उडीद-मुगाचे लाडू
हिवाळा सुरू झाला की वेगवेगळे लाडू आठवायला लागतात. त्यातले माझे आवडते लाडू उडीद आणि मुगाच्या डाळीचा लाडू. त्याची ही पाकृ.
सामग्री -
१ वाटी मुगाची डाळ
१ वाटी उडीद डाळ
१ वाटी तूप
१ वाटी पिठी साखर
आवडेल तेवढी वेलची पूड, जायफळ वगैरे
आवडत असल्यास आणि तब्येतीला परवडत असल्यास मूठभर बदाम, काजू वगैरे
कृती -
मुगाची डाळ आणि उडीद डाळ लाल गुलाबी रंगाची होईपर्यंत खमंग भाजून घ्या. थोडी गार झाली की मिक्सरवर रवाळ दळून घ्या.
एका नॉनस्टिक कढईत तूप गरम करा. त्यात डाळींचे पीठ घाला. अजुन थोडा गडद रंग येईपर्यंत भाजून घ्या. खमंग भाजले की गॅस बंद करून पिठीसाखर आणि वेलची जायफळ मिसळा. सुकामेवा घाला.
मिश्रण थोडे गार झाले की लाडू वळा.
टिप्स :
हे लाडू जास्त केले तर बरेच दिवस टिकतात ;)
मुगाची आणि उडदाची डाळ सालींसकट वापरू शकता. पण मग डाळ भाजली गेली की नाही ते लवकर कळत नाही म्हणून मी तो धोका पत्करत नाही.
हे घ्या लाडू.....
अजून पाहिजे?
याद्या
9132
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
ये बात है ....
खुप छान ....करून
वाट बघतो आहे!
+१
In reply to वाट बघतो आहे! by मेघवेडा
हे लाडू मी लंडन कट्ट्यासाठी
In reply to +१ by असुर
अजिबात गैरसमज होणार नाही!!!
In reply to हे लाडू मी लंडन कट्ट्यासाठी by मितान
सही दिसतायत. दिवाळीला करून
छान दिसतायत.
फटू मस्तच....मुगाचे लाडू
कोल्ह्याला द्राक्षे !
In reply to फटू मस्तच....मुगाचे लाडू by प्रभो
मस्त!
लय भारी!
लाडु बसलेत कि त्यांना
लाडु बसलेत कि अंहह कदाचीत
In reply to लाडु बसलेत कि त्यांना by पर्नल नेने मराठे
गणपा भौ ! तुझ्या डोक्यावर
In reply to लाडु बसलेत कि अंहह कदाचीत by गणपा
=)) हा हा हा अग ते पिवळे
In reply to गणपा भौ ! तुझ्या डोक्यावर by मितान
हे लाडू जास्त केले तर बरेच
मस्त!
वा वा मस्तच लाडू आहेत.
जागू, गूळ वापरता येईल. कौशी,
छान छान.
मितान एक सुचवावस वाटत. पिठी
हे घ्या, हे घ्या म्हणून फक्त
भारतात येणार आहेस तेह्वा हे
ह्या पाकृ नुसत्या दिसणारच