Skip to main content

फ़ुलझडी..........!!!!

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 24/08/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलझडी..........!!!! तो.... चार शिष्य,चार चेले, चार चमचे मागेपुढे चालायला, उदोउदो करायला कायम आपल्या दावणीला बांधून स्वत:च स्वत:विषयी लिहिलेले पोवाडे गाऊन घेतो त्यांचेकडून आणि एवढ्या शिदोरीच्या बळावर वाढवू पाहतो.... आपल्या श्रेष्ठत्वाच्या कक्षा......!! ते.... ते भक्तही तल्लीन होतात लोळवून घेत स्वत:ला त्याच्या चरणावर वारंवार त्याच्या पायाच्या धुळीचा मस्तकाच्या मध्यभागी टिळा लावत... होतात बेभान जणुकाही त्या चरणाखेरीज अन्य सर्वकाही निस्तेज,निष्प्रभ अशी स्वत:चीच मनसमजावणी करत... सदासर्वकाळ....!! क्षणिक का होईना पण चित्तवेधक ठरत असतेच फ़ुलझडी..........!!!! . . गंगाधर मुटे .............................................................................
लेखनविषय:

वाचने 902
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया