Skip to main content

अलिस्टर परेरा

लेखक पारा यांनी शुक्रवार, 13/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आजच वर्तमानपत्रात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. दारू पिऊन गाडी चालवून पदपथावरील ७ लोकांना मारल्याबद्दल अलिस्टर परेरा या व्यक्तीस दिलेल्या ३ वर्षांच्या शिक्षेबाबत बातमी होती. ही आणि आणि अश्या अनेक बातम्या दर महिन्याकाठी आपण वाचत असतो. म्हणजे कोण्या मोठ्या व्यक्तीच्या हातून असा काही घडलं की त्याची बातमी पहिल्या पानावर असते, बाकीच्या अश्या दुसऱ्या/तिसऱ्या पानावर येतात. लेखाचा विषय असा की ह्या माणसावर (आणि पूर्वी सलमान खानवर) जो आरोप केलेला आहे त्यात मनुष्यवधाचाही समावेश होतो. 'Culpable homicide' म्हणजे सदोष मनुष्यवध. ह्याला थोडासा आक्षेप घ्यावासा वाटतो. कोणी काही म्हणायच्या आधी हे सांगितलेले बरे की लेखक फार :) मद्यपान करीत नाही, केलेच तर कधीही कुठल्याही गाडीच्या चावीलाही हात लावत नाही, लेखकाच्या मनात सर्व स्तरावरील सर्व जीवांबद्दल (माणूस धरून) आदर आहे.
  1. दारू प्यायला : मान्य
  2. त्यानंतर गाडी चालवली : मान्य
  3. त्याला ती सांभाळता आली नाही : मान्य
  4. पदपथावर घुसला : मान्य
  5. मनुष्यवध : मान्य
  6. सदोष मनुष्यवध : (अ)मान्य
रस्त्याच्या बाजूचा पदपथ ही माणसांनी झोपायची जागा नव्हे. ह्यावर कोणी कितीही आरडा ओरड केली, तरी त्या आरडा ओरडीचे विषय ह्या लेखाच्या विषयाबाहेर जातात. सार्वजनिक मालमत्तेच नुकसान झालं वगैरे ठीक आहे, त्याच्या हातून मनुष्यवध झाला, त्याने तो केला नाही. किंबहुना तिथे माणसाचं सहज दृष्टीपथात येणार नाही अश्या प्रकारे असणं हेच थोडा अयोग्य आहे. समोर माणूस दिसला असता तर त्याला वाचवायचा प्रयत्न त्याने कदाचित केलाही असता. (अर्थात इथे जर तर ला काही अर्थ नाही) मिपा करांची मते काय बुआ ह्यावर ?

वाचने 7512
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

अ‍ॅलिस्तर परेराला महाराष्ट्र उच्च न्यायालयाने ३ वर्षाची शिक्षा केली हेच मुळी अजब आहे. सर्वोच्च न्यायालय बुचकळ्यात पडलंय. सलमान खान सारखं हा ही सुटणार वाटतं. नंतर बिग बॉस मध्ये जाईल आणि सेलिब्रिटी होईल. मागून नुरीया युसुफ हवेलीवाला त्याला फॉलो करील आणि दोघे स्वयंवर पण रचतील. आपण आपलं गप्प राहून चॅनल चेंज करावं. अवांतरः नशा करून गाडी खाली पदपथावरील झोपलेल्या व्यक्तिंना चिरडणे ह्यावर दक्षिण मुंबईकरांची मक्तेदारी आही का ह्यावर विचार करतोय.

