एका तडीपाराची जबानी
ही जाहीर जबानी सुरू करण्याअदुगर सम्पाद्क मंडळाम्होरं काही मुद्दे मांडू इच्चितो. कारन मी ल्हिलेलं त्येंनी पुसून टाकल्यास पब्लिकला ही जबानी वाचाय कशी मिळ्णार? तर क्रपया हे पुसू नै.
१. आताचा मी यशवंत एकनाथ म्हणजे पूर्वीचा यशवंतकुलकर्णी; जो त्यानं इथं काही गुन्हे केल्यानं तुमच्या नजरेत सध्या तडीपार हाये.
२. आताचा यशवंत एकनाथ हा आयडी दोन वर्सांपूर्वी मला देन्यात आला हुता. काल पात्तुर मी ह्यो कदीच वापरलेला न्हाई कारन तो मला देन्यात आला हाये हेच मला ठावं नव्हतं. तडीपारीच्या काळात जुन्या वह्या चाळताना मला हा आयडी गावला आन तो वापरून मिसळपावच्या दाराला सहज धक्का मारला तर काय! खुल्ललं ना दार!
मिसळपाव