लेखकस्पायांनी शनिवार, 15/01/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसांपासून 'मुंब्रा देवीला'जायचं मनात होतं, पण वेळच मिळत नव्हता, शेवटी काल तो योग आला
मी आणि माझा मित्र सौरभ असे दोघे सकाळी प्रचंड थंडीत ५.३० ला निघालो, काहीही करून सूर्योदयाच्या आधी आम्हाला वर पोहोचायचंच होतं
(फक्त आणि फक्त सूर्योदय बघण्यासाठी मुंब्रा देवीला जायलाच हव)
प्रचंड धुके असल्याने आमचा पचका होणार अशी चिन्ह होती
पायऱ्या चढताना बऱ्यापैकी अंधार होता
७ वाजत आलेले होते, आणि आम्ही धापा टाकत कधी एकदा देऊळ गाठतोय या प्रयत्नात होतो
शेवटी एकदाचे देवळात पोहोचलो, आणि नारायण अवतरले,
लेखकप्रचेतसयांनी शनिवार, 15/01/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रराज पवारांचे अभिनंदन .
'पानिपत' वर त्यांनी मिपावर व पुस्तकविश्ववर लिहिलेला प्रतिसाद पाहून तो "सामना" दैनिकाने 'पानिपत २५०' वर्षे यानिमित्ताने आजच्या शनिवारच्या "फुलोरा' या सदरात प्रकाशित केला आहे.
अधिक माहितीसाठी सामनातील फुलोरा हे सदर पाहावे.
पुन्हा एकदा त्यांचे हार्दिक अभिनंदन
लेखकप्राजुयांनी शनिवार, 15/01/2011 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहिल्या प्रहरीच जाग आली. आज माझा विवाह आहे. पण मनांत कुठेतरी काहीतरी चुकतेय असंच वाटतं आहे. का? समजत नाहिये. भोरा खूप आनंदी आहे आज. किती दिवसापासून चाललं होतं आमच्या दोघांच्या घरच्यांचं. शेवटी ठरवलंच सगळ्यांनी. मला विचारलं. बेठकीत 'हो' म्हणून गेले. पण आज.. ?? आज असं वाटतंय की माझा जन्म हा विवाह करून भोरा चा संसार करण्यासाठी नाहिये. पाडित राहून, बांबूच्या वस्तू विणायच्या, जनावरं सांभाळयची, डोंगरात, अरण्यात जाऊन कंद जमवायची.. आणि भोरा ला सुखी करायचं?? मी का करू? भोरा मला आवडतो.. पण मला संसार नाहीये करायचा. संसार नाहीये करायचा की भोराशी संसार नाहीये करायचा?? नाही....
लेखकसर्वसाक्षीयांनी शनिवार, 15/01/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
२००६ च्या दिवळीला पहिल्याच पहाटे ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये पंतांचा खास असा 'मी पणशीकर बोलतोय' हा अभिनव कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पंतांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधुन त्यांचा सत्कारही आयोजित केला होता.
लेखकभय्यायांनी शनिवार, 15/01/2011 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी अफ़्रिकेत असताना आलेला एक प्रसंग सांगून तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो.
जुलै २००८ ची गोष्ट.
मी डिसेंबर २००७ मध्येच रवांडा या छोट्या देशात नोकरी पत्करली सहा महीने काढल्यावर पत्नीला घेउन परत येण्यासाठी मी पुण्यातून निघालो. किगाली मधल्या एका मित्राच्या नुकतेच लग्न झालेल्या सुनेला पण घेउन यायचे होते, तर आम्ही तिघेही मुंबई अंतरराष्टीय विमानतळावर हजर झालो. केनया एयरवेज च्या लाइनीत उभे राहून सगळे सोपस्कार पूर्ण करून विमानात बसलॊ. रवांडाला जाण्यासाठी प्रथम नैरोबी (केनया) इथे जावे लागते आणि विमान बदलून नंतर किगाली ला जावे लागते.
लेखकविदेशयांनी शुक्रवार, 14/01/2011 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
तिळगुळ देता-घेता नेते गोड-गोड बोलणार ,
सर्वच पक्षांचे नेते ना तोडफोड करणार
शहरामधले मंत्री आता खेडयातच राहणार
वाढदिवस ना आता कुणाचे फलकावर दिसणार -
देशामध्ये ना कसलाही घोटाळा करणार
शासन भ्रष्टाचार-प्रदूषणमुक्त अम्हा दिसणार -
आमदार नि खासदार ते भत्ते ना घेणार !
सूत्रसंचालिका अंगभर कपडयातुन दिसणार
'अभिनयाच्या अंगा'स्तव 'तो' 'स्त्री-वेषी' न होणार
'जज्ज ' मराठी 'चॅनल'चे मराठीत बोलणार
निकाल 'एसेमेस' विना ते स्पर्धेचे ठरणार
'नववर्षी-संकल्प'जाणता करमणूक होणार !!
लेखकअभिसरिकायांनी शुक्रवार, 14/01/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
नाती
नाती नाती नाती...........
जुळ्लेली, जोडलेली, लादलेली......
खरच हवी असतात का आपल्याला ही नाती ?
वाटत', बरेच वेळा आपल्याला ग्रुहितच धरतात ही नाती....!
नाती....काही प्रेमाची, काही मैत्रीची, काही कर्तव्याचीही,
दमछाकच होते मात्र निभावताना ही नाती...!
नाही तोडून टाकता येत त्याच्यापासून आपल्याला.....
मग वह
लेखक५० फक्तयांनी शुक्रवार, 14/01/2011 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता. आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे.
पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि
आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे,
असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे.