Skip to main content

रँडम जोक

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 12/11/2010 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा मध्यरात्री एका घरात चोर शिरतो. नवरा-बायको झोपलेले असतात. नवर्‍याच्या घोरण्यामुळे बायकोची झोप चाळवते आणि तिला कपाट उघडायचा प्रयत्न करणारा चोर दिसतो. ती आरडाओरडा करणार इतक्यात चोर तिच्या तोंडत बोळा कोंबतो, तिचे हात-पाय बांधतो आणि कामाला लागतो. खुडबुड ऐकून नवर्‍याला जाग येते. तो डोळे किलकिले करून बघतो तर बायको तोंडात बोळा आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत आहे आणि चोर कपाटातलं सामान बॅगेत भरतोय. ते बघून नवरा चोराला म्हणतो "बाबा रे, तुला काय हवं ते घेऊन जा. पण कॄपा करून हिच्या तोंडातला बोळा नको काढूस." - आदि जोशी

(निशाण)

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 12/11/2010 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://misalpav.com/node/15406 जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे कुणास न झुकते माप इथे व्यास प्रतिभेचा सन्मान आहे मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे परंतु केवळ लालसेपायी मानवधर्म तो गहाण आहे पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे दिसता सामोरा मृत्यु अटळ त्याला धर्म आठवत आहे रजस्वलेची फेडुनी वस्त्रे अंकी बसण्या बोलवत आहे अंधपुत्रा फोडीन तीच मांडी भीम दरबारी गर्जत आहे अजुनी नसे जो जन्मला सुड त्याजवर उगवत आहे अशा अधमांच्या कपाळी अमरत्वाचा शाप आहे कुणास न झुकते माप इथे व्यास प्रतिभेचा सन्मान आहे

निशाण

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 12/11/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
जय नावाचा इतिहास जो सारे जेत्यांचेच लिखाण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी वचन गुरुंचे महान आहे एका अंगठ्याच्या कर्जापायी गुरुधर्म तो गहाण आहे सूताघरी सूर्यपुत्र दानी वंचनाच नियतीचे दान आहे धर्माची चौकशी करतो ईश्वर उरी भावाचाच बाण आहे जरी सुयोधन अंधपुत्र तू राजपदीही अपमान आहे सत्तालोभ धर्माधर्म कधी कमरेखालीच प्रहार आहे कर्मयोगाची करुनि भलामण हरला गुरुचाच प्राण आहे सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे चिरंजीव विराण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे.....
काव्यरस

घोटाळे इथले संपत नाही...

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 12/11/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
घोटाळा केला म्हणुन अशोकरावांची गच्छंती झाली ! आता काही जण म्हणतात की त्यांनी नावात "राव" लावले म्हणुन सोनियाबैंनी त्यांना "जाव" म्हटले. पण ते अंधश्रद्धाळू लोक ! त्यांच्याकडे आपण दूर्लक्ष करावे. अशोक राव गेले पृथ्वीराज आले. स्वच्छ चेहर्‍याचा मनुष्य महाराष्ट्राच्या भूमीवर राज्य करेल असे स्वप्न राहुलबाबांनी दाखवले. जनता आतुर झाली आणि फुलापाकळ्यांचा वर्षाव करुन वर्षा चे दार उघडले ! हळुच अजितदादांनी भुजबळांच्या भुजांमधले बळ काढुन घेतले पण मंत्रीपदाची शपथ देऊन बांधुन ठेवले. हा इतिहास जूना नाही. सगळं कसं पद्धतशीर आणि व्यवस्थित चालू होतं पण म्हणतात ना काही जणांना हे पाहवत नाही. तेच झालं.

त्रिमिती: चित्रपट ते भ्रमणध्वनी

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 12/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, 'छोटा चेतन' द्वारे. आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला 'शिवा का इन्साफ'. 'सामरी' सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :) त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी पुस्तके आणून वाचण्याचा कार्यक्रम झाला. नंतर आलेली 'छोटा चेतन'ची नवीन आवृत्ती हरीश आणि उर्मिला मातोंडकरला सोबत घेऊन.

रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 12/11/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आजची सकाळ...!!

लेखक झक्कास... यांनी शुक्रवार, 12/11/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाला काय नाव देऊ सुचतच नव्हतं..शेवटी आज सकाळी पाहिलेला प्रकार होता म्हणून आजची सकाळच देऊ अस ठरवलं. असो... झाल काय नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला जायला निघालो . ऑफिस अगदी सातासमुद्रापलीकडे असल्यामुळे( अस मला वाटत) बस ची वाट पाहत होतो ( बस हि ऑफिस ची आहे ) तर सहज समोर लक्ष गेल... सकाळी सकाळी पुण्यात रस्ते झाडणारे सफाई कामगार दिसतातच... एक स्त्री आणि एक पुरुष दोघे मिळून रस्ता झाडत होते... त्यांच्या निरीक्षणावरून अस दिसत होत कि त्याने रस्ता झाडव आणि तिने कचरा गोळा करून हातात असलेल्या भल्या मोठ्या dustbin मध्ये तो कचरा टाकावा... पण चित्र काही विचित्रच होत.

डाविकडुन उजविकडे तोंड आनि शेपुट हलविनारि गोगलगाय

लेखक नरेशकुमार यांनी शुक्रवार, 12/11/2010 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घराच्या मागे हि भेटलि, हिच तोंड डाविकडुन उजविकडे होत होते. शेपुट सुद्धा हलत होत. हिच कवच खुप कड्क असत, एवढच माहितिये, अजुन कोनाला माहिति अस्ल्यास प्रतिक्रिया द्या. हळुहळु चालते गोगलगाय, पोटात पाय असतात असे ऐकले आहे. खायला खुप छान लागते, अस ऐकलय, पन मि नाहि खाल्लि अजुन. कोन खात असल्यास रेसेपि पण द्या. (माझि आजि माझ्या बायकोला गोगलगाय म्हनते. का ? ते माहित नाहि. कोनाला समजल्यास ते सुद्धा लिहा.) खुप मुश्किलिने लिहिले आहे, अध्यक्शान्ना विनंतिं हे उडवु नका. प्लिज