वाह उस्ताद!
नुकतेच गेल्या महिन्यात उस्ताद झाकिर हुसेन यांच्या एका कर्यक्रमात मॅनेजमेंट टीम मध्ये काम करण्याची (सुवर्ण)संधी प्राप्त झाली. त्यांच्या सहवासात आमची पूर्ण टीम तब्बल दोन दिवस होती.
त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर प्रवासापासूनच हळूहळू त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं. आम्ही कार्यक्रमाच्या शहरात पोचत असतानाच गाडीच्या ड्रायवरला चहा विचारण्यापासूनच ते नंतर त्याच्यासोबत चहा एंजॉय करेपर्यंत आम्हाला समजून चुकलं, की आपले पुढचे दोन दिवस एका उमद्या आणि नम्र कलाकरासोबत जाणार.
मिसळपाव