हाच प्रश्न पडला होता. महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन. अलिस्टरच्या अपघातात मला वाटतं सात लोक एकसाथ ठार झाले आहेत. या मोठ्या मृत्युसंख्येमुळे ही केस फार सिरियस झाली. पण एकदा गाडी पदपथावर चढली म्हटल्यावर एक , दोन किंवा सात व्यक्ती मरणे यातला फरक चालकाच्या पक्षी इथे अ‍ॅलिस्टरच्या कंट्रोलमधे नव्हता. कदाचित ही गाडी पेट्रोल पंपात घुसली असती आणि मोठा स्फोट होऊन चाळीस लोक ठार झाले असते. (निव्वळ उदाहरण, पेट्रोल पंपावर काही तांत्रिक उपाय असतील.. असे होईल असं नव्हे वगैरे हे आहेच.) चूक आहे ती पिऊन वाहन चालवण्यात. हे नि:संशय सत्य आहे की मद्यपानाने वाहन चालवण्याच्या कौशल्यात गंभीर फरक पडू शकतो. त्यामुळे हा प्रकार सदोष मनुष्यवध या सदरात यावा हे चूक नाही. याचा अर्थ असा की मूलतः टाळण्यासारखा आणि वेल डॉक्युमेंटेड दोष होता (दारुच्या अंमलाखाली गाडी हाकणे ही चूक केली गेली होती) आणि ती नंतर मोठ्या जीवितहानीला कारणीभूत ठरली. पण नेमकी किती जीवितहानी झाली त्यावर ही शिक्षा अवलंबून ठेवावी / न ठेवावी हा खरोखर कठीण प्रश्न आहे. मला वाटतं मद्य पिऊन गाडी चालवणे या गुन्ह्याबद्दल जास्तीतजास्त वाईट परिणाम गृहीत धरुनच शिक्षा केली जावी. कारण कॉन्सीक्वेन्शियल डॅमेज ठरवणे आणि भरुन देणे अवघड आहे. उदा: मी घेतलेली "लाटा" कंपनीची चप्पल शोरुमबाहेर येताच तुटली, तर कंपनीची लायेबिलिटी ती चप्पल बदलून दुसरी देण्याइतकीच असते. त्या चप्पल तुटल्यामुळे मी तोल जाऊन ड्रेनेजमधे पडलो आणि पाय मोडले, शिवाय माझ्या हातातलं प्लेविन सुपर लोटोचं एक कोटीचं तिकीट गटारात वाहून गेलं, अशा कॉन्सिक्वेन्शियल डॅमेजला "लाटा"ला जबाबदार धरता येणार नाही.

In reply to by गवि

>>>>>उदा: मी घेतलेली "लाटा" कंपनीची चप्पल शोरुमबाहेर येताच तुटली, तर कंपनीची लायेबिलिटी ती चप्पल बदलून दुसरी देण्याइतकीच असते. त्या चप्पल तुटल्यामुळे मी तोल जाऊन ड्रेनेजमधे पडलो आणि पाय मोडले, शिवाय माझ्या हातातलं प्लेविन सुपर लोटोचं एक कोटीचं तिकीट गटारात वाहून गेलं, अशा कॉन्सिक्वेन्शियल डॅमेजला "लाटा"ला जबाबदार धरता येणार नाही. "गविकाकांच्या सल्ला" यासाठी खूSSSSSSSSSSप पोटेंशियल आहे हो तुमच्यात..! :-) मोदक

कायदा काय म्हणतो ते महत्वाच आहे. माझ वैयक्तिक मत आहे की अपघात कधीही आणि कोणाकडूनही घडू शकतो. गाडी चालवताना नियंत्रण सुटने ही दुर्दैवी बाब असली तरी असे कोणाकडूनही घडू शकते. (दारु पिऊन अथवा न पिऊन ) पण दारू पिऊन चालवल्यास बोंब जास्त उठवली जाते आणि बर्याच संदर्भात ते रास्त आहे. पण रस्त्यावर / फुटपाथवर झोपणे कितपत योग्य आहे? मी फुटपाथवर झोपले म्हणून गाडी चढवा या मताचा नाही पण हा एक अपघात आहे आणि रस्त्यावर घडण्याची शक्यता जास्त आहे मग फुटपाथवर झोपणे किती योग्य? कायद्यात हे बसते का? पोलिस, महानगरपालिका याची जबाबदारी घेतात का? परिस्थितीमुळे हतबल होऊन नाईलाजास्तव फुटपाथवर झोपावे लागणार्यांविषयी पूर्ण सहानुभूती पण त्यांचही चुकतेय थोड.

In reply to by सौरव जोशी

गाडी चालवताना नियंत्रण सुटने ही दुर्दैवी बाब असली तरी असे कोणाकडूनही घडू शकते. (दारु पिऊन अथवा न पिऊन ) पण दारू पिऊन चालवल्यास बोंब जास्त उठवली जाते आणि बर्याच संदर्भात ते रास्त आहे.>> अहो बर्‍याच संदर्भात नाही ते सगळ्याच संदर्भात रास्त आहे. दारु पिऊन गाडी चालवणे हाच गुन्हा आहे. अपघात होणे न होणे ही लांबची गोष्ट. मी फुटपाथवर झोपले म्हणून गाडी चढवा या मताचा नाही पण हा एक अपघात आहे आणि रस्त्यावर घडण्याची शक्यता जास्त आहे मग फुटपाथवर झोपणे किती योग्य? कायद्यात हे बसते का? पोलिस, महानगरपालिका याची जबाबदारी घेतात का?>> कायद्यात फुटपाथवर झोपणे योग्य नाही आहे. पण फुटपाथवर गाडी चालवणे तर आणखीनच अयोग्य आहे.

