मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रामदासांचे लेखन लोकप्रभेत

अवलिया · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आपले सर्वांचे लाडके श्री रामदास यांचा रत्नांवरील सुरेख लेख यंदाच्या लोकप्रभेत आला आहे. तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती :) http://www.loksatta.com/lokprabha/diwali2010/diwali09.htm रामदासांचे असेच लेख नियमित वेगवेगळ्या मासिकात येत राहो तसेच लवकरात लवकर त्यांच्या लेखांचा संग्रह किंवा कादंबरी कागदावर प्रकाशित होऊन आम्हाला वाचायचा योग येवो अशी प्रार्थना !! जियो रामदास !! जियो !!

वाचने 6517 वाचनखूण प्रतिक्रिया 48

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 29/10/2010 - 11:41
रामदासकाकांचे अभिनंदन हेच म्हणतो. छान वाटले. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

निखिल देशपांडे 29/10/2010 - 11:49
असेच म्हणतो निखिल

In reply to by निखिल देशपांडे

प्रभो 29/10/2010 - 18:26
रामदासकाकांचे अभिनंदन!

रामदास 29/10/2010 - 11:37
या लेखाची प्रेरणा सन्माननीय सदस्या चित्राताईंच्या रत्ने -मणी एक संकलन या धाग्यावरून मिळाली होती.चित्राताईंचे मनःपूर्वक आभार

In reply to by रामदास

चित्रा 29/10/2010 - 17:40
धन्यवाद, माझे फुटकळ धागे या रोचक लेखाचे निमित्त ठरू शकले याचा आनंद झाला. अभिनंदन!

In reply to by नितिन थत्ते

मी-सौरभ 29/10/2010 - 11:48
आमच्यासारखेच आपले पंखे अजुन निर्माण होवोत..... (@रा.का. :मग आपण तुम्हाला रामदास खेतान म्हणूया)

श्रावण मोडक 29/10/2010 - 11:47
वा. आनंद झाला.
लवकरात लवकर त्यांच्या लेखांचा संग्रह किंवा कादंबरी कागदावर प्रकाशित होऊन आम्हाला वाचायचा योग येवो अशी प्रार्थना !!
अनुमोदन. घ्या मनावर. विशेषतः कादंबरीचे.

In reply to by श्रावण मोडक

मराठमोळा 29/10/2010 - 11:55
+१ सहमत आहे. रामदास काकांचे अधिकाधिक लेखन प्रकाशित व्हावे हीच ईच्छा. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/10/2010 - 11:53
अभिनंदन.....! -दिलीप बिरुटे

नंदन 29/10/2010 - 12:09
सुरेख लेख, लोकप्रभेचे अभिनंदन :)
तसेच लवकरात लवकर त्यांच्या लेखांचा संग्रह किंवा कादंबरी कागदावर प्रकाशित होऊन आम्हाला वाचायचा योग येवो अशी प्रार्थना !!
+१

In reply to by नंदन

पिवळा डांबिस 30/10/2010 - 01:36
वरील सर्वांशी सहमत!! आणि रामदासकाका, तुम्ही पुष्कराजावर लिहायचं प्रॉमिसही मला पूर्वी दिलं आहे त्याची नम्रपणे आठवण करून देऊ इच्छितो....

समंजस 29/10/2010 - 12:12
पुढेही लेख येत राहोत ही सदिच्छा :)

सहज 29/10/2010 - 12:17
अभिनंदन कोणाचे तर लोकप्रभाचे अभिनंदन! रामदास यांना अनेक धन्यवाद. त्यांच्या इतका विद्वान, अनेकविध विषयात पारंगत व लेखनावर प्रभुत्व असलेला लेखक आपल्यामधे वावरत असतो हे आपले परमभाग्य आहे. आपल्या लेखनाने आम्हाला वेळोवेळी अतिशय आनंदाचे क्षण दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. मी गेस करु शकलो नाही बरं का :-) लेख उत्तमच!

