सावलीतला कोलाहल
रोज संध्याकाळी फ़िरून परत येण्याच्या वाटेवरच शॉप अॅन्ड सेव्ह सुपरमार्केट आहे. त्यामुळे अचानक लागलेले किंवा अचानक आठवलेले वाणसामान तिथून आणण्याची सोय आहे. एकदम मोठी यादी वगैरे बनवून दोन तीन आठवड्यांचे सामान जरा दुरच्या मार्केटमधून आणून टाकलेले असतेच. तरीही वाटेवर हे जास्त वर्दळ नसलेले दुकान दिसले, की पाउले तिकडे उगाचच वळतात. मग आलोच आहोत तर माझे उगाच अबरचबर खादाडीचे जिन्नस टोपलीत टाकणे, त्यावर चित्राचे ठरलेले भाष्य ऐकणे वगैरे प्रसंग नेहमीचेच. आज देखील हा मराठीतला प्रेमळ संवाद ऐकून तिथे नेहमी दिसणारी चायनीज म्हातारी मंदसे हसली.
पंतप्राधान ?????
आत्ताच एक (खरेतर शिळी) बातमी वाचनत आली.
धक्का बसला. धक्का आपले पंतप्रधान, जे उच्च विद्या विभुषीत आहेत, ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते, त्यांनी अशी प्रतिक्रीया द्यावी???????????
http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=4817477
(तिनही भाग वाचा)
!!!!!!! पहिला नंबर असा हि , तसा ही !!!!!!!
काही दिवसांपूर्वीच बातमी वाचली कि कॅट च्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल ठरले , वाचून खूप आनंद झाला . पिढ्यानपिढ्या नोकरी हेच सर्वस्व मानणारा मराठी समाज आता कात टाकतोय असं वाटू लागलं . पण या बातमीचा आनंद व्यक्त करतो तेवढ्यात आणखी एक बातमी आली कि सलग दहाव्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्यात महाराष्ट्र अव्वल ........ !
नकळत जाणवले कि उंच भरारी मारताना आपण आपली जमीन विसरतोय !
क्षणात मन विषण्ण झालं . ज्या राज्याचा कृषिमंत्री केंद्रात आहे त्याच राज्यावर ही वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय .
तीन प्रकारचे डेव्हलपर्स
व्यवस्थापनाबद्दलचा विशेसषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल खूप मस्त लेख वाचनात आला. यामध्ये कोणत्याही आय टी कंपनीमधील डेव्हलपर्स ची प्रमुख ३ व्यक्तीमत्वे अधोरेखित केलेली आहेत. त्यांचा कंपनीवर होणारा परीणाम आणि दुष्परीणाम टाळण्याचे उपाय सुचविले आहेत. लेख मूळातून वाचण्यासारखा आणि उल्लेखनिय आहे.
प्रथम व्यक्तीमत्व - वेठीस धरणारे डेव्हलपर्स
या पठडीत येणारे डेव्हलपर्स हे बरेचदा स्ट्रॅटेजिक प्रॉड्क्टवरती अनेक मुख्य निर्णय स्वतःचे स्वतः घेतात मग भलेही त्यांना परवानगी असो वा नसो.
शेवयांचा उपमा
साहित्य- २ वाट्या शेवया, १ लहान कांदा, २ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर
२ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा,काजूचे तुकडे,२ वाट्यांना थोडे कमी गरम पाणी ,लिंबू,नारळ, कोथिंबिर,
फोडणीसाठी- तेल,कढिलिंब, जिरं, मोहरी, उडदाची डाळ
कृती- शेवया कुस्करा आणि तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा. तेल गरम करुन जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ, लवंगा, दालचिनी अशी खमंग फोडणी करा. नंतर त्यात कांदा तांबूस होईपर्यंत परता.काजूचे तुकडे घालून परता. आता त्यात गरम पाणी घाला.मीठ व साखर घाला व उकळू द्या. चांगली उकळी आली की त्यात भाजलेल्या शेवया घाला.
नार देखणी..(लावणी)
नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी
नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी
अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी
माझी... ऐकून घ्या मागणी..
मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी
असा शिणगार, नव रत्नहार, गोर्या कांतीवरी
विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी
माझी... ऐकून घ्या मागणी..
गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी
मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी
कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी
माझी... ऐकून घ्या मागणी..
धुंद गारवा, मनी काजवा, लुकलुक करतो भारी
विडा केशरी, रंगतो परी, मैफ़िल सजते न्यारी
बसा पळभरी, देह कस्तुरी, लुटेल दुजा कुणी
माझी... ऐकून घ्या मागणी..
- प्राजु
काव्यरस
थीम चांगली असूनही फसलेलं पुस्तक
परवाच एक पुस्तक वाचलं : द अवेकनिंग. ले. : संजय सोनवणी.
कथेची नायिका शिबा राणी.. प्रचंड सुंदर.... आणी तेवढीच सामर्थ्यशाली, तिच्यासाठी समस्त सम्राट लोकं झुरतात.. पण ती कुणालाही भीक घालत नाही.
दररोज रात्री एका गुलामाबरोबर रत होणारी, आणी सकाळी त्याच्याच रक्ताने स्नान करणारी शिबा राणी... तिचा हा दिनक्रम (की रात्रक्रम) काही वर्षे सतत चालू अस्तो.
एका रात्री एका टोळीचा भूतपूर्व राजा शिबाच्या प्रेमापोटी तिच्याकडे गुलाम म्हणून येतो....
मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी
विकास आणि प्रगती/ देवबंद ची साधक बाधक चर्चा व्हावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. कोणताही उद्देश नाही तेंव्हा धागा उड्वू नये अशी नम्र विनंती.
भारताची जनता खरेच वि कासासाठी आसुसली आहे का?
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चे कौतुक केले देवबन्द ने
हे काय चालले आहे!
न्यू दिल्ली दारूल ऊलूम व्हाइस चान्सलर मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी म्हणाले " दंग्यानंतर झालेले रिलिफ़ वर्क हे अत्यंत चांगल्या प्रकारे गुजरात सरकार आणि लोकांनी केले आहे." वस्तानी स्वत: एक एमबीबीए आहेत. ते स्वत: गुजरातचे आहेत.
जातियवादींच्या गोटात त्यामुळे आनंदीआनंदी झाला असेलच.
मिसळपाव