डांबीस डोंब्या
- - - - - - - -
पहाट झाली आणि पाण्याच्या चकचक चकाकीमुळे डोंब्या डोमकावळ्याची झोप मोडली. "आईने न्याहारीसाठी काय बरे केले असेल?" म्हणून त्याने डोळे किलकिले केले. "क्राऊ-क्राऊ आऊ, काय-काय खाऊ?" म्हणून त्याने आईला हाक मारली. काहीच उत्तर आले नाही.
मग त्याला आठवले. कालच आई त्याला किती रागावली होती - "एवढा मोठ्ठा बगळा झालास, पण तरी आईकडूनच दाणा हवा! उद्या पहाटे उठायचे नि स्वतःच खायचे शोधायला जायचे."
रागवल्यामुळे आई उत्तर देत नसेल ना? त्याने डोळे मोठ्ठे करून बघितले. अबब! झोपेत तरंगत-तरंगत तो आपल्या बिळापासून कितीतरी दूर आला होता. अगदी दूरवर त्याची आई कमळाचे पराग गोळा करत होती, तिला त्याचे कसे ऐकू जाणार? "नैच मागायची न्याहारी आईला" डोंब्या फुरंगटून पुटपुटला.
डुंबत-डुंबत तो थेट पलीकडच्या काठाला पोचला. इतका दूर तो कधीच आला नव्हता. तिथे त्याने बघितले, किनार्यापाशी पत्रावळीवर भाताची एक मूद ठेवली होती. जवळच सूटबूट घातलेले पाच-सात साहेब आणि एक मड्डम होती. त्यांचे लक्ष जाणार नाही असा लपत-छपत डांबीस डोंब्या मुदीकडे सरकू लागला. पण प्रत्येक वेळा लोक "आला, आला, कावळा आला..." ओरडायचे आणि डोंब्या घाबरून पळून जायचा. मग लगेच लोक आरडाओरडा करू लागायचे : "जॅककाका, मी घेतो जिलकाकूची काळजी!", "जॅक डार्लिंग, तुझ्या त्या छोकरीला माफ केले!"...
डोंब्याच्या पोटात कावळे भलतेच कावकाव करू लागले. त्याचा सावधपणा मुडपला. धावत-धावत तो मुदीपाशी गेला आणि मूद पंजात पकडली. लगेच सगळे लोक ओरडले "शिवला, शिवला, कावळा पिंडाला शिवला! किती वायदे करवून घेतले म्हातार्याने... आता घरी जाऊया..."
पण धसमुसळ्या डोंब्याने धरली तशी धपकन पडून मूद मोडली. सगळा भात पाण्यात पार बुडून गेला. डोंब्या बिचारा खजील झाला. त्या किनार्यावर पुढे त्याला एक मोठ्ठे घरटे दिसले. त्यात एकच अंडे होते. डोंब्या म्हणाला "एकच का होईना, याने भूक थोडी तरी भागेल." मग तर गंमतच झाली. अंडे आपोआप गडाबडा लोळू लागले. डोंब्याने टोचा मारताच अंडे टककन तुटले, आणि आतून एक चट्टेरी-पट्टेरी मनीमाऊचे पिल्लू बाहेर आले. पण लगेच पाठीमागे मोठ्ठाली डरकाळी ऐकू आली. "गुर्र-र्र-र्र. कोण आहे तो डोमकावळा माझ्या घरट्यात..." अरे, हे तर वाघिणीचे घरटे होते! आणि अंड्यातले पिल्लू मनीमाऊ नव्हते, हा तर वाघाला छावा होता!" वाघिणीने झडप घातली, तसा डोंब्या पाण्यात सूर मारून थोडक्यात वाचला. घाबरून त्याच्या पोटातले कावळे चिडीचूप झाले. मागे-पुढे न बघता त्याने घरचा किनारा गाठला. सरळ आपल्या बिळात घुसला.
आत आई होती. म्हणाली, "डोंब्या, ठोंब्या - किती उशीर केलास न्याहारीला." कमळाच्या परागाची गरमागरम भाकरी आईने त्याच्यापुढे आदळली. आई कालचे रागावणे विसरले होती वाटते.
डोंब्याच्या कमाईचा भात वाया गेला होता. नि अंडे तर मिळालेच नव्हते. पण आईच्या भाकरीपुढे त्यांची आठवणही डोंब्याला आली नाही. डोंब्या बिळातला सगळ्यात आनंदी डोमकावळा होता!
- - -
वाचने
6255
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्या!!
मलाही!
In reply to अरेच्या!! by नाटक्या
भले शाब्बास!
In reply to मलाही! by चित्रा
आईल्ला!!
:)
मस्त.
बरोबर
अगदी बरोबर. वायव्य
In reply to बरोबर by सहज
उत्तम!
In reply to अगदी बरोबर. वायव्य by मृत्युन्जय
कोठे?
In reply to बरोबर by सहज
येथे जवळच
In reply to कोठे? by पंगा
ओहो!
In reply to येथे जवळच by धनंजय
हा शब्द
In reply to ओहो! by पंगा
+१ कर्ती किंवा कर्त्री
In reply to हा शब्द by चित्रा
ठेवले असता अधिक सयुक्तिक झाले
In reply to +१ कर्ती किंवा कर्त्री by धनंजय
दिशांबद्दल
In reply to बरोबर by सहज
डांबीस धन्या
=)) =)) =)) धन्या, आय मीन
In reply to डांबीस धन्या by राजेश घासकडवी
जिनिअस
In reply to डांबीस धन्या by राजेश घासकडवी
संदर्भ लागला नव्हता
धनंजय म्हणजे फारच डांबिस
मस्त!
अच्छा...अच्छा...... "उत्तरध्र
एक शंका: लोक माशांची अडी
लोक माशांची अडी खातात ,
In reply to एक शंका: लोक माशांची अडी by विजुभाऊ
फसलास रे टारोबा...उंदीर कधी
फसलास रे टारोबा...उंदीर कधी
In reply to फसलास रे टारोबा...उंदीर कधी by विजुभाऊ
आधी वाचली तेव्हा कथा "ठीक