त्या दिवशी संध्याकाळी
पाऊस भुरभुरत होता,
भान विसरून मी
मनानं पावसात भिजत होते
तेवढ्यात तू आलास.
" छे, काय हा पाऊस!
वैताग नुस्ता
चिकचिक, चिखल, बाप रे"
मी पाहीलं तुझ्याकडे,
नवलाने.
"तुला नाही आवडत पाऊस?
झिमझिमणारा पाऊस,
भुरभुरणारा पाऊस,
कोसळ्णारा पाऊस.....
"हं, त्यात काय आवडायचं?
समुद्राच्या पाण्याची वाफ होते,
ती आकाशात जाते,
तिथे त्याचं हे होतं, ते होतं,
आणि पाऊस पडतो.
मी हसले, दुखावून
"तुझी नावड ही ठीक आहे,
मला तरी कुठे आवडतात,
पावसाची शास्त्रिय कारणे?
तू एकदम गप्प झालास.
जाताना टेबलावरचा चाफा
उचलून म्हणालास,
"ही नेऊ?"
मी पाहीलं तुझ्या डोळ्यात,
तुला पाऊस आवडायला लागला होता.
..........................
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1621
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाऊस -
धन्यवाद
अरे, मस्त कविता! वाचायची
आभारी आहे
In reply to अरे, मस्त कविता! वाचायची by नगरीनिरंजन
नाही पटले
!!!
In reply to नाही पटले by धनंजय
मस्त..
छान कविता.
सुंदर कविता.
सुंदर!