Skip to main content

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

लेखक प्रशांत यांनी शनिवार, 02/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

वाचने 58764
प्रतिक्रिया 417

प्रतिक्रिया

९ ओव्हर्स २८ ला १. बोलिंग छान चालू आहे. फिल्डिंगही मजबूत आहे. असंच चालू रहायला पाहिजे. टॉसचा काय घोळ झाला नक्की? मला बघायला मिळालं नाही.

In reply to by राजेश घासकडवी

वर्डकप फायनलच्या टॉसचे वेळी धोनी आणि संगकारा "तु तु मैं मैं" करत होते. मॅच अंपायर म्हणला की कॉल ऐकायला नाही आला.

धोनि नेहमी प्रमाणे टॉस हरला आणि झहिर ने अतिशय सुंदर गोलंदाजी करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. विशेष म्हणजे फिल्डिंग अतिषय उत्तम... लंका २८ /१ --- ९ ओव्हर

In reply to by सखी

ऑस्ट्रिलीया सोबत टॉस हरलो होतो.. आणि.. सामना जिंकलो होतो...

वाटच पहात होते तुमच्या धाग्याची :) दोन दिवस मिपा चालत नव्हतं माझ्याइकडे. लंकेने टॉस जिंकला. आत्तापर्यंतचा स्कोअर - SL 30/1 (9.4 Ovs) पण काय सुरेख फिल्डिंग करताहेत आपले लोक :)

दोन वेळेस टॉस सॉरी नाणेफेक करावी लागली हे विश्वकरंडक क्रिकेटला गालबोट वाटले राव मला. असो, श्रीलंका धावसंख्या ३४ धावा ११ षटके पूर्ण आणि एक फलंदाज बाद. :) मिपा सुरळीत केल्याबद्दल धन्यु.......! -दिलीप बिरुटे

श्रीसंतच्या गोलंदाजीत दम दिसत नाही. ना इनस्वींग ना आउटस्विंग. घ्या याची षटकं पूर्ण करुन. -दिलीप बिरुटे

In reply to by चतुरंग

ऐकलं तुमचं आता विकेट काढा. भज्जीला म्हणावं नुसत्या धावा रोखू नका. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तथास्तु! भजी आलाय, होपफुली त्याला आता एक पडेल.\पडु दे, पडु दे, पडु दे!!!

In reply to by सखी

सखी बोलते तसेच होते अशी आमची श्रद्धा होत चालली आहे. :) -दिलीप बिरुटे [श्रद्धाळू]

जम बसायच्या आत संगकारा आणि जयवर्धने गेले पाहिजेत. मग झालं. दोनशे पन्नासच्या आत धावा होतील ? मंडळी आपले काय अंदाज ? ६५/२ अठरा षटकानंतर. -दिलीप बिरुटे

श्रीलंका २० ओव्हर ८३ रण २ विकेट... रण रेट ४ च्यावर गेला लक्षात असु द्या .... दोनीहि फलंदाज चांगले आहेत..... श्रीशांतचे १० ओव्हर संपवण्याच्या मार्गावर.... कदाचित सचिनला बॉलिंग टाकावी लागेल?

In reply to by विसुनाना

विकेट मिळवायच्या नावानं बोंब. उगाच खुन्नस देत असतो. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

नाही आहोत गं, तुझीच वाट पहात होते. चल तो श्लोक म्हण परवाचा, संगा जायला पाहीजे आता :)

In reply to by सखी

हेहे :) म्हटला, म्हटला :) मी म्हणणारच होते सखी तू "श्लोक" म्हण म्हटल्यावर कोणीतरी त्यावरच सुरु होईल म्हणून.. अंधश्रद्धा वगैरे... :)

In reply to by यशोधरा

पहेले बारी संगा की, फिर जयवर्धने. अपर्णा अग परवा आमचे २-४ अंदाज बरोबर आले म्हणून बाकी मिपाकर म्हणत होते आम्ही श्लोक वगैरे म्हणून यज्ञाला बसलो की काय. तरी बरं लताबाईंसारखा उपास मी नाही करु शकले :)

In reply to by यशोधरा

ए! मी अंधश्रद्धा वगैरे नाही म्हंटल हं! मी पण माझ मोडक तुदक स्तोत्र म्हणते ते बरोबर आहे एव्हढच.

''अरे ह्या श्रीशांत चे काय करावे ? धोनीला त्याच्या जागी रैना किंवा सेहवाग आणावा लागणार . महिला आणी संगकारा अश्या हौशी फिरकी गोलदाजांची वाट पाहत आहे . मुळात युवराज ला ह्या अही महींनी चोपला तर मग धोनी काय करणार ? नेहरा ला मिस करतोय .

In reply to by निनाद मुक्काम …

अरे आपला सचिन आहे ना.. मागच्या सेमिफायनल मधे श्रीलंके सोबत २ विकेट घेतल्या होत्या त्याने... १००/२ रण झालेत

अरे परवा सगळे त्या नेहराला शिव्या घालत होते पण शेवटी त्यानेही वाटा उचलला ना स्वतःचा भारताच्या विजयात तसाच श्रीशांतही उचलेल. धीर धरा की :)

In reply to by यशोधरा

त्यावेळी सर्वप्रथम मी म्हटले '' आज नेहरा काहीतरी वेगळे करणार '' तेव्हा प्रीती मनोहर ह्यांनी तेरे मुह मी घी शक्कर असे लिहिल्याचे आठवते . येथे घी नसल्याने मग बटर आणी शक्कर से तोंड गोड केले . हे दोघ फिरकी गोलंदाजी लीलया खेळतात .म्हणून चिंता बाकी सचिन आहे .हेही खरे ( त्याने गोलंदाजी केली नाही तरी .कृष्णा प्रमाणे '' हाती न धरी शस्त्र मी ,गोष्टी सांगे युक्तीच्या चार '' ह्या उक्तिनुसार चार नियमित गोलंदाजांना आपल्या विशाल अनुभवाचा डोस वेळोवेळी पाजावा .)

