Skip to main content

मीही स्पर्शून जातो ईश्वराला माझ्या गाण्यातून (रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचा स्वैर अनुवाद)

लेखक स्वप्ना_तुषार यांनी शनिवार, 09/07/2011 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
I touch God in my song as the hill touches the far-away sea with its waterfall. The butterfly counts not months but moments, and has time enough. Let my love, like sunlight, surround you and yet give you illumined freedom. Love remains a secret even when spoken, for only a lover truly knows that he is loved. Emancipation from the bondage of the soil is no freedom for thee. In love I pay my endless debt to thee for what thou art. दूरवर असलेल्या सागराला टेकडी तिच्या धबधब्यातून स्पर्श करते जशी अगदी तसाच मीही स्पर्शून जातो ईश्वराला माझ्या गाण्यातून फ़ुलपाखरे क्षण मोजतात महिने नाही म्
काव्यरस

मागे ती लुगडी

लेखक शरद यांनी शनिवार, 09/07/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागे ती लुगडी एके काळी मराठी काव्य म्हणजे भक्ती काव्य व सोबतीला पंचपक्वांनांनी भरलेल्या ताटात थोडीशी झणझणित चटणी असावी तसे शाहीरांचे शृंगार काव्य. साहित्यात विनोद शोधावयास लागावयाचा. "विनोद आवडे टवाळा " ही समर्थांची उक्ती प्रातिनिधिक म्हणावयास हरकत नाही. तर अशा काळात अमृतराय या कवीची एक आल्हादकारक रचना मिळाली तेव्हा सगळ्या मित्रांना एक मेजवानीच मिळाली म्हणावयास पाहिजे. आणि हो, हा अमृतराय म्हणजे " अजी मी ब्रह्म पाहिले" या सुप्रसिद्ध रचनेचा कर्ता. अमृतराय (१६९८-१७५३) हा कटावाकरिता प्रसिद्ध. मराठीत त्यानेच तो सुरू केला म्हाणावयास हरकत नाही.

जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा...

लेखक विदेश यांनी मंगळवार, 05/07/2011 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : गंगा जमुना डोळयात उभ्या का -) होंडा इंडिका थाटात उभ्या का जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा... |धृ | कडकडुनी तू मिठी मारता, डोळे माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे आठवले सारे सारे गहाण ते गाळे तुज कर्जाचे भय न संगती, जा |१| जा मुला जा.... श्रीमंत उभी सासरा नि सासू जोडी बघ धूड सासुचे हसले तोंड ती वेंगाडी पूस रे डोळे या सदऱ्याने - आवर ती जाडी रूप दर्पणी नसे देखणे, जा |२| जा मुला जा.... आय.टी.ची ती सून वाढत्या पगाराची जमले तिचे रे कैसे तुजवर लव्ह - लफडे हटू नकोस मागे मागे काम कितीही पडे नकोस विसरू धुणि-भांड्याला, जा |३| जा मुला जा....

जाहिरात

लेखक स्पा यांनी सोमवार, 04/07/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांची क्रियेटीव्हता आजमावण्यासाठी हा धागा... तर विषय हा आहे कि.. प्रत्येक प्रतिसाद कर्त्याने, एक प्रोडक्ट द्यायचं, आणि त्या खालच्या मेम्ब्राने त्याची जाहिरात करून दाखवायची, आणि नवीन प्रोडक्ट टाकायचं ति पण एकदम हटके. प्रोडक्ट पण एकदम झकास द्यायचं गड्यांनो (आणि गडींनो ) तर सुरुवात मी करतो.. माझ प्रोडक्ट -- "वास" डीओ - डी वास इफ्फेक्ट असो डीओ जो सर्व पब्लिक ला करील.. बेहोष..