Skip to main content

..उरला पलाश आता

लेखक राघव यांनी मंगळवार, 01/11/2011 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सगळीच राख येथे.. दिसतो विनाश आता.. नुसते वळून बघता तुटतात पाश आता.. पाहून कुंपणा त्या.. जाणीव तीव्र होते; घर तेवढे निमाले..उरला पलाश आता.. राखेत जन्मणार्‍या पक्ष्यापरी स्थिती..की.. सर्वस्व जाळुनी मज दिसते अकाश आता? अंधार तेवतांना ठिणगी महाग होती.. डोळ्यांस त्रास होतो दिसता प्रकाश आता... आसुसल्या मनाला.. कूस तेवढी मिळेना.. आसेतलेच आर्त.. होते निराश आता.. (विषण्ण) राघव
काव्यरस

गजरा (2)

लेखक फिझा यांनी मंगळवार, 01/11/2011 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
3

माजी आमदार का पाजी आमदार?

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 01/11/2011 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
http://72.78.249.107/esakal/20111031/5343263362199730061.htm माजी आमदारांची वाढती भूक माजी आमदारांनी अशी मागणी केली आहे की आपल्या भक्कम वेतनाबरोबरच (२५००० महिना) आणखी सवलती आपल्याला आणि आपल्या पश्चात बायकामुलांना मिळाव्यात. एका सहकार्‍याबरोबर ३५ हजार किमी वर्षाला इतका प्रवास फुकट असतो तो अजून वाढवून ५० हजार करावा. जमल्यास फुकट हवाई प्रवास मिळावा अशा गंमतीच्या मागण्या काही माजी आमदारांनी केल्या आहेत. काही प्रश्न १.आमदारपद ही काही नोकरी नाही. त्यामुळे पेन्शन वगैरे प्रकार का लागू असावेत?

रंगीत माती पासून बनवलेले संगीतमय गणपती बाप्पा !!

लेखक पूनम ब यांनी मंगळवार, 01/11/2011 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
रंगीत मातीपासून बनवलेले हे संगीतमय गणपती बाप्पा तुम्हा सर्वाना नक्कीच आवडतील अशी आशा आहे.. गणपती बाप्पा मोरया !!

दीपावली साठी घरी बनवलेल्या पणत्या :)

लेखक पूनम ब यांनी मंगळवार, 01/11/2011 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसळ पाव कराना दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..या दिवाळी ला मी स्वताच घरी पणत्या बनवल्या..खूप छान अनुभव होता..रंगीत माती आणि गव्हाची कणिक याचा वापर करून सुंदर पणत्या तयार करता येतात.

सुट्टी संपली -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 01/11/2011 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टी संपली दिवाळी झाली घण घण घंटा ऐकायची दप्तर पाठीवरती टाकुन तुरू तुरू घाई पळायची ! पाठांतर अभ्यास परीक्षा वेळच गुंतुन जाण्याची शुद्ध न राहिल शाळेमध्ये डबा उघडुनी बघण्याची ! नवीन कपडे खेळ नवे नीट नेटके जपण्याची सुट्टीमधली सवय रहावी रोज पहाटे उठण्याची ! शंकरपाळी चिवडा लाडू चकली शेव करंजीची वर्षामधला धमाल सण आठवण नुसती करायची ! शाळेमधुनी दमून येता निवांत स्वप्ने पहायची पुढल्या वर्षी किती फटाके चक्रे झाडे आणायची ?

चपराक

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 01/11/2011 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
टिपः माझी एक कविता एका महाभागाने चोरुन चक्क आपल्याच नावाने चेपुवर प्रकाशित केली आणि ती नेमकी माझ्या मित्राने पाहीली आणि मला कळवले. ते बघुन असा संताप आला आणि ही कविता सुचली. जरा अतिशियोक्तीच झाली आहे, पण भावनेच्या भरात......... ;) चोरून चोरून तुम्ही चोरणार किती आहे अस्सल हिरा इथे माझिया हाती चोरून काय साधले तुम्ही शब्द माझे ? उजळल्याविना राहील का प्रारब्ध माझे ? आहे अजूनही लेखणीला माझ्याही धार येतो सरसावूनी शब्दांना अजूनच खुमार चोरलेल्या शब्दांचीच तुम्हा बसेल चपराक सणसणीत अस्खलित नाणे माझे वाजेल नेहमीच खणखणीत |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२९/१२/२०१०)
काव्यरस

The Shadow Of The Great Game: The Untold Story Of India's Partition: ले. नरेंद्र सिंग सरीला

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 31/10/2011 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला प्रथम एक खुलासा: येथील (मराठी साईट्स) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्‍या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे :) लेखकाची माहिती: नरेन्द्र सिंग नरीला हे मूळचे सरीला संस्थानचे वारस, नंतर लॉर्ड माउंट्बॅटन यांचे सहाय्यक (Aide-de-camp) आणि पुढे १९४८ ते १९८५ इतकी - तब्बल ३८ वर्षे- भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी होते.