आजच वर्तमानपत्रात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. दारू पिऊन गाडी चालवून पदपथावरील ७ लोकांना मारल्याबद्दल अलिस्टर परेरा या व्यक्तीस दिलेल्या ३ वर्षांच्या शिक्षेबाबत बातमी होती. ही आणि आणि अश्या अनेक बातम्या दर महिन्याकाठी आपण वाचत असतो. म्हणजे कोण्या मोठ्या व्यक्तीच्या हातून असा काही घडलं की त्याची बातमी पहिल्या पानावर असते, बाकीच्या अश्या दुसऱ्या/तिसऱ्या पानावर येतात. ?????????? >>>>>लेखाचा विषय असा की ह्या माणसावर (आणि पूर्वी सलमान खानवर) जो आरोप केलेला आहे त्यात मनुष्यवधाचाही समावेश होतो. 'Culpable homicide' म्हणजे सदोष मनुष्यवध. ह्याला थोडासा आक्षेप घ्यावासा वाटतो. -----लेख कुठे ठेवलाय? इथे तर कुठेच लेख दिसत नाह‍िये. आक्षेप नेमका आजच आणि इथे का ? >>>>कोणी काही म्हणायच्या आधी हे सांगितलेले बरे की लेखक फार मद्यपान करीत नाही, केलेच तर कधीही कुठल्याही गाडीच्या चावीलाही हात लावत नाही, लेखकाच्या मनात सर्व स्तरावरील सर्व जीवांबद्दल (माणूस धरून) आदर आहे. ---छान. >>>>>दारू प्यायला : मान्य त्यानंतर गाडी चालवली : मान्य त्याला ती सांभाळता आली नाही : मान्य पदपथावर घुसला : मान्य मनुष्यवध : मान्य सदोष मनुष्यवध : (अ)मान्य ----कुणीतरी ठार होण्‍याच्या मागचा सगळा घटनाक्रम मान्य आहे मग तोच घटनाक्रम पुढे जाऊन कायदा तुम्हालाही ठार करीत असेल ओरडता कशाला. >>>रस्त्याच्या बाजूचा पदपथ ही माणसांनी झोपायची जागा नव्हे. ह्यावर कोणी कितीही आरडा ओरड केली, तरी त्या आरडा ओरडीचे विषय ह्या लेखाच्या विषयाबाहेर जातात. सार्वजनिक मालमत्तेच नुकसान झालं वगैरे ठीक आहे, त्याच्या हातून मनुष्यवध झाला, त्याने तो केला नाही. किंबहुना तिथे माणसाचं सहज दृष्टीपथात येणार नाही अश्या प्रकारे असणं हेच थोडा अयोग्य आहे. समोर माणूस दिसला असता तर त्याला वाचवायचा प्रयत्न त्याने कदाचित केलाही असता. (अर्थात इथे जर तर ला काही अर्थ नाही) ----इथे कोण कशाला उगाच आरडाओरड करील? आमचे सलमान, परेराशी लागेबांधे नाहीत. जर तरला अर्थ नाही तर मग हे कशाला लिहिलंय? >>>मिपा करांची मते काय बुआ ह्यावर ? ----वर दिली आहेत. ‍अथ: प्रथमो एवंच ‍अंतिम प्रतिसाद: इत्यलम्.

>>त्याच्या हातून मनुष्यवध झाला, त्याने तो केला नाही बरोबर. म्हणूनच त्याला सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरवलंय. केला असता तर खुनाबद्दल दोषी ठरवलं असतं. आणि कदाचित फाशी किंवा जन्मठेप झाली असती. अतिअवांतर : नवज्योत सिद्धू याने (शुद्धीत असताना) रस्त्यावर मारामारी केली होती आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीस ठार मारणे हा सिद्धूचा हेतू नव्हता म्हणून त्याच्यावरही असाच सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला गेला होता. अर्थात त्याच्यासाठी वेळोवेळी सूट देण्यात आली. क्रिकेट संघातून परदेशी जाण्यसाठी परवानगी देण्यात आली वगैरे. नंतर त्याला दोषी घोषित करण्यात आले. त्याने सुप्रीम कोर्टात अपील केले आहे आणि सुप्रीम कोर्टाने सध्या तो निकाल स्थगित केलेला आहे. सध्या तो चारित्र्यवान पक्षाचा खासदार आहे. अतिअतिअवांतर : गुन्हेगारी केसेस असलेल्या खासदारांच्या टॉप १० यादीत सिद्धूचे नाव मात्र नाही. :(

In reply to by नितिन थत्ते

नवज्योत संबंधी ही घटना "some are more equal" चे एक चपखल उदाहरण आहे. खरे तर हा खुन म्हणुनच धरायला हवा होता. ही घटना आपल्या सिस्टीम बद्दल प्रचंड नैराश्या आणते.

