मैसूर भजी
खरंतर मी मैसूर भजी पुर्वी कधी खाल्ली नाही आणि मला ही मैसूर भजी आहेत की नाही ते माहित नाही. पण बायको ह्याला मैसूर भजी म्हणाली, मग माझी काय मजाल त्याला ना म्हणायची. शिवाय तिने हिच पाककृती बटाटावडा म्हणून सांगितली असती तरी मी काही म्हणालो नसतो (अगदी सटलपणे निर्लज्ज व्हायची प्रॅक्टीस करतोय!).
वेल, काल ऑफिसमधून घरी परत येतो तोच खमंग वास आला आणि कळलं बायको ऑफिसमधून निघताना फोन कर का म्हणाली ते. घरात आलो आणि गरमगरम खुसखुशीत भज्यांची प्लेट पुढे आली. भजी फारच खमंग झाली होती, म्हणून इथे शेअर करतोय (अर्थात बायकोच्या परवानगीनेच).
तर हि मैसूर भजी कशी करायची म्हणे? खालचं साहित्य घरी आहे की नाही ते बघा (हे नवशिक्यांसाठी किंवा आयटीतल्या बायकांसाठी... नियमीत घरी चांगलं-चुंगलं करणार्या गृहिणींसाठी नाही).... सगळं अंदाजे किंवा आवडेल तसं घ्या.
मैदा
दही
हिरवी मिरची
आलं
लसून
कांदा
थोडंसं जीरं
मीठ
अगदी चिमूट्-अर्धी चिमूट खाण्याचा सोडा
आणि तळण्यासाठी तेल
दही आंबट असेल तर सगळं वेळेवर केलंत तरी चालेल. पण दही जास्तं आंबट नसेल तर दही आणि मैदा ३-४ तास आधी साधारण भज्यांसाठी लगतो तसा भिजवून ठेवा. भजी तळायच्या आधी ह्या भिजवलेल्या पिठामधे लांबट चिरलेला कांदा, लसून, आलं, हिरवी मिरची कुटून घाला. चवीनुसार मीठ आणि थोडसं जीरं घाला. पिठ चांगल एकत्र करुन घ्या. अगदी चिमूट्-अर्धी चुमूट खाण्याचा सोडा घालून गरम तेलात भजी तळायला घ्या. गरम गरम भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर फस्तं करा.
बायकोने ह्या भज्यांबरोबर दुधीची चटणी केली होती. ह्या भज्यांबरोबर म्हणून नव्हती केली, पण भजी ह्या चटणी बरोबर छान लागली. चटणी करण्या साठी दुधी आणि १-२ हिरव्या मिरच्या एक अगदी छोटा चमचा तेलात १-२ मिनीटे परतून वाफवून घ्या. दुधी वाफवून थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरमधून काढून घेताना त्यात थोडं दही, दाण्याचं कुट, मीठ आणि लसून घाला. मिक्स्र मधून काढून घेतल्यावर ह्या चटणीमधे वरून मोहरी आणि कढीपत्याची फोडणी घाला. चटणी तयार!
भज्यांसाठी टिप १ - भजी थोडीशी आंबूस छान लागतात. दह्यात भिजवल्यावरही आंबटपणा नाही आला तर त्या थोडं लिंबू पिळा.
भज्यांसाठी टिप २ - खाण्याचा सोडा नाही घातला तरी चालेल. पण सोडा जास्तं झाला तर भजी तेलकट होतात.
अवांतर माहिती - बायको आयटीतली असूनही अगदी सुगरण आहे!
-(सुग्रीव) अनामिक
| From Random |
वाचने
11485
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
वेगळी पाकृ.
मैद्याची भजी? हम्म...कोणी
मस्त!
In reply to मस्त! by बेसनलाडू
+ १
पाकृ मस्त आणि पंचेसही! ...
वाह रे अनामिका हा भज्यांच्या
छान
वाह वाह वाह ! ह्या रविवारी
अनामिक त्याला दुध्याच रायत
In reply to अनामिक त्याला दुध्याच रायत by जागु
त्याला रायतं म्हणा, चटणी
In reply to त्याला रायतं म्हणा, चटणी by अनामिक
रागावु नका हो.
माझी आवडती भजी. या भज्यांना
In reply to माझी आवडती भजी. या भज्यांना by मितान
+ १
In reply to + १ by मेघवेडा
आलुबोंडा
In reply to आलुबोंडा by अनामिक
मध्यप्रदेश छत्तीसगड ह्या
In reply to मध्यप्रदेश छत्तीसगड ह्या by परिकथेतील राजकुमार
द्राविडी लोक तर नारळाला बोंडा
In reply to द्राविडी लोक तर नारळाला बोंडा by मेघवेडा
तामिळ लोक नारळाला टोंगा
In reply to मध्यप्रदेश छत्तीसगड ह्या by परिकथेतील राजकुमार
अमेरीकेत काय म्हणतात?
In reply to अमेरीकेत काय म्हणतात? by चिंतामणी
एकझ्याक्टली....
छान आहे, पहिल्यांदाच ऐकली
पाकृ माझ्यासाठी नविन
मस्त रे!!
खरोखर मस्त