Skip to main content

जुन्या आणि नव्या काळची गोष्ट

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 12/11/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी एक मस्त गोष्ट वाचली होती काहीशी अशी की एका शेतकर्‍याची बायको अतिशय असंतुष्ट असते आणि तिला मोठं घर हवं असतं. मग शेतकरी १ युक्ती करतो त्याच्या लहान घरातच कोंबड्या, बकर्‍या, गाय आणून बांधतो. खूप दिवस जातात बायको त्रागा करते करते पण शेवटी रुळते. असह्य दुर्गंधी, अजीबात जागा नसणे या गैरसोईंमध्ये दोघे रहात असतात.

समाधी साधन

लेखक यकु यांनी शुक्रवार, 12/11/2010 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. शरद यांच्या दर्शने या लेखमालेदरम्यान झालेल्या साद-प्रतिसादात संतांची समाधी याबद्दलच्या माझ्या वेगळ्या दृष्टीकोनात, प्रियालीताई म्हणतात त्याप्रमाणे, मी पिल्लू सोडले सोडले होते. प्रशांत, बिकांनी पुराव्यासहीत याबद्दल लिहीण्याचा आग्रह केला आहे; म्हणून मी हे लिहायला बसलो आहे. पण संपादकांच्या सूचनेवरून केलेल्या या लिखाणामुळे सर्वांचीच माझ्यावर इतराजी होऊन या आयडीलाच जीवंत समाधी दिली जाईल की काय अशी शंकाही मनात आहे. पण विचारा विचारात खेळ न गमावता लिहीतोच.

जुने घर

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 11/11/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच घर शिफ्ट केले. जुण्या घराच्या काही आठवणी लिहावे म्हणत होतो .. पण काही केल्या लिहिताच येइनात.. कीती आहेत त्या आठवणी .. कधी एक गोष्ट आठवते तर लगेच दुसर्या गोष्टीमुळे मन भावुक होते.. त्यामुळे काही निटसे लिहिताच येत नव्हते. तरीही काही तरी लिहित आहे .. व्यवस्थीत नाहीये जास्त पण मनाच्या हळवेपणामुळे नाही लिहु शकत आहे चांगले ..आणि येथेही विचार करुन नाही ..जसे आठवत आहे तसेच शेअर करावेशे वाटत आहे म्हनुन आपणा समोर देतो आहे --- मी पहिलीत जावु लागलो तेच आमच्या छोट्याश्या पण मस्त घरातुन .

आई.. मिटलेला श्वास - ६

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 11/11/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५: http://www.misalpav.com/node/15255 पार्श्वभुमी : गावाकडे शांत तळ्यावर बसल्यावर, त्याची सुक्ष्म लाट ही मनावर आघात करते आणि विचारधारेच्या प्रवाहात मन हळुच वाहु लागते तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा तरंगीत सुक्ष्म लाट मनपटलावर विरता तिमिरात सामावते अखंड विचारधारा ---------- शब्दमेघ
काव्यरस

ईमोशनल अत्याचार

लेखक रन्गराव यांनी गुरुवार, 11/11/2010 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिपाकर लेखक एकदम पेटले आहेत. कुणी किल्ल्याची तर कुणी विडीची आठवण करून देतय. कुणाला चिंचा आठवल्या तर कुणाला शाळेतल्या गुणपत्रिका. आणि नानांनी मनीमाऊची आठवण करून दिली. एकावेळी असला एक नोस्टाल्जीक लेख व्याकुळ करून जातो आणि आज चक्क जवळ्पास अर्धा डझन लेख वाचून आपल्या आयुष्यात आपण सगळच हरवून बसलो आहे अस वाटायला लागलय! ह्या दर्जेदार लेखनांचा अचानक महापूर येण्याचा कारण काय असेल कोणी सांगेल का? कुठला विशिष्ट पक्ष (पितृ पक्षात असाच पूर्वजांवरील लेखांचा पूर आल्याच आठवतय) वगैरे चालू आहे की काय?

हेलीओस..

लेखक गवि यांनी गुरुवार, 11/11/2010 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचकांपैकी विमानात खूपदा बसणारे किती असतील माहीत नाही. पण पूर्वीपेक्षा विमान प्रवास आता सहज केला जातो. मला आज तथाकथित साहित्यिक मूल्य नसलेलं काहीतरी लिहिण्याची खूप इच्छा होतेय. म्हणून माझा आवडता विषय विमानाचे अपघात (शुभ बोल ना-या..) घोळवत होतो डोक्यात. त्यात मला काही अपघात असे आठवले की जे खूप विचित्र किंवा वेगळे आहेत. साउंड्ज इंट्रेस्टिंग..?? सायप्रस देशात हेलीओस एअरवेज नावाची विमान कंपनी होती.

भारतातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था: एक बट्ट्याबोळ

लेखक प्रमोद सावंत१ यांनी गुरुवार, 11/11/2010 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणपध्दतीचा विचार करता देशाची साक्षरता आकडेवारीत वाढवण्यावर आपण भर देतो. पण माध्यमिक शाळांतून विद्यार्थांची होणारी गळती ही आपली खरी समस्या आहे. गावात तर ही समस्या अतिशय जास्त आहे. भारतातील साडेसहा लाख खेड्यांमध्ये जवळजवळ सर्वत्र पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पण आठवीपर्यंत शिक्षण देणा-या फक्त सवादोन लाख व मॅट्रीकपर्यंत शिक्षण देणा-या शाळा , तर दीड लाखांहून कमी आहेत. ही सरकारी आकडेवारी झाली . शाळा आहे म्हणजे तेथे शिक्षक,फळा,छत असलेली ईमारत,पटांगण इत्यादी सुविधा आहेत, असा गोड गैरसमज करुन घेणे चुकीचे होईल.

गुजरातच्या प्रगती§

लेखक सुकामेवा यांनी गुरुवार, 11/11/2010 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरातच्या प्रगतीची ही बातमी वाचून आनंद झाला अशी प्रगती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते का

तो.पा.सुटल की नाही ?

लेखक जागु यांनी गुरुवार, 11/11/2010 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचीतच आढळतील. मी लहान असताना भरपुर चिंचा खायचे. शेताच्या बांधावर जाऊन झाडावर दगड माडून चिंचा पाडायच्या आणि तिथेच झाडाखाली बसुन घरुन पुडीत बांधून आणलेला मिठ मसाला लावुन खायचा हे उद्योग बर्‍याचदा चालायचे. असे खाउन मन नाही भरायच तेंव्हा त्याच चिंचा घरी नेउन परत त्याची चटनी बनवायची आणि खायची. गोबोळी चिंचा शोधायलाही मजा यायची. चिंच हलवायला खास माणूस यायचा तेंव्हा मग त्या पिकलेल्या चिंचेत एखादी गाबोळी चिंच मिळाली की खुप आनंद व्हायचा.