इन्द्र्राज पवार 29/10/2010 - 12:44
अगदी हिर्‍याच्या तेजासारखाच लेख आहे.....फार सुंदर आणि माहितीपूर्ण लेख आहे. परत परत वाचण्यायोग्य. दिवाळी 'लोकप्रभे' च्या कव्हरवरील हिरकणी आणि श्री.रामदास यांचा हिर्‍यांवरील लेख एकमेकाला अगदी पूरक आहेत. लेखातील विमानप्रवासातील एक छोटा संवाद तर त्या 'हिरकणी' ला लागू होईल असेच वाटते. ‘‘या हिर्‍याचे नाव क्लॉपमन डायमंड आहे. पण या हिर्‍याला होप हिर्‍यासारखाच शाप आहे आणि तो हिरा वापरणार्‍याला भोगावा लागतो.’ न राहवून त्या माणसाने विचारले, ‘‘काय आहे हो शाप?’’ ‘‘मिस्टर क्लॉपमन.’’ त्या स्त्रीने शांतपणे उत्तर दिले. इन्द्रा

सुधीर काळे 29/10/2010 - 14:34
रामदास-जी, हार्दिक अभिनंदन! आपले लेखन असेच सदैव फुलत राहो हीच शुभच्छा!!

वाहीदा 29/10/2010 - 14:35
काका तुमचा लेख आहे म्हणजे नक्की पूर्ण वाचणार ! असो लेख वर वर वाचला, तुम्ही "हिरा" वर लिहले आहे पण काका हा Precious GemStone (खडा) Venus, म्हणजे शुक्रासाठी आहे ना ?? SHUKRA symbolizes the comforts and luxuries of the life. Diamond (Heera) helps to strengthen the Venus in Horoscope chart, may bless the native with all the luxuries, comforts, glamour, romance, wealth, beauty, happiness, joy, delights, high class vehicles, art, sex, attractions, jewelry, entertainments, pleasure, enjoyments, passion and merriments. थोडक्यात हिरा बाळगला तर आयुष्यातिल सगळे उत्तम भोग उपभोगाला मिळतात मग खजिन्यात हिऱ्यांची कमी नसलेला निजाम अन बार्बरा हटन मरेपर्यंत एकाकी जीवन का जगले ?? कोहिनूरचे जन्मस्थान ही गोवळकोंडा पण ज्यांनी ज्यांनी हा हिरा बाळगला त्यांना त्यांना तो Unlucky का साबित झाला ?? मी जेव्व्हा जेव्हा GemStone चा अभ्यास केला तेव्हा तेव्हा मला हे न उलगडणारे कोडे वाटले मला तर सगळ्यात छान sapphire (पुखराज) च वाटतो. ज्याच्या कडे गुरुचे पाठबळ त्याला जगात काही तोटा नाही मग तो गुरु कुठल्याही स्वरुपात असो !

रन्गराव 29/10/2010 - 14:49
आपले लिखान मिपा ला लाभले ही मिपासाठी भाग्याची गोष्ट!

विकास 29/10/2010 - 16:34
लेख आत्ता वरवर वाचला पण "माहीतीचे रत्न" आहे असे म्हणता येईल! अभिनंदन!

धमाल मुलगा 29/10/2010 - 18:16
लोकप्रभाचे अभिनंदन. लोकप्रभाला रत्नांच्या खाणीत रामदासरत्न सापडलं तर! :)

५० फक्त 29/10/2010 - 18:38
हार्दिक अभिनंदन रामदास काका. लेख नेट वरुन उतरवुन घेतला आहे, घरी जाउन व्यवस्थित वाचेन. हर्षद

सुनील 29/10/2010 - 19:52
अभिनंदन! आता फोनवर कबूल केल्याप्रमाणे लेखात न आलेल्या इतर हिर्‍यांच्या रोचक कहाण्या (काही दर्दभर्‍या) लवकरात लवकर मिपावर टाकून मिपा अधिक समृद्ध करावे!

स्मिता_१३ 29/10/2010 - 20:01
रामदासकाकांचे अभिनंदन! आजच वाचला लेख. अगदी छान आणि माहितीपूर्ण लेख आहे. असेच तुमचे लेखन आम्हाला वाचायला मिळत राहो ही सदीच्छा !

सर्वसाक्षी 29/10/2010 - 21:19
रामदासशेठ, हार्दिक अभिनंदन. मस्त लेख. असे रत्न शेजारी असावे हे माझे माग्य.

रेवती 29/10/2010 - 22:28
रामदासांचे अभिनंदन! फारशी न मिळणारी माहिती दिल्यामुळे आपला लेखही लखलखीत झालाय. आजकाल सोन्याचं कानातलंही घालायची सोय राहिली नसताना हा खजिना एक गूढ वाटते. बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अवलियांचे आभार!

स्वाती दिनेश 02/11/2010 - 18:56
जरा उशीरानेच हा धागा पाहिला, लोकप्रभेतला लेखही वाचला. हार्दिक अभिनंदन! स्वाती