Skip to main content

अळुवडी

लेखक प्राजक्ता पवार यांनी गुरुवार, 02/09/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य : अळुची पाने ५ - ६ डाळीचे पीठ - २ वाट्या तांदळाचे पीठ - २ चमचे हिरव्या मिरचीचे वाटण लाल तिखट तीळ - २ चमचे मीठ चिंचेचा कोळ - २-३ चमचे गुळ अळुच्या पानांची देठे आणी जाड शीरा कापुन घ्याव्यात. डाळीचे पीठ , तांदळाचे पीठ , मिरचीचे वाटण , लाल तिखट , मीठ ,तीळ , गुळ व चिंचेचा कोळ एकत्र करावे. त्यात थोडे पाणी घालुन जाडसर असे पीठ भिजवावे. अळुच्या पानाला मागच्या बाजुने हे पीठ लावावे. त्यावर दुसरे पान ठेवुन पुन्हा पीठ लावावे. अश्याप्रकारे ३-४ पाने झाल्यावर एका बाजुने गुंडाळी करत त्याचा रोल ( उंडा ) तयार करावा. हा रोल कुकर अथवा स्टीमर मध्ये १५ मिनीटे वाफवुन घ्यावा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापुन शॅलो फ्राय कराव्यात.

वाचने 6968
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

वर फोटो दिसत नाहीत. आळुची वडी मला खुप आवडते.अजुन माझ्या मित्राच्या घरी एकदा पुर्ण तळुन काढलेली आळुची वडी मी खाल्ली होती. ती देखिल एकदम मस्त चवीला लागते.आळुची वडी व टोमॅटोसॉस खावुन बघा ,मस्त लागते.

अळुवडी मला फार आवडते,बर्‍याच दुकानात बनवलेली अळुवडी हादडली आहे,पण ठाण्याच्या खंडेलवालमधे मिळणारी अळुवडी जबरदस्त असते. :)

फोटो?

मला पण हा प्रश्न पडतो,कि अळुवडी हा महाराष्ट्राचा पदार्थ आहे कि राजस्थानचा? मिठाईच्या दुकानात अळुवडी एकदम झक्कास बनवतात.

अळूवडी झक्कास ! वडीसाठीचे अळू वेगळे असते. त्याची देठे काळपट असतात आणि पानेही भाजीच्या अळूपेक्षा किंचित जाड असतात. भाजीच्या अळूचे देठ हिरवट असतात. देठांचे भरीत- देठीही मस्तच लागते. तसेच अळूचे कंद- अळकुड्या/अरवी यांचे भरीत आणि भाजी दोन्हीही फार छान होते. स्वगत- अळूची भाजी,वड्या खायला कधी मिळणार? स्वाती

किंचित कच्चे तेल सोडलेल्या स्टीम्ड अळूवड्यादेखिल चांगल्या लागतात (तव्यावर परतल्याच पाहिजेत असे नाही) बाकी पाकृ एकदम परफेक्ट!

मस्तच! एकदम खमंग दिसताहेत वड्या!! :) (अळुमाळू) चतुरंग

देठांचे भरीत कधि खाल्ले नाहि....कसे बनवायचे?

अळूवडी ह्या शब्दाचा एक वेगळाच अर्थ आम्हाला माहिती होता. (तरूण मुलेमुली एकत्र क्यांपला गेल्यावर बर्‍याचदा ऐकू यायचा तो.) त्यामुळे, पास.

पाक कृती आवडली. अळूच्या देठांची देठी / भरीत बनवणे सोपे आहे. देठांवरील पातळ पापुद्रा काढून टाकावा. मग ही देठे बारिक चिरुन कुकर मधे वाफवून घ्यावीत. त्यात थोडे मीठ, चवीपुरती चिमुट्भर साखर, थोडे शेंगदान्याचे कूट घालावे. दही घालावे. वरून तूप्,जिरे आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्यावी. चविष्ट देठी तयार !