पुलंच्या कुठच्यातरी लेखात/भाषणात 'आता, आमच्या हिनं काय खमंग थालिपीठ बनवलं होतं, या वाक्याचं इंग्रजीमध्ये कसं भाषांतर करणार?' असा प्रश्न विचारला होता. पुलंना मराठी मनाची जाण होती, व 'खमंग, थालिपीठ' ह्या खास मराठी गोष्टी आहेत. त्यामुळे हे वाचकांना/श्रोत्यांना पटायला फारसा वेळ लागत नाही.
पण या वाक्याचा नक्की अर्थ काय? इंग्रजांकडे इतर गोष्टी आहेत पण त्यांना बिचाऱ्यांना थालिपीठाचा खमंगपणा माहीत नाही असं म्हणून स्वतःलाच हुरळवण्याचा तो प्रकार आहे का? अर्थात इंग्लिश पाकपद्धतीला जे सगळेच जण हसतात व जोडे हाणतात, त्यामुळे तेवढा भाग खराही असेल. विनोदाचा भाग सोडला तरी भाषा, संस्कृती व त्यांना जोडली गेलेली, त्यांतून घडणारी अनुभूती याबाबतचा व्यापक प्रश्न शिल्लक राहातोच. थत्तेंनी १९८४ ची ओळख करून देणाऱ्या लेखात न्यूस्पीकविषयी लिहिलं, व इतरत्र धनंजय यांनी एका माहितीपूर्ण लेखाचा दुवा दिला. त्यावरून हे विचार मनात आले.
'आमच्या हिनं केलेलं खमंग थालिपीठ' यामध्ये थालिपीठाची चव, खमंगपणा, घरात शिरताना त्या वासाने तोंडाला सुटलेलं पाणी, चाळवलेली भूक, आणि ते खाऊन झालेली तृप्ती तर आहेच. पण शिवाय ओळखीच्या, प्रेमाच्या हातची चव व त्यामागची आपुलकीही आहे. इतकं सगळं, किंवा बरोब्बर हेच शब्दाला शब्द ठेवून दुसऱ्या भाषेत कदाचित सांगता येईलही, पण तशी शब्दशः भाषांतराच्या क्षमतेची अपेक्षा अतिरेकी वाटते. पण याचा अर्थ इतर संस्कृतींमध्ये चवदार पदार्थ, तोंडाला पाणी सुटणं, भूक, तृप्ती व आपुलकी या गोष्टी नाहीतच का? आपण जेव्हा इतरांपेक्षा वेगळे असं म्हणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच मूलभूत बाबतीत साम्यं असतात हे खरं का?
एखादा समूह वापरत असलेली भाषा व तद्जन्य अनुभूती हे कितपत जोडलेले असतात? (दुव्यात विशिष्ट भाषेत डावं, उजवं, मागे, पुढे ऐवजी कायम पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर वापरणाऱ्या समूहाविषयी छान उदाहरण आहे) व्यापक दृष्टीने एखाद्या समाजाची संस्कृती (भाषा हे केवळ एक अंग झालं) ही त्या समाजाच्या, त्यातील सर्वसाधारण व्यक्तीच्या अनुभूतींना घडवते का? (थालिपीठाला, किंवा खमंगला नक्की प्रतिशब्द काय हे तितकंसं महत्त्वाचं नाही) तसं असल्यास नक्की कुठच्या पातळीला दोन समूहांमध्ये हे संस्कृतीजन्य अनुभूतीतले फरक असतात/दिसतात, व कुठच्या पातळीला साम्यं असतात? (न्यूरॉन्सच्या पातळीवर संस्कृतीजन्य फरक नगण्य असावेत...पण त्या पातळीला अनुभूतीही नसते.)
वाचने
19558
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथली चर्चा वाचावयास उत्सुक.
थालिपिठाची अनुभूती ही नुसत्या
In reply to इथली चर्चा वाचावयास उत्सुक. by Nile
मागे एकदा, खूपच पूर्वी,
In reply to थालिपिठाची अनुभूती ही नुसत्या by राजेश घासकडवी
हीची सापेक्षता
In reply to मागे एकदा, खूपच पूर्वी, by बिपिन कार्यकर्ते
थालिपिठ
In reply to थालिपिठाची अनुभूती ही नुसत्या by राजेश घासकडवी
थालिपिठ
In reply to थालिपिठाची अनुभूती ही नुसत्या by राजेश घासकडवी
खरपूस
आमच्या हिनं केलेलं खमंग
तात्या, थोडा सहमत, थोडा
In reply to आमच्या हिनं केलेलं खमंग by विसोबा खेचर
मला माहीत नाही पण माझ्या
पुपे, ते विशिष्ट वाक्य
In reply to मला माहीत नाही पण माझ्या by llपुण्याचे पेशवेll
संस्कृती, अनुभूती, भाषा
तुमचा प्रतिसाद आवडला.