In reply to by नितिन थत्ते

सध्या तो चारित्र्यवान पक्षाचा खासदार आहे. अतिअतिअवांतर : गुन्हेगारी केसेस असलेल्या खासदारांच्या टॉप १० यादीत सिद्धूचे नाव मात्र नाही त्या यादीतही सर्वात जास्त खासदार त्या चारीत्र्य वान पक्षाचेच आहेत

In reply to by नितिन थत्ते

सदोष मनुष्यवधाचा दोष उमगला. अवांतरः >>अतिअवांतर : ...तो चारित्र्यवान पक्षाचा खासदार आहे. -- याची सुरुवात पप्पु कलानी, भाई ठाकुर इ. मंडळी अती चारित्र्यवान पक्षात जाउ लागल्यापासुन झाली असेल काय?? (चारित्र्यवान) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तसेही कोणत्याही पक्षाला चारित्र्यवान म्हणायचे असेल तर "चारित्र्यवान" ह्या शब्दाची व्याख्याच बदलावी लागेल

In reply to by नितिन थत्ते

"या" पक्षाशी जोडण्याबद्दल तुमचा "हात" कोणिही धरू शकणार नाही. आता त्या रिपोर्ट बद्दल बोलू. त्या रिपोर्टमधे म्हणले आहे की The Bharatiya Janata Party [ Images ] tops the list of criminal candidates with 42. The Congress is a close second with 41 tainted candidates. (ही बातमी चुकिची आहे. हे ४२ अथवा ४१ खासदार नसून त्या पक्ष्यांच्या निवडुन आलेल्या खासदारातील ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याची टक्केवारी आहे. (उदा. NCPची ट्क्केवारी ४४ आहे. म्हणजे खासदार ४ आहेत.) हा रीपोर्ट बघा. (नकाशा खालील टेबल बघा.) अरेरे. भारताला स्वातंत्र्य मिळवुन देणा-या या पक्षाची ही अवस्था. राष्ट्रपित्याच्या आत्म्याला यातना होत असतील हे बघून. त्यात सत्तेत सहभाग असणा-यांचे आणि पाठींबा देणा-यांचे आकडे एकत्र केले की त्यांना २/३ बहूमत आहे यात शंका नाही.

In reply to by चिंतामणी

याच लिंकेत खाली बघितले तर "सोनिया गांधी एक्स्पोज्ड" ही सुब्रमण्यम स्वामी या उठवळ माणसाची लिंक दिसते. त्यामुळे चिंतामणरावांनी दिलेल्या लिंकेला कितपत सिरियसली घ्यावे हा प्रश्नच आहे. आणि जरी ती लिंक सिरियसली घेतली तरी भाजप आणि एन.डी.ए शी निगडीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे एकूण ५९ खासदार आहेत (भाजपः ४२, शिवसेना: ८, जदयु: ७, अकाली दल आणि झारखंड मुक्ती मोर्चा: प्रत्येकी १. तर युपीए शी निगडीत ५४ (कांग्रेसः ४१, तृणमूलः ४, राष्ट्रवादी: ४, द्रमुकः ३, राष्ट्रीय लोकदलः २). तेव्हा कोणाला २/३ बहुमत आहे आणि कोणाला साधे बहुमत आहे याचे गणित पक्के आहे. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उलटाच निष्कर्श काढणार. जमिनीवर सरळ उभे राहणा-याला मात्र २०२ + सहकारी पक्षातील इतर (गुन्हेगार) खासदार हा आकडा ११६ + सहकारी पक्षातील इतर (गुन्हेगार) खासदार यापेक्षा जास्त दिसतो.

