उडाली पाखरे परदेशी ,मोकळा चौसोपी वाडा.
पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा..
परसदारी तो औदुंबर, असे शांतपणे उभा.
ना त्यास प्रदक्षिणा, ना कुणी राखे निगा.
कोनाड्यातील आरसा ,उडाला त्याचा हि पारा
भीतीवरील कुंकु खुणा, मिरवी सौभाग्याचा तोरा
अडगळीतली रेशमी वसने, सांगे शृंगाराच्या कथा
कोप~यातली उभी काठी, रडे वार्धक्याच्या व्यथा.
कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा?
ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
2135
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है अविनाशजी !!!
छान जमली आहे कविता! वातावरण
वा....
छान जमलिये
व्वा. एकदम सही. अकुकाका जियो.
जब्रा कविता.
मस्त!!
मस्तच
अप्रतिम कविता
व्वा व्वा...सुंदर चित्र उभ
अप्रतिम. आज सगळ्या सुंदर
एकदम करुण... चित्रदर्शी शब्द
ही तर " औदुंबर " च्या तोडीची कविता