Skip to main content

Ginger चिकन

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 02/11/2011 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दिवाळी संपली, फराळही संपला. म्हंटल एखादी झणझणीत आणि आवडती डिश हाणुया. :) आता गणपा महाराजांसारखा स्टेप बाय स्टेप पाककृती समजावण्याईतका माझा पेशंस नाही, पण तरी एक छोटासा प्रयत्न करतोय. जिंजर चिकन ड्राय हा माझा फार आवडता प्रकार आहे. साहित्यः १. लाल तिखट - सकाळी ऑफिसला जायचे आहे की नाही त्याप्रमाणे. २. तेल - पोटाच्या घेरानुसार ३. मीठ - ब्लड प्रेशर नुसार ४. कांदा मध्यम - शक्यतो पांढरा (कमी उग्र असतो म्हणून, शक्य तितका बारीक चिरून) ५. आले - खालच्या चित्रावर फुटपट्टी लावून ईंच मोजुन घ्या.

जखम

लेखक जयवी यांनी बुधवार, 02/11/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
फिरते आहे घेऊन, जखम एक ठसठसती खपली आहे वरती पण आतून भळभळती वरपांगी कमालीचा ... हसरा चेहरा आतून पार भेदरलेला, भित्रा नि बावरा आविर्भाव आहेत सारे, जग जिंकल्याचे शल्य सदा काळजात, सारे हरल्याचे सवयीचं होतंय आता, हुकमी हसू कधी मात्र दगा देतात, आपलेच आसू असेल का सोपं यापेक्षा अश्वत्थाम्याचं जिणं जखम दाखवत जगाला, तेल मागत फिरणं जयश्री अंबासकर

महागाई.. महागाई ..

लेखक विदेश यांनी बुधवार, 02/11/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक सोन्या-चांदीचे गगनी भाव जरी भिडले गुरुपुष्याच्या मुहूर्तावरी दागदागिने बहु घडले ! थेटरातला चालू आहे उघडा काळाबाजार पहिला खेळच पहायचा जडला आहे आजार ! चार चाकी दोन चाकी वाहने उच्चांकात नवी भाव वाढते पेट्रोलचे नको सायकल चैन हवी ! ग्यास रेशन कपडालत्ता गरजा सोडुन भलतिकडे कर्जामधुनी खर्च वाढतो धूमधडाका चोहिकडे !
काव्यरस

फेसबुकचे भाषांतर

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 02/11/2011 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो ! आत्ताच फेसबुकच्या मराठी भाषांतराबद्दलचा संदेश आला. तुम्हालाही तो आला असेलच. भाषांतर बघताना जाणवलं की बरेच शब्द आणि वाक्प्रचार अजून चांगले होऊ शकतील. तंतोतंत आणि समजायला सोपं भाषांतर करण्यात मिपाकरांचा कळफलक कोण धरणार? https://www.facebook.com/?sk=translations इथे जरा बघाल? आपल्यासारख्या जाणत्यांनी योगदान दिलं तर फेसबुकवर चांगली मराठी UI बघायला मिळेल. जे पी

सात अब्ज

लेखक विकास यांनी बुधवार, 02/11/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
१८०० च्या दशकात जगाची लोकसंख्या प्रथमच एक अब्जापर्यंत पोचली. १९२७ साली म्हणजे उण्यापुर्‍या शतका मधे ती दुप्पट अर्थात २ अब्ज झाली, साधारण सत्तर वर्षात, १९९८ साली ती सहा अब्ज इतकी झाली तर केवळ १३ वर्षांमध्ये ती आता ७ अब्ज इतकी झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या औपचारीक अंदाजाप्रमाणे कालच्या एकतीस ऑटोबरला जागतीक लोकसंख्या ही ७ अब्ज झाली! पण अमेरीकन लोकसंख्या मोजणी आयोगाप्रमाणे सात बिलीयन्स होण्यासाठी अजून चार-पाच महीन्यांचा अवधी आहे.

आपण पुस्तके का विकत घेतो?

