मी देशी घेत नाही.
काल रात्री झोप येत नव्हती, २ वाजले तरी ह्या अंगावरून त्या अंगावर, हेच चालले होते, मग कंटाळून गच्चीवर गेलो, तर मला खालील शोध लागले, मी उरेका उरेका म्हणून बोंबललो तर बायकोने आणि काही आजूबाजूच्या लोकांनी मला लाथा घातल्या, मग मी निमुटपणे खाली आलो, आणि झोपलो. आणि सकाळी उठून हे टंकत आहे. तरी सुद्धा आपण सगळे शोध नीट वाचावेत हि विनंती,
तर मला काही शोध लागले आहेत, ते मी इथे देत आहे, ते विचार करून आपणा मला एखादे मोबेल पारितोषिक वगेरे द्यावे नाहीतर मग माझ्या बायकोसारख्या मला येऊन लाथा घालाव्यात, माझा पत्ता मी देईनच, पण अगोदर माझे शोध वाचा, मी आपल्या सगळ्या शंकाचे पूर्णपणे निरासरण करणार आहेच, पण ते पुढच्या लेखात, ह्या लेखात फक्त माझे शोध.
१) पृथ्वी सपाट आहे.,
मी मागे एकदा आपल्या पुण्याच्या नेहरू खेळाच मैदान बघायला गेलो होतो, काय मस्त गुळगुळीत मैदान आहे ते, बघून मला एक शोध लागला होता, तेव्हा कोणाला सांगितला नाही, काल सांगितला आणि मार खाल्ला.
२) सूर्य आणि चंद्र एकाच आकाराचे आहेत, (म्हणजे त्यांचा व्यास सारखा आहे )
नाही नाही माफ करा , चंद्राचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा निम्मा आहे. हा एकदम बरोबर.
नक्की लक्षात येत नाहीये, पण असंच काहीतरी.
३) आपला शनिवार वाड्यापाशी एक खूप मोठा ज्वालामुखी आहे (सुप्त आहे , तो कोणाला दिसणार नाही), तेथे खूप जड मुलद्रव्य सापडतात, त्यामुळे मला असे वाटते कि शनिवार वाडा आपल्या पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य आहे.
३) रात्री वर गच्चीत उभे असताना मला क्षितिजावर चंद्र दिसत होता, त्या चंद्राच्या आणि माझ्या मधून एक जर रेषा काढली तर ती कदाचित लंडन ला छेदून जाईल. असा मी एक निष्कर्ष काढला (मी कधी लंडन गेलो नाही कि चंद्रावर जाण्याची लायकी नाही. खरतर लंडन ला देखील जाण्याची लायकी नाहीये, पण हे दुष्ट कंपनीवाले हाकलतात अधून मधून. जाऊ द्या सोडा. माझे रडगाणे काय चालूच राहील. )
४) दिवसभर मोबायील वरून बोलून बोलून माझे डोके खूप दुखते, म्हणून मी डोक्याला एक तांब्याची तर बांधून ठेवली आहे, आणि तिचे दुसरे टोक जमिनीवर घसरत जाईल अशी ठेवली आहे, आपण नाही का घरात ३ पिन वापरत, त्याची एक तार earthing करतो, अगदी तसेच,.आणि माझे डोके एकदम दुखायचे थांबले. हे मी पेटंट ला टाकण्याचा विचार करत आहे.
५) मला वाटते कि जगात मीच भारी आहे.
तर मग कसे काय वाटले माझे शोध ?
ह्या सगळ्यांची थेअरी मांडताच आहे एक दोन दिवसांत. मात्र मला दाट शंका आहे कि काही जणांनी माझा शोध निबंध अगोदरच ढापला आहे, पण हरकत नाही, मोबेल पारितोषिक मलाच मिळेल ह्याची मला खात्री आहे. आपण सगळे पांढरपेशी, काळपेशी, आहेरे, नाहीरे गटातले A to Z माझ्या बरोबर जे आहात.
चला तो पर्यंत तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
सुज्ञांना जर काही (सु)वास येत असेल तर त्यांनी प्रतिक्रिया न दिलेल्याच बऱ्या. (keep silent)
याद्या
5119
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी काही तज्ञ नाही पण शोध
+१
In reply to मी काही तज्ञ नाही पण शोध by अर्धवट
गांधीवादी तुम्ही दांडीयात्रा
काल रात्री झोप येत नव्हती, २
>>काल रात्री झोप येत नव्हती,
In reply to काल रात्री झोप येत नव्हती, २ by अनामिक
हाहाहा. पडलो मी वाचुन.
In reply to काल रात्री झोप येत नव्हती, २ by अनामिक
>> मी देशी घेत नाही. फक्त
अभ्या... मेलोऽऽ..............
In reply to >> मी देशी घेत नाही. फक्त by अभिरत भिरभि-या
काल रात्री झोप येत नव्हती, २
बाप रे......
आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत, ह्याच्याशी संबंध नाही.
देव जाने कोण त्यांचा कसा
In reply to आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत, ह्याच्याशी संबंध नाही. by गांधीवादी
गद्य शरदिनी आहे वाटतं... शरद