सणांचे नैवेद्य व फराळाचे प्रकार २) नारळी पौर्णिमा - ओल्या नारळाची करंजी
आमच्याकडे नारळी पौर्णिमेच्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या करण्याची प्रथा आहे.
साहित्य :
पुरणः
१ ओला नारळ खरवडून
पाव किलो गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप
पारी:
गव्हाचे पिठ अर्धा किलो
१ चमचा रवा
चिमुटभर साखर
मिठ
तेल
पहिला गव्हाच्या पिठात मिठ, रवा, साखर टाकुन घ्या मग मिसळून २ चमचे तेलाचे मोहन (एका भांड्यात तेल तापवुन ते पिठावर ओता) टाका. आता थोडे थोडे पाणी टाकत पिठ घट्ट मळा.
मिसळपाव