In reply to संस्कृती, अनुभूती, भाषा by चिंतातुर जंतू
अप्रतिम प्रतिसाद जंतु.
In reply to संस्कृती, अनुभूती, भाषा by चिंतातुर जंतू
सुंदर प्रतिसाद
In reply to संस्कृती, अनुभूती, भाषा by चिंतातुर जंतू
चिंतातुरजंतू
In reply to संस्कृती, अनुभूती, भाषा by चिंतातुर जंतू
स्वभाषाभिमान कशाचा असावा?
In reply to चिंतातुरजंतू by Pain
लेखातला मुद्दा थोडा कळला आहे
लेखातला मुद्दा कळला नाही...पण जे कळले आहे असे वाटते तिथून सुरु
In reply to लेखातला मुद्दा थोडा कळला आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
गल्लत होतीये का?
In reply to लेखातला मुद्दा कळला नाही...पण जे कळले आहे असे वाटते तिथून सुरु by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कठीण नाही
In reply to गल्लत होतीये का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
भुरके मारत आमटीचा लुत्फ लुटला
In reply to कठीण नाही by सहज
वेल दोन्ही कडच्या
In reply to भुरके मारत आमटीचा लुत्फ लुटला by ३_१४ विक्षिप्त अदिती
भाषेची खुमारी
In reply to गल्लत होतीये का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
इंग्रजीतले 'डार्क' म्हणजे
In reply to भाषेची खुमारी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
आगरकर घरी आहेत काय
पुणेरी
In reply to आगरकर घरी आहेत काय by यशवंतकुलकर्णी
-१
In reply to पुणेरी by नितिन थत्ते
-१ ला -१
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
मला तर मिपाकरांचा
In reply to -१ ला -१ by अवलिया
आँ
In reply to -१ ला -१ by अवलिया
हात्त्याच्या
In reply to आँ by नितिन थत्ते
हॅहॅहॅहॅहॅ. एकुण
In reply to आँ by नितिन थत्ते
प्रत्येक भाषेचा बाज, घाट
हम्म
मंगेश पाडगावकरांचं एक वाक्य
रस्सम
In reply to मंगेश पाडगावकरांचं एक वाक्य by विसोबा खेचर
मिसळभोक्ता
In reply to रस्सम by मिसळभोक्ता
हे पहा
In reply to मिसळभोक्ता by Pain
धन्यवाद पण "वाथापि गणपती असा
In reply to हे पहा by सुनील
वरील सर्व प्रतिसाद वाचुन(आणी
वरचा तुमचा प्रश्न..."प्रश्न
चवीने खाणार त्याला..नावाचा
हम्म
+१
In reply to हम्म by सुनील
शेवटी शीर्षक गल्ली चुकलचं!
In reply to हम्म by सुनील
चर्चा वाचतेय. चिंतातूरांचा
स्वाती, तुमचा प्रतिसादही छान
In reply to चर्चा वाचतेय. चिंतातूरांचा by स्वाती२
मला सगळ्यात आवडलेला प्रतिसाद
In reply to चर्चा वाचतेय. चिंतातूरांचा by स्वाती२
वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी व्याती असलेले शब्द
कोडं वेगळंच आहे.
In reply to वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी व्याती असलेले शब्द by धनंजय
अनुभुती - संस्कृती - भाषा
प्रतिसाद.
शीर्षक, न्यूस्पीक वगैरे
मी! मी!! मी!!!!!
In reply to शीर्षक, न्यूस्पीक वगैरे by श्रावण मोडक
नशीब!
In reply to मी! मी!! मी!!!!! by पिवळा डांबिस
प्रत्येक संस्कृतीत चवदार पदार्थ, तोंडाला पाणी सुटणं, भूक, तृप्ती
लेख
भाषेचे सौंदर्य
लेख