अनंतमुखी मुशर्रफ
अनंतमुखी मुशर्रफ
आपण ब्रह्मदेवाला चार तोंडे आहेत असे आपण मानतो व म्हणून त्याला ‘चतुरानन’ म्हणतो. तसेच लंकापती रावणाला दहा तोंडे होती म्हणून त्याचा उल्लेख ‘दशानन’ असा केला जातो. पण मुशर्रफ इतक्यांदा आपली निवेदने बदलतात कीं त्यांना किती तोंडे आहेत हा एकाद्या संशोधनाचाच विषय व्हावा! "या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे" त्यांचे चातुर्य पहाता त्यांना एका वेगळ्याच अर्थाने "चतुरानन ("चतुर+आनन)" म्हटले पाहिजे. एका पाठोपाठ परस्परविरोधी निवेदने करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाहीं. कसलाही विधिनिषेध न ठेवता ते असे करतात. खरं तर हे गृहस्थ इतके वारंवार रंग बदलतात कीं त्यांना मी तर‘सरडा (Chameleon )’च म्हणतो!
मिसळपाव