In reply to by चिंतामणी

एन.डी.ए चे लोकसभेत साधारण १६५ खासदार आहेत. त्यातील ५९ तर युपीए च्या २६० खासदारांपैकी ५४. म्हणजे टक्केवारी कोणाची जास्त आहे? तेव्हा उलटा निष्कर्ष माझा नाही तर तुमचा आहे. आणि मी रात्री झाडावर उलटे लटकावे की दिवसा, उलटे लटकावे की सरळ हा पूर्णपणे माझा प्रश्न आहे. त्याचा निष्कर्षांशी काहीही संबंध नाही. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आपल्याला काय यातलं कळत नाही ब्वॉ! पण सुब्रमण्यम स्वामींना उठवळ म्हणणं म्हणजे ... हॅहॅहॅ! असो. आपण काय बोलणार ब्वॉ!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुब्रमण्यम स्वामींना उठवळ म्हणणं म्हणजे ... हॅहॅहॅ
जरा http://ibnlive.in.com/generalnewsfeed/news/subramanian-swamy-questioned… हे वाचा. भडकाऊ विधाने करत असलेल्या मनुष्याला उठवळ का म्हणू नये तेच समजत नाही. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

In reply to by चिंतामणी

कळलं नाही. माझा तर अशी यादी काढण्याच्या पद्धतीलाच आक्षेप आहे. कारण क्रिमिनल केसेस मध्ये बर्‍याच हार्मलेस गोष्टी सुद्धा येतात. आणि क्रिमिनल केसेस या आंदोलनाच्या निमित्ताने लावल्याही जातात. उदा. 'त्या' नकाशात सीपीआयच्या आंध्रातील खासदाराची माहिती आहे. त्यात Rioting with deadly weapon, disobeying public servant, Hurting public servant to prevent him from doing his duty, Attempt to murder, Arms act, PPDA act असे गुन्हे दिले आहेत. त्यातील घातक शस्त्रांसह दंगल हा एकच गुन्हा गंभीर दिसतो. बाकी disobeying public servant, Hurting public servant to prevent him from doing his duty हे गुन्हे कोणत्याही जनाअंदोलनात दाखल होऊ शकतील आणि १९४७ पूर्वीच्या बहुतेक स्वातंत्र्यसैनिकांवर हे लागू असतील. अण्णांना अटकेतून सोडल्यावर त्यांनी जेलमधून बाहेर जाण्यास नकार दिला तेव्हाही डिसओबेईंग पब्लिक सर्वंटचा गुन्हा दाखल होऊ शकला असता. Attempt to murder हा बहुधा Hurting public servant चाच परिपाक म्हणून लावला गेला असेल. जनता सरकारच्या काळात जेव्हा इंदिरा गांधींना अटक करण्यात आली तेव्हा सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनगर किंवा अशाच कुठल्यातरी समाजाचा मोर्चा निघाला होता. तेव्हा त्या समाजाचे लोक भाले बर्च्या घेऊन मोर्चात आले होते. त्यांच्यावरही बहुधा Rioting with deadly weapon व शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झालेला असेल. त्या नकाशात ६४ क्रमांकावर गोविंदाचे नाव आहे. त्याच्यावरचे गुन्हेगारी आरोप चारित्र्यहनन आणि ऑब्सीन डान्स & साँग असे आहेत. मुद्दा हा की गुन्हे दाखल झाले आहेत आणि अशी कलमे लावली आहेत म्हणून गुन्हा कोणत्या परिस्थितीत दाखल झाला वगैरे माहिती न मिळवता "गुन्हेगार उमेदवार निवडणुकीत उभे असल्याची/निवडून आल्याची" हाकाटी करून छाती पिटणे मला पटत नाही. म्हणून मी अशा क्रिमिनल केसवाल्या खासदारांच्या आकड्याला फार महत्त्व देत नाही. नवज्योत सिद्धू हे "कन्व्हिक्टेड" गुन्हेगार आहेत. त्यांचा गुन्हा हा नुसता आरोप नाही. फॅक्ट आहे. अवांतर : भाजपचे ४२ व काँग्रेसचे ४१ खासदार हा मुद्दा मी काढला नव्हता कारण मला या कुठल्याच संख्या मान्य नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

पण तुम्ही असल्याच संदर्भ घेउन त्या यादीत सिध्दुचे नाव नसल्याबद्दल दु़:ख प्रदर्शीत केले होते. असो. आता बाकी मुद्द्यांवर चर्चा नको कारण तेथे असे मुद्दे आहेत (उदा. सज्जनकुमार यांचेबद्दल फक्त 499/500/501 (defamation) असे म्हणले आहे). म्हणून यादीबद्दलची चर्चा बंद करतो.

In reply to by चिंतामणी

सहमत आहे. सज्जनकुमार यांचे नावे इतकेच गुन्हे दाखल आहेत असे असल्याने असल्या यादीला महत्त्व देऊ नये हे तर खरेच. शिवाय ही यादी आरोपी आणि कन्व्हिक्टेड यात फरक करत नाही हाही दोष यादीत आहे. (बाय द वे सिद्धूचे नाव यादीत आहे)

In reply to by नितिन थत्ते

:) :-) :smile:

.

