Skip to main content

मुक्ती

लेखक पारा यांनी मंगळवार, 02/11/2010 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्ती...शेकडो वर्षे ज्या विषयावर संशोधन चालू आहे त्यावर फारसा काही व्यासंग नसताना लिहिणे हे एक धाडसच म्हणावं लागेल. माणसाने आजवरच्या आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये विलक्षण प्रगती केलेली आहे. भूकंप, ज्वालामुखी सारख्या निसर्गनिर्मित भयांमधील सत्यतेचा शोध त्याने लावला. ग्रहणांना घाबरणारा मानव ह्या सावल्यांच्या खेळांना मागे टाकून, मंगळ पादाक्रांत करायची स्वप्ने पाहू लागलेला आहे. या सर्व प्रगती मागे विज्ञानाचा फार मोठा वाटा आहे.

महिला राज

लेखक प्रमोद सावंत१ यांनी मंगळवार, 02/11/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याप्रमाणे गुलामगिरी, धूम्रपान व स्त्रियांच्या अधिकारातील कमतरता इतिहासजमा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, सरंजामी वृत्ती व भ्रष्ट अकार्यक्षम लोकशाही इतिहासात जमा करणे शक्य आहे. पूर्वी स्रियांना अधिकार कमी होते. इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाहीतही शंभर वर्षांपूर्वी महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत वेतन समानता तर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शक्य झाली. भारतात स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढावे लागले नाही. पंचायत राज आणले तेव्हा ३३% जागा स्त्रियांसाठी आरक्षित ठेवल्या. संसदेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

शब्द होती मूक तेव्हा रंगते ही भैरवी..

लेखक स्वैर परी यांनी मंगळवार, 02/11/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर ई पेपर वाचत असताना, ई-सकाळ वर एक अतिशय भन्नाट धागा सापडला आहे.मुलतानी ते भैरवी या शीर्षका खाली दिलेली रागमाला आवर्जुन ऐकवी अशी आहे. त्या बद्दल पुरविलेली महिती अशी: न्यू जर्सीच्या विश्र्व नाट्यसंमेलानात पुण्याच्या भरतनाट्य संशोधन मंदिराने सादर केलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाने मराठी माणसांची मने जिंकली. याच नाटकातली गाजलेली रागमाला भरतच्या सहकार्याने ई-सकाळच्या वाचकांसाठी सादर केली आहे. पुरूषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं.

भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे का?

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 02/11/2010 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे भारताबाहेरचे दोस्त आम्हाला लै म्हणजे लै शिव्या देतात. भारतात लै भ्रष्टाचार आहे.. असे आहे तसे आहे.. च्यायला ऐकुन घ्यावं लागतं ! एक तर आपण पडलो अडाणी... जगात काय चालतं कसं चालतं याची *ट कल्पना आपल्याला नाही! पण आपले काही दोस्त आहेत... अधुन मधुन काहीतरी सांगतात... लै चांगले आहेत मनाने.. देव त्यांना भरपुर आयुष्य देवो !! आता आमचे असे पण दोस्त आहेत.. जे शिव्या देतात.. पण मन साफ आहे त्यांचं.. एकदम साफ ! भारत मोठ्ठा व्हावा असंच त्यांना नेहमी वाटतं... आणि असा मोठा व्हायला त्यांची अडचण येऊ नये म्हणुन ते लायकी असुनही दुसर्‍या देशात जातात..

काजु कतली.. मदत पाहीजे..

लेखक पंख यांनी मंगळवार, 02/11/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून मित्रांकडून काजु कतली या पदार्थाचे नाव ऐकत आहे.. मी तरी कधीही हा पदार्थ पाहिला नाही, खाण्याचे तर दूरच .. पण माझ्या मित्रांना हे समजल्यावर त्यांनी मला वेड्यात काढले. ते विश्वास ठेवायलाच तयार नाहीत कि मी काजु कतलीपासून ईतका अनभिज्ञ असेल. मलाही एकवेळ वाटले कि मला हा पदार्थ माहितीही असेल पण कदाचित वेगळ्या नावाने.. म्हणून मी मित्राला फोन करून काजु कतलीचे एक 'सुरेख' चित्र पाठवायला सांगितले..

वाट हरवलेल्या काही कविता

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 02/11/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वहीवरल्या अर्ध्यातच वाट हरवलेल्या काही कविता, कधी कधी भांडण उकरून काढतात माझ्याशी ... तुझ्यामुळेच आम्ही हरवलो, आता कळत नाहीये... जायचे कुठे ? अन थांबायचे कुठे ? त्यांची समजूत घालण्याकरता मग मी शोधतो अजून एखादी ओळ .. अन त्यांना मुक्कामाला पोहोचावायाच्या नादात मात्र .. मी स्वतःच हरवतो ...

हे सुरांनो चंद्र व्हा

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 02/11/2010 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही, पण त्या काळांत गाणं जास्त लक्षात राहिलं ते त्या गायिकेच्या दिसण्यामुळं, तिचा चेहरा आणि तिची तवला वाजवणा-या कडं पाहतानाची नजर, त्या नजरेत एक प्रकारचा धाक होता किंवा अधिकार होता. हे गाणं चारच ऒळींचं, अगदि टिपीकल नाट्यसंगीत, थोडेसेच शब्द आणि त्या बरोबरच्या सुर, आलाप, तानांच्या नाना हरकती.