मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बुलबुल तरंग - माहिती हवी आहे

यशवंतकुलकर्णी · · काथ्याकूट
सद्या मी बॅंजो किंवा बुलबुलतरंग नावाचे एक वाद्य शिकत आहे (फक्त सातशे रूपयात ब्रॅण्ड न्यू पीस मिळाला). आजकालच्या ढ्याण-ढ्याण संगीतात हे गोड, नाजूक आवाजाचे वाद्य अगदी तुरळक प्रमाणात दिसते - हे वाद्य मरत चालले आहे असे म्हटले तरी चालेल; पण शिकायला फार सोपे असते (सा रे ग म प ध नी काही तासांत शिकता येते) इंटरनेटवर शोधून पाहिले, पण एकच साईट सापडली - त्यावर बाळबोध धडे नाहीत. मिसळपाववर हे वाद्य वाजवणारे, त्याबद्दल मार्गदर्शन करू शकणारे कुणी आहे का?? याबद्दल पुस्तके इ. उपलब्ध असल्याचे माहित असल्यास तेही कृपया सांगावे. Image removed.

वाचन 9685 प्रतिक्रिया 0