रस्त्याच्या बाजूचा पदपथ ही माणसांनी झोपायची जागा नव्हे.
हे मान्य आहे (अर्थात दोन वेळचं खायला मिळायची मारामार असलेल्या लोकांना हे कळूनही वळू शकत नाही आणि त्यांच्यासमोर जरी असं बोललं तरी ते पेटून उठत नाहीत म्हणून चालू द्या) . पण समजा ते उभे असते तर वाचले असते असं तुम्हाला म्हणायचंय? जर तसं म्हणायचं नसेल तर
किंबहुना तिथे माणसाचं सहज दृष्टीपथात येणार नाही अश्या प्रकारे असणं हेच थोडा अयोग्य आहे
या वाक्याला काहीही अर्थ नाही. त्याला ते दिसले नाही आणि तिथे कोणी नाहीय असं बघून त्याने फुटपाथवर गाडी घातली असं तुम्हाला सुचवायचंय का?
त्याच्या हातून मनुष्यवध झाला, त्याने तो केला नाही.
या साठी वरती थत्तेंचा प्रतिसाद पहावा.
समोर माणूस दिसला असता तर त्याला वाचवायचा प्रयत्न त्याने कदाचित केलाही असता.
ज्याला गाडी रस्त्यावर ठेवता येत नाहीये असा माणूस गाडी फुटपाथवर जाताना फुटपाथवरच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न कसा करणार होता? त्या मेलेल्यांपैकी तुमचं कोणीच नव्हतं म्हणून तुम्हाला या गोष्टी सुचत आहेत. बाकी काही नाही. अन्यथा सात लोकांच्या मृत्युला कारणीभूत होऊनही फक्त ३ वर्षे शिक्षा कमीच म्हणायची.

रस्त्याच्या बाजूचा पदपथ ही माणसांनी झोपायची जागा नव्हे. ही खुप डीप रुटेड समस्या आहे. ते लोक इथे का आले, त्यांना घरे नाहीत का ? वगैर वगैरे. पण म्हणून त्यांना कीडा मूंगी समजावे आणि जरी चिरडले गेले तरी एव्हढा आरडा ओरड करायची काय गरज आहे हा सुर, बथ्थड झालेल्या संवेदशीलतेच उदाहरण आहे. बरेच लोक पद्पथ मोकळा असला तरी रस्त्यावरुनच चालतात मग त्यांची पर्वा न करता वाहने चालवावीत का? दारु पिउन दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असल्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा करायला हवी. वर एका प्रतिसादात "दारु" मुळे जास्त बोंब होते असे म्हटले आहे त्यातला सुर ती अनाठाई होते असा आहे तो चुकीचा आहे.

In reply to by मराठी_माणूस

अगदी हेच वरील प्रतिसादात म्हणण्याचा मी प्रयत्न केला आहे. एकदा दारु पिऊन गाडी चालवली की काहीही होऊ शकतं. त्यात ती मेलेली माणसं चुकीच्या जागी झोपलेली असणं, ती माणसे फुटपाथवर का होती? त्यांचे आयुष्य, कारुण्य, त्यांच्या समस्या, किंवा अन्य काही यामुळे मूळ दारु पिऊन चालवणे हा गुन्हा तीव्र किंवा सौम्य होऊच नये अशी सोय कायद्यात असावी. म्हणजे काय की कदाचित फुटपाथवर झोपलेल्या गरीब मजुरांऐवजी अत्यंत श्रीमंत घरातल्या अन्य एखाद्या गाडीत बसून घरी परतणार्‍या कुटुंबाला जऊन ही गाडी धडकली असती आणि तरी जीव गेले असते.. किंवा अलिस्टरच्याच गाडीत बसलेली आणखी सात सुखवस्तू पोरं ट्रकवर गाडी धडकून ठार झाली / जखमी झाली असती. यामुळे उगीच कोण आणि कसे मेले हे पाहण्यापेक्षा रूट कॉजला शिक्षा ठेवावी.. पिऊन गाडी चालवताना विना अपघात सापडला तरी ठराविक इतकी कैदच.. केवळ अपघात झाला नाही म्हणून दंड, जामीन, तोडपाणी नाही. अशा प्रेव्हेंटेबल चुकांमधे इव्हॅल्युएशन आणि शिक्षानिश्चिती गुन्ह्यावर अवलंबून ठेवावी, परिणामांवर नव्हे.

