मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या गडे नाचूया..नागडे नाचूया

योगप्रभू · · काथ्याकूट
आपल्या टीमने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर भारतीयांचा उत्साह शिगेला पोचणे स्वाभाविक आहे, पण हा क्रिकेटचा ज्वर आता कुठल्या पातळीपर्यंत चाललाय त्याची एक झलक सध्या माध्यमांत पाहायला मिळतीय. पूनम पांडे नावाच्या मॉडेलने भारताने कप जिंकल्यास आपण संघासमोर कपडे काढणार असल्याचे जाहीर केले आहे. नुसते जाहीर करुन ती थांबली नाही तर तिने यासाठी बीसीसीआयकडे परवानगीही मागितली आहे. पूर्वी निर्लज्जपणाच्या कृतीचे वर्णन करताना 'कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे' असा वाक्प्रचार केला जाई. आता मात्र कमरेचे डोक्यालाही गुंडाळण्याची गरज राहिलेली दिसत नाही. पूनम ही इतकी थिल्लर आहे, की तिला इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीने विचारले, की तुझ्या या कृतीमुळे काही कायदेशीर समस्या उभ्या राहतील, असे तुला वाटते का? त्यावर ही बाई म्हणते, की मला बेकायदा काही करायचे नाही म्हणूनच मी रीतसर परवानगी मागितली आहे. आता हिला एवढेही समजत नाही, की बीसीसीआयने अशी परवानगी देणेही बेकायदा ठरु शकते कारण आपल्याकडे 'सार्वजनिक स्थळी नग्नावस्थेत फिरणे/नग्न होणे' हा गुन्हा आहे. रस्त्यावर नग्नावस्थेत फिरणार्‍या वेड्याला पोलिस निदान काठीचे फटके मारुन हुसकावतात. शहाण्यासुरत्या आणि हायफाय सोसायटीतील महिला असा आचरटपणा सांगून सवरुन करायला जात आहे. तिच्यावर कारवाई होऊ शकते का? जाणकारांनी मत व्यक्त करावे. (फार पूर्वी भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना सुनील गावस्कर खेळत होता. त्यावेळी एक इंग्लिश महिला अशीच विवस्त्रावस्थेत खेळपट्टीवर घुसली होती. पण हे घडले परदेशात. आता भारतातही ती फॅशन आली की काय?' दिगंबरा! दिगंबरा

वाचन 9356 प्रतिक्रिया 0