेत. असाच प्रकारे ऑस्ट्रेलिया , न्युझीलंड येथुन दररोज विमानाने ताजी फळे आयात केली जातात. ह्यामुळे आपण ताजी फळे खाल्ली तरीहि पर्यावरणाचे अपरीमित नुकसान होत असते हे आपल्या लक्षात येत नाहि.
हे पुस्तक वाचून पुर्णपणे व्हेगन झालेले काही लोक माझ्या पाहणीत आहेत, ईतका त्याचा खोल प्रभाव आहे. शाकाहारी खावे का मांसाहारी खावे ह्या पेक्षा जे काही प्रोसेसड फूड बनते, ते कसे बनते हे समजल्याने लोकांचे परिवर्तन झाले आहे.
जाता जाता : ह्या विषयावर संबधीत आणि मॅक-डी वर प्रेम असण्यार्या लहान मुलांना जरूर दाखवावी अशी चित्रफीत -
सुपर साईझ मी हुलुवर बघावी.
~
अडाणि.
(लेख थोडा विस्कळीत आहे कारण पुस्तक समोर नसल्याने सर्व माहिती आठवणीतून लिहिली आहे , चु. भु. दे. घे.)
फूड इन्क