Skip to main content

बंड्याची दिवाळी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 29/10/2011 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही.

मदतः अ‍ॅन्ड आय ड्रॉईड :)

लेखक धमाल मुलगा यांनी शनिवार, 29/10/2011 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी! काय मग? कशी काय झाली दिवाळी? झाले का फटाके उडवून? फराळाचं चापून गंडलेली पोटं आली का जागेवर? :D मंडळी, हा धागा मी काढलात तो आहे मदत मागण्यासाठी. मोबाईलजगतात अगदी क्रांती म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण करणार्‍या अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीवर आमचा नुकताच जीव जडलाय बघा. :) पण...आम्ही पडलो एकतर विंडोज मोबाईलवाले गरीब वापरकर्ते, आणि एकुणच तंत्रज्ञान, प्रणाली(Operating System) ह्या विषयातले तद्दन ढढ्ढोबा! गेला आठवडाभर झाला, सॅमसंगच्या अ‍ॅन्ड्रॉईड फोनशी खेळतोय खरा, पण त्यातल्या सोयी आणि एकुणच अ‍ॅन्ड्रॉईडबद्दलचं कुतुहल काही गप्प बसू देईना बॉ! मग म्हणलं, करावं तरी काय?

दिवाळीचे फटाके

लेखक राजघराणं यांनी शनिवार, 29/10/2011 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
फटाके ..... उडवायपेक्षा .. आपल्याला बुवा बघायलाच आवडतात .. त्यान पैसेहि वाचतात !

सहकार क्षेत्राविषयी पुनर्विचार करायची वेळ आली आहे का?

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 29/10/2011 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
मा. श्री. धनंजयराव गाडग़ीळ, श्री वैकुंठभाई मेहता आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातुन उद्योग क्षेत्राचा पाय रचला. १९४९साली प्रवरा सहकारी साखर कारखान्याची सुरवात झाली. दुष्काळी भागातील लौकीकार्थानी अशिक्षीत शेतक-याने महाराष्ट्राला नव्हे देशाला वेगळी दिशा दाखवीली. अनेक वर्षे या सहकाराच्यामाध्यमातुन ग्रामीण भागाचा कायापालट व्हायला सुरवात झाली. सहकाराच्या माध्यमातुन जोडव्यवसाय असलेल्या दुधाच्या धंद्याला महेसाणाच्या सहकारी डेअरीने वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवले.

पेपरातलं काम

लेखक यकु यांनी शनिवार, 29/10/2011 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या धाग्याच्या निमित्तानं काही जणांनी वृत्तपत्रातले किस्से लिहायला सांगितले आहे. असे किस्से लिहायला माणूस फिल्डवर, किमान संपादकीय विभागात काम केलेला असावा लागतो. कारण पेपरची भवती न भवती त्याच विभागात होते. मी मात्र माझ्या पहिल्या नोकरीत जाहिरात विभागाचा भाषांतरकार होतो.

नावडतीचे मीठ अळणी!

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 29/10/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
नावडतीचे मीठ अळणी!
‘नावडतीचे मीठ अळणी’ म्हण सहज आठवली... पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते. एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो. तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते.

बोटपेडव्याचा मोटला.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शुक्रवार, 28/10/2011 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)२०-२५ बोटपेडवे. २)खवलेलं खोबरं. ३)हळद. ४)लाल तिखट. ५)एक चमचा धणे. ६)चिंच. ७)२-३ हिरव्या मिरच्या. ८)एक चमचा बारीक चिरलेलं आलं.(आवडत असल्यास जास्त घतलं तरी चालेल) ९)३-४ हळदीची पाने. १०)१०-१५ तिरफळं. ११)मिठ. कृती :-प्रथम बोटपेडवे साफ करून त्याला मिठ लाऊन ठेवावे.मिक्सरच्या भांड्यात खवलेलं खोबरे घेऊन त्यात हळद्,लाल तिखट,धणे,चिंच व थोडे पाणी घालून जाडसर वाटून घ्यावे.नंतर त्यातच तिरफळं घालून एक फेरा फिरवावा.एका भांड्यात हळदीची पाने पसरून लावावी व त्य

(सौंदर्याचे प्रौक्षण करुनि)

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 28/10/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुच्या दिवाळीच्या कवितेचं मागल्या वर्षी विडंबन केलं होतं. यंदाही प्रयत्न करतो आहे! म्हटलं तर विडंबन म्हटलं तर निराळी कविता. कसंही.
काव्यरस