साहित्य :- चिरलेली कोथिंबीर एक मोठी वाटी, हरबर्याच्या डाळीचे पीठ १ मोठी वाटी, धने जिरे पुड १/१ मोठा चमचा,चवीप्रमाणे मीठ, फ़ोडणीचे साहित्य, आले मिरची पेस्ट १ चमचा, तेल.
कृती :- प्रथम कोथिंबीर धुवुन घेउन त्यात धने जिरे पावडर,मीठ, हळद, हिंग, आले मिरची पेस्ट, घालुन घ्यावे. त्यातच बसेल तसे डाळीचे पीठ घालावे. पीठ जास्त घालु नये.थोडे पाणी घालुन वरील मिश्रण चांगले मळुन घेउन त्याचे लांबट गोल असे उंडे करावेत.
ते मोदकाप्रमाणे वाफ़वुन घ्यावेत.
जरा गार झाल्यावर सुरीने तुकडे पाडुन घ्यावेत.
एका कढईत तेलावर राई, जिरे, हिंग, हळद घालुन या वड्या / तुकडे त्यावर घालुन चांगले परतुन घ्यावे आणि वरुन खोबरे घालुन खायला घ्यावे..
प्रतिक्रिया
वा वा एकदम मस्त.....
मस्त आहे श्रावण मेनु...
आ हा हा...
झकास!!!
मलाही !!!
तोंडाला पाणी सुटलं
टोन्डाला* पाणी
जेव्हा जेव्हा टोण्डाला पाणी
In reply to टोन्डाला* पाणी by इंटरनेटस्नेही
मस्त
एक सुचवु इच्छीतो.
सुंदर..
श्रद्धा मस्तच आहे रेसिपी.