छे! बाबांना कितीतरी मुद्दे सांगायचे होते, पण का कोण जाणे, जमतच नव्हतं काही बोलायला... काल त्यांच्या ऑफीसमधले काका अभिनंदन करत होते, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. मी ठरवलंच होतं सरळ त्यांना सांगायचं - तुमची बढती झालीय ना, मग जा तुम्हीच एकटे. मी नाही येणार! पाहिजे तर आईला पण घेऊन जा, मी राहीन इथे आजीबरोबर. हो, जमेल आम्हाला! काय गं आजी?
इथे माझे मित्र आहेत, माझी शाळा आहे, मस्त मोकळं मैदान आहे, ह्या वर्षी खो-खो चा कॅप्टन पण होईन मी... हे सगळं व्यवस्थित असताना का येऊ तिथे अनोळखी जागी? तिथं कसे मित्र होणार माझे? शाळा तरी असेल का ह्या शाळेसारखी? छे, का ऐकत नाही ही मोठी माणसं?
*************
इतकं मुद्देसूद सांगूनही का ऐकत नाही हे कार्टं? थांब, मीच आवरून देतो पटपट. अरे, काल तर आवडलं होतं ना तुझं नर्सरी स्कूल? आज का इतकं भोकाड? घरी बसून काय करणार मग? नविन फ्रेंड्स, टीचर, युनिफॉर्म - आता न आवडण्यासारखं काय आहे? आणि तू एकटाच जाणार आहेस का? आम्ही नाही गेलो - मी, आई, मावशी - अरे, सगळेच गेलो ना शाळेत... आजोबांची तर सारखी ट्रान्स्फर व्हायची. दर २-३ वर्षांनी नविन शाळा, नवे दोस्त - किती मज्जा! पण ह्याचं आपलं नुसतं 'ए बाबा, शाळा नको'... चला, चला आता. नविन प्रोजेक्टची मीटिंग आहे मला आज.
*************
मिसळपाव
प्रतिक्रिया
दूसरी भुमिका नाही जमली असे
दूसरी भुमिका नाही जमली असे वाटते आहे.
लघु लेख्ननाचा चांगला प्रयत्न
लघु लेख्ननाचा चांगला प्रयत्न आहे.
पु.ले.शु.
नर्सरीतल्या पोराला बरेच जास्त
नर्सरीतल्या पोराला बरेच जास्त विचार आलेतसे वाटते. पण प्रयत्न चांगला आहे. अजून अशाच धर्तीवर वाचायला आवडेल.
अरेच्चा! मला तर हा एकाच
In reply to नर्सरीतल्या पोराला बरेच जास्त by गवि
अरेच्चा!
मला तर हा एकाच व्यक्तीचा भूमिकाबदल वाटला '(खो-खो चा कॅप्टन होऊ घातलेला) शाळकरी मुलगा -> (नर्सरीमधल्या मुलाचा) पिता' असा.
असो. ठीऽऽऽक आहे प्रयत्न. पण जरा संस्थळाच्या नावाला शोभणारे लेखन टाका बुवा. काही तरी गॉसिपमय कौल, जीवनावर 'रोशनी', चटकदार पाकॄ, किमानपक्षी दर तीन वाक्याला एखादी नवी शिवी किंवा स्फोटक/एकांगी विचार असलेल काही... :)
मला तर हा एकाच व्यक्तीचा
In reply to अरेच्चा! मला तर हा एकाच by रण्गोपा
मला तर हा एकाच व्यक्तीचा भूमिकाबदल वाटला
ओक्के. आता सेकंड रीडिंगला मलाही तसंच वाटतंय. माझी समजण्यात चूक झाली.
मला वाटले एकाच वेळी मुलगा आणि बापाच्या परस्पर प्रतिक्रिया आहेत एका घटनेविषयी..
+१........ मलाही एकाच माणसाचा
In reply to अरेच्चा! मला तर हा एकाच by रण्गोपा
+१........ मलाही एकाच माणसाचा भुमिका बदल झाल्याचा वाटलं............
अवांतर:
>>>स्फोटक/एकांगी विचार असलेल काही.
तुम्ही बाकि धागे वाचलेले दिसत नाहित............