In reply to by गवि

भलेही त्याने खुन केले नसतील, पण ७ कुटुंबांचे जीवन कायमसाठी उद्ध्वस्थ केले आहे. मेलेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणुन कमीत कमी प्रत्येकी १ कोटी रुपयेतरी परेराकडुन वसुल करुन द्यायला हवेन. ते देताना परेरा कंगाल झाला तरी चालेल. तसेच त्याला पुढील १० ते २० वर्षे वाहन चालविण्यास प्रतीबंध असावा.

In reply to by नेत्रेश

''मेलेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणुन कमीत कमी प्रत्येकी १ कोटी रुपयेतरी परेराकडुन वसुल करुन द्यायला हवेन'' मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई ही मृताच्या उत्पनाच्या संदर्भाने असते, इथं भावनात्मक होउन काय उपयोग ? आणि मग एक एक कोटिच का, चांगले १०-१० कोटि द्या की. नुसतं असं जाहिर करा, बघा एक बॉडि क्लेम करायला १२ जण येतात की नाही ते. उद्या असे सात कोटि देउन परेराचं कुटुंब रस्त्यावर आलं, देशोधडीला लागलं तर त्यांना नुकसान भरपाई कोणी द्यायची / त्यांचं आयुष्य कोणी सावरायचं ?

In reply to by गवि

पिऊन गाडी चालवताना विना अपघात सापडला तरी ठराविक इतकी कैदच..
हे महत्त्वाचे आहे. पण गुन्ह्याला ठरलेली शिक्षा देण्यात सगळ्यात चुकार लोक कोण असतील तर भारतीय. दारू पिऊन गाडी चालवताना सापडल्यास इतर देशांमध्ये कैद/दंड तर होतोच शिवाय परवाना कायमचा रद्द होतो. दारू पिऊन अपघात केल्यास वर आणखी शिक्षा होते आणि ती जास्तीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. याबाबतीत तुमच्या वरच्या लाटाच्या लॉजिकशी सहमत नाही. लाटाची चप्पल दुकानाबाहेर पडताच तुटणे हा योगायोग असला तर तुमचे लॉजिक बरोबर आहे. पण चप्पल तुटेल हे माहित असूनही तुम्हाला विकली गेली तर ती फसवणूक ठरते आणि त्यासाठी दुकानदाराला शिक्षा झाली पाहिजे. दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे म्हणून त्याची एक शिक्षा आहेच आणि हे माहित असूनही गाडी चालवली आणि लोक जखमी केले किंवा मारले तर त्याची वेगळी शिक्षा पाहिजेच.

In reply to by नगरीनिरंजन

नाय रे.. लाटाचे उदाहरण दारु पिऊन वाहन चालवण्याशी तुलनेला नाही वापरले. स्पेसिफ़िकली एखाद्या गोष्टीचं "कॉन्सिक्वेन्शियल डॅमेज ठरवणं" कसे अशक्य आहे हे समजावण्यासाठी संबंध नसलेलं उदाहरण घेतलं आहे.

दारु पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा समजतात. मात्र अनावर झोप आलेली असताना वाहन चालवणे, ताप वा अन्य आजार आल्यामुळे ग्लानी येत असताना वाहन चालवणे हा तितकाच गंभीर गुन्हा समजला जायला पाहिजे पण तसे होत नाही. काही औष धांचेही तसेच परिणाम आहेत. निव्वळ दारुचे नाव बदनाम असल्यामुळे त्याविरुद्ध कायदे आहेत. बाकीच्या निष्काळजीपणाबद्दल कुठलीही शिक्षा नाही. खरे तर दोन्ही बाबतीत वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता सारखीच आहे. आणि नियंत्रण सुटल्यावर किती नुकसान होऊ शकते ह्याला काही मर्यादा नाही. (उदा. पेट्रोल पंपाला धडकून मोठी आग लागणे वगैरे) फूटपाथवर झोपणे बेकायदा असण्याचे कारण त्यामागे असणारा धोका हे आहे. वेगात जाणारी वाहने इतकी जवळ असताना फूटपाथवर झोपणे हे जोखमीचे आहे. तो कायदा धुडकावून तिथे कोणी झोपले तर त्याने तो धोका पत्करला आहे आणि त्याबद्दल सरकारने कोणतीही जबाबदारी उचलू नये. नको तिथे रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना अपघात झाल्यावर रेल्वेला जबाबदार धरता येईल का? नाही. तसेच हेही.