लेखक चित्रा यांनी बुधवार, 02/11/2011 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच २०११ ची दिवाळी साजरी झाली. आपल्याकडे दिवाळीशी जोडलेला जसा लाडू, चकल्या, चिवडा असा फराळ असतो तसाच दुसरा एक फराळ निदान आपल्या महाराष्ट्रात पाहिलेला आहे तो म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीनिमित्ताने अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके, आणि मासिके आपापले विशेषांक काढत असतात असे दिसते. माझ्या घराच्या सदस्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येकाच्या आवडीची घरी वृत्तपत्रे येत, उदा. अनेक वर्षे आमच्या घरी सकाळ, नवशक्ती, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता तसेच टाईम्स ऑफ इंडिया ही रोजची पाच वर्तमानपत्रे येत असे आठवते. त्यानंतर त्यात इंडियन एक्स्प्रेसची भर पडली.

येद्या मुग्या

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 01/11/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांच्या झंझावाताने देश प्रेरीत झाल्याचा तो काळ होता. १९१७-१९१९ याकाळात कधितरी लोकमांन्यांचा मराठवाड्याचा दौरा होता. त्यात काही दिवस त्यांनी बीड जिल्ह्याला दिले. बीडजवळील महुज या गावी लोकांना मार्गदर्शन करुन टिळक लोकांशी संवाद साधत होते. त्या दरम्यात भारावलेले दोन तरुण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी. त्या तरुणांची नावे येदू/यदुनाथ (आडणाव, बहुतेक खाडे) व मुग्या (याचे नाव खूप जणांना विचारले पण कुणी सांगू शकले नाही; आडनाव बहुतेक थोरात असावे). असे म्हणतात की भेटीत टिळकांनी या दोन रांगड्या तरुणांना शोषित-पिडीत समाजासाठी कार्य करायचा सल्ला दिला.

भारताला गरज भरताची

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी मंगळवार, 01/11/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.amhimarathi.com/diwali2007/lekh/l8.html http://jaalavaani.blogspot.com/2010/08/blog-post_4332.html भारतीय नागरीक आपल्या पुराण पुरूषांच्या / देवतांच्या बाबतीत जरा जास्तच हळवे असतात. त्यांच्या विषयी कुठे काही वादग्रस्त छापून आले तर लगेच आक्रमक होऊन दंगल / जाळपोळ करतात. पण हेच भक्त लोक आपल्या आदर्शांचे गुण स्वत:च्या अंगी बाणविण्याबाबत तितकेसे उत्साही नसतात. रामायणातील राम व महाभारतातील कृष्ण हे आपल्यापैकी बहुतेकांचे आदर्श.

राजकीय द्रुष्टीकोन

लेखक राजघराणं यांनी मंगळवार, 01/11/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : विनोद वाचून सोडून द्यावा. कुणीही भावना दुखावून घेउ नये. आटपाट नगर होतं तिथं चार भाउ आपल्या आई वडिलांबरोबर सुखाने राहत होते. होत्याचं न्हवतं झाल. वडिलांच निधन झाल. वडिलांकडे होत्या दोन गायी ..... भाउ चार.... बहुत नाइंन्साफी..... प्रकरण पेटलं.. सरकारात गेलं.. सरकारी निवाडा दिला - मोठ्या भावाला एक गाय .. उरलेल्या तिन भावांना मिळून .. एक गाय. सगळ्यांनी गुण्या गोविंदानि रहावं !............... (नारायण ... नारायण....वरतुन मुनी सारं पहात होते.... अजब हा न्याय ? नारायण ... नारायण... ही काय न्यायाची रीति ? नारायण ... नारायण... उठा मालक ऊठा ...नारायण ... नारायण... """" सारख उठा ऊठा करू नको रे । मला आवडत नाही तो शब्द । """" नारायण ... नारायण... ह्यापेक्षा कलियुग परवडले म्हणायचे... सरकारी निर्णय आवडला नाही तर सरकार बदलायचं स्वातंत्र्य आहे तिथे... वेगवेगळे पक्ष .. त्यांची वेगवेगळी विचारसरणी .... आइकलं का महाराज ? ""''''' कटकट पुरे । मुद्द्यावर ये । """" नारायण ... नारायण... आमुचा तिन्ही लोकी तिन्ही काळी संचार.... नारायण ... नारायण... थांबा.. थांबा... कलियुगातल्या भारतवर्षात्ल्या प्रत्येक पक्षाने हा गायींचा निवाडा कसा केला असता... ते ऐकवतोच तुम्हाला .... )