अजून विकेट काढता आली नाही राव तुम्हाला..ह्या. युवराज घेरे विकेट. २६ षटकानंतर १११/२. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१६:४४ ला एकदम पाच प्रतिसाद. :) -दिलीप बिरुटे

ह्या सिरीज चा वीर म्हणून युवराज सिंग चे नाव माझ्या डोळ्यासमोर त्याच्या अष्टपैलू खेळामुळे येत आहे . युवी दि ग्रे८

In reply to by सोत्रि

अहो ह्या मॅचचे रेकॉर्ड व्हायचे भलत्या कारणासाठी, बॉलरलाच आउट दिले म्हणून! आत्तापर्यंत महाग ठरलाय, खरयं पण १-२ विकेट घेतल्या तर मदतच होईल.

In reply to by सखी

मिळूदेत खरंच. नाहीच मिळाल्या तरी आताच ओव्हर्स संपवू देत, नंतर नको क्रूशियल पाँईटला.

एकदम मिडिऑकर आहे राव! :( त्याच्याकडून ना रन थांबवल्या जाताहेत, ना विकेट, नेहराला का घेतला नाही ह्याचा पश्चात्ताप होतअसणार धोनीला. त्याच्या ओवर्स अत्ताच संपवून टाका राव नाहीतर शेवटी त्याची बिनपाण्याने करतील!

In reply to by चतुरंग

त्याला रनिंग ऑन पिच ची एक वॉर्निंग मिळालीच आहे. पुढच्या दहा वॉर्निंगा एकदमच देऊन डिबार करा. :)

In reply to by विसुनाना

रनिंग ऑन पिच ची एक वॉर्निंग मिळालीच आहे. पुढच्या दहा वॉर्निंगा एकदमच देऊन डिबार करा. हाहाहा. आरं हे विसुनानाला आवरा रे कोणी ! :) एखादं ओझं पेलावेच लागेल आजच्या दिवशी. १३९/३ ओव्हर.३१

In reply to by विसुनाना

>>>पुढच्या दहा वॉर्निंगा एकदमच देऊन डिबार करा. हहपुवा झाली ना सेठ. म्हणून तसे म्हणालो. :)

In reply to by चतुरंग

रंगाशेट त्याला नाईलाजाने घेतलय. नेहरा बोटाचे हाड मोडुन बसला आहे. पण पेन किलर घेउन खेळता आलं असत त्याला. बॉलिंग टाकणारा हात बरा आहे. तशी ही त्याच्या कडुन कोणी बॅटिंगची अपेक्षा ठेवलीच नसती. वर्ल्डकप फायनल तेही मायदेशात....... ऐसा मोका जिंदगी में बार बार नही मिलता किसिको.

In reply to by गणपा

मुरली नाही का खेळत आहे राव पेनकिलर घेऊन? ह्यानेही खेळायला हरकत नव्हती.....

युवराज आणि झहिर यांनी या विश्वचषक मधे चांगली गोलंदाजी केली. झहिर अप्रतिम गोलंदजी करत आहे तर युवि पहिजे तेव्हा विकेट काढतो.... गुडलक युवराज..... हरभजन च्या गोलंदाजी मुळे दबाव येतो.. आणि त्याचा फायदा दुसर्‍या गोलंदाजाला (भारताला) होतो

श्रीशांत जेव्हा राखीव खेळाडू म्हणून इतर सामन्यात ड्रेसिंग रूम मध्ये किती छान दिसायचा . आपल्या सहकार्यांचे कौतुक काय करायचा ,टाळ्या वाजवून कायकाय हावभाव करायचा , उगाच त्याला त्रास देण्यासाठी धोनीने भर उन्हांचे मैदानात उतरवले . अश्विन व त्याच्या कंपूचा मुख्य सूत्रधार निवड समितीचा सदस्य श्रीकांतची हाय लागली आहे .आमच्या श्री ला .

दोनशे सत्तर ऐंशी होतील असेच खेळले तर. विकेट गेली पाहिजे आता. १५४/३. ३३.५ -दिलीप बिरुटे

In reply to by चतुरंग

जयवर्धनेची बायको तर जयवर्धनेला ग्राऊंडवरच थांब म्हणून खुणावते आहे. आणि आपण ग्राउंडवरुन जाण्याचा आग्रह धरतोय. :) -दिलीप बिरुटे

कोहली कोहली ची~अ‍ॅक्शन भलतीच क्यूट आहे... परेरा आणि कापुगेदरा मारतील नंतर..... चेतेश्वर पुजाराचा स्टान्स सुद्धा छान आहे... कुंबळे गोड दिसतोय

श्रीशांता कमलाकांता असं कसं झालं... असं कसं झालं माझ्या नशीबी आलं..

अजून काही पुढची विकेट पडत नाही, म्हणून एक माझ्या प्रतिसादामुळे पडेल का ते पहातो. ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोनी रिव्ह्यु घ्यायला नव्हता. युवराज ने जोर लावल्यामुळे रिव्ह्युव घेतला. चांगला निर्णय... आता जयवर्धने गेला म्हणजे झाले...

समरवीर धारातीर्थी पडला... रिव्ह्यू सिस्टिम झिंदाबाद!!