मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमचीही दांडगाई ___दान

चिंटु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आता मगजात, मध्‍ये यावे - कोणे परि नी किती ओकावे चिडौनी सर्वांसी घालावे, मेंटलात हे ||१|| . हे बाळांची सुरसुरी नासो, तया सुन्नमनस्कता वाढो, जालात परस्परे घडो, मैत्र मुला-मुलींचे ||२|| . बुद्धीकुंभ साठले, आओ, जग वाचते लिहा हो, जो जे कुंथील ते भरभरुन येवो, धागियांत ||३|| . अरे हे तर सकळ चांडाळी, इगोनिष्‍ठांची वळवळे अळी, ‍अनिवार ओरडे पांगळी, खेटरें खाता ||४|| . केले मसंस्थलाचे बारव, घेऊनी मराठीचे नाव, ओकीती जे बडबड केवळ, आयुष्‍यांची ||५|| . मेंढरे जी गर्दन घालून, एडके जे शिंगहीन, हे बारमाही सदा धरोन, स्व-चर्चा हेतू ||६|| . स्‍त्रीमुक्ती विदुषी येवो, वाट्टेल तैसे नाचो नवर्‍यांचे पार्श्वी घालो, लत्ता रोजी||७|| . किंबहुना सर्व स्थली, राखावी शक्य तीती गल्ली, जाई तो कालसुखांती, लॉगिने होतां ||८|| . आणि ग्रंथउचकटावे, भुक्कड विषयी ल्याहावे दुष्‍टां खरेदी कर्मे नित्ये, धाडावें जी ॥९॥ . येथ कवणे काय करावें, हा होतोच कालापव्ययै, येणे कित्येक चांगदेवो, भ्रमिष्‍ट झाले ||१०|| . -- जंत जानलेवो

वाचने 3031 वाचनखूण प्रतिक्रिया 16

अत्रुप्त आत्मा 16/03/2012 - 00:04
---^---

गोंधळी 16/03/2012 - 00:26
मस्त.

मन१ 16/03/2012 - 14:30
ह्यातूनच एक सही सुचली आम्हाला आजच.

पैसा 16/03/2012 - 19:03
आंतरजालावरची मेंटलांची मांदियाळी अचूक टिपणारे तुम्ही कोण तरी द्रष्टे दिसताय! चिंटू या नावामागे कोण महारथी आहे माहिती नाही, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत!
हे बाळांची सुरसुरी नासो, तया सुन्नमनस्कता वाढो, जालात परस्परे घडो, मैत्र मुला-मुलींचे ||२||
या तुमच्या इच्छेला आमेन म्हणण्यापलीकडे काही ऑप्शन नाही. सगळे चिमटे, बोचकारे, लत्ता प्रहार व्यवस्थित अभ्यास करून आलेत हे दिसतंच आहे! रचना उत्तम पण
स्‍त्रीमुक्ती विदुषी येवो, वाट्टेल तैसे नाचो
यासाठी तुम्हाला 'फटके' द्यावेत असं मला एक स्त्रीमुक्तीवादी असल्यामुळे वाटतं आहे!

चौकटराजा 16/03/2012 - 19:30
अरे हे तर सकळ चांडाळी, इगोनिष्‍ठांची वळवळे अळी, ‍अनिवार ओरडे पांगळी, खेटरें खाता ||४|| ही ओळ आवडली पण इगोवाल्याना थेट चांडाळ म्हणायचे ? मग पृथ्वीचे नाव चांडाळी ठेवावे लागेल. ( च्यायला चौकट राजा पचकलाच की ! )
जालिय घाणेश्‍वरांचा प्रयत्न जबरदस्त आहे. मिपाचं आणि इथल्या 'सदस्यविषयांचं वाचन' लोक किती अभ्यासपूर्वक करतात हे पाहून ड्वाले, अखेर पाणावलेच !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 18/03/2012 - 21:38
च्यायला, चिंटूसेठ लैच भारी. अजून येऊ दे. :) -दिलीप बिरुटे

पैसा 27/08/2012 - 21:36
सुडची सही बघून कालच आठवण झाली होती.

सतिश गावडे 26/04/2017 - 21:23
काय लिहीलं आहे राव >>इगोनिष्‍ठांची वळवळे अळी हे भविष्यकथन होतं की नुकतेच याची सुरुवात झाली होती ? ;)