'खमंग थालिपीठ' चं भाषांतर...
पुलंच्या कुठच्यातरी लेखात/भाषणात 'आता, आमच्या हिनं काय खमंग थालिपीठ बनवलं होतं, या वाक्याचं इंग्रजीमध्ये कसं भाषांतर करणार?' असा प्रश्न विचारला होता. पुलंना मराठी मनाची जाण होती, व 'खमंग, थालिपीठ' ह्या खास मराठी गोष्टी आहेत. त्यामुळे हे वाचकांना/श्रोत्यांना पटायला फारसा वेळ लागत नाही.
पण या वाक्याचा नक्की अर्थ काय? इंग्रजांकडे इतर गोष्टी आहेत पण त्यांना बिचाऱ्यांना थालिपीठाचा खमंगपणा माहीत नाही असं म्हणून स्वतःलाच हुरळवण्याचा तो प्रकार आहे का? अर्थात इंग्लिश पाकपद्धतीला जे सगळेच जण हसतात व जोडे हाणतात, त्यामुळे तेवढा भाग खराही असेल.
मिसळपाव
हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!
कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!
पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..
थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :)
दहीभात कधीही खावा..
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..
जाता जाता - हरिहरनने गायलेलं 'कृष्णा नी बेगने..' ऐका..