In reply to by हुप्प्या

> नको तिथे रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना अपघात झाल्यावर रेल्वेला जबाबदार धरता येईल का? नाही. तसेच हेही. मेलेले लोक रस्त्यावर झोपले नव्हते. रेल्वे जर रु़ळ सोडुन फलाटावर चढली आणी तीथे झोपलेले लोक मेले तर त्याला रेल्वे नक्कीच जबाबदार आहे. लोक फुटपाथवर काय करत होते (झोपले होते, उभे होते की बसले होते) हा प्रश्ण नसुन परेरा दारुच्या अंमलाखाली होता आणी गाडी चालविण्यास सक्षम नव्हता हा आहे. भलेही त्याने खुन केले नसतील व कायद्यानुसात ३ वर्षे शिक्षाच होउ शकत असेल, तरी त्याच्याकडुन मृतांच्या वारसांना कोट्यावधी रुपये नुकसान भरपाई मिळायला हवी. भलेही त्याच्यासाठी त्याचे घरदार विकावे लागले तरी चालेल.

In reply to by नेत्रेश

फुटपाथ ही झोपण्याची जागा म्हणून सर्वथा अयोग्य आहे. वेगाने जाणारी वाहने इतकी जवळ असताना तिथे झोपणे हे धोकादायक आहे. उच्चदाबाच्या विजेच्या तारेजवळ घरे बांधून झोपण्याइतकेच. किंवा कुठेही रेल्वे ट्रॅक ओलांडण्याइतकेच. सामान्यतः वाहने रस्ता सोडून धावत नाहीत पण तरीही अपघात घडलाच तर धोका कमी व्हावा म्हणून काही भाग संरक्षक कवच (बफर) म्हणून ठेवायचा असतो. फूट पाथ हा असाच बफर आहे. म्हणून तो धोकादायक आहे. चालणारी व्यक्ती निदान जागरुक असते, तिला अपघात टाळायला निदान थोडातरी चान्स आहे. झोपलेल्याला तसे काही नाही. त्यामुळे सरकार फूटपाथवर झोपणार्‍यांना थांबवू शकत नसेल तर सरकारने अशा लोकांच्या मृत्युबद्दल कोणतीही नुकसानभरपाई भरु नये. गरीब लोक फुटपाथवर झोपतात ह्याची कणव असेल तर त्याला वेगळे उपाय आहेत. स्वतः मदत करणे, सरकारकडून मदत मिळवून देणे वगैरे. त्यांच्या चुकीचे खापर ड्रायव्हरवर का फोडायचे? दारु पिऊन गाडी चालवली तर लायसन रद्द करा. त्याबद्द्दल फाशी वा जन्मठेप देणे सर्वथा गैर आहे.

In reply to by हुप्प्या

फुटपाथ ही झोपण्याची जागा हे कधीच अमान्य केले नाही. पण म्हणुन फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडण्याचे समर्थन कदापी करता येणार नाही (जे तुम्ही करत अहात). फुटपाथवरुन वॄद्ध, अंध, अपंग लोकही जात असतात ज्यांना फुटपाथवर चढणार्‍या वेगवान गाडीसमोरुन वेळेत बाजुला होणे अशक्य आहे. जर असे लोक चिरडले गेले तर तुम्ही चालकाला फाशी देणार काय? या प्रकारात सर्वस्वी मद्यधुंद चालकाचीच चुकी आहे आणी त्याची शीक्षा त्याला कायद्यानुसार मि़ळायलाच हवी. चिरडले गेलेले लोक काय करत होते हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. नुकसान भरपाई सरकारकडुन नव्हे तर त्या दोषी चालकाकडुनच व्हायला हवी.

In reply to by हुप्प्या

दारु पिऊन गाडी चालवली तर लायसन रद्द करा. त्याबद्द्दल फाशी वा जन्मठेप देणे सर्वथा गैर आहे. हे रुटीन चेकअप मधे सापडलं तरच ठीक...अन्यथा असे लोकं मारले गेले की जास्तीत जास्त शिक्षा व्हायलाच हवी. कुणी कुठे झोपायचं हा वेगळा प्रश्न आहे.

culpable == guilty - blameworthy - delinquent - reprehensible असे चार अर्थ गूगल करून मिळाले. सदोष म्हणजे मुद्दाम असा अर्थ नसावा. सदोष मनुष्यवध म्हणजे जो टाळता येऊ शकला असता असा. दारू पिऊन किंवा झोप येत असतानाही चालवलेली गाडी आणि त्यातून उद्भवलेली अपघातसदृष परिस्थिती दोष देण्यासारखी असावी. Driving is a Privilege, Not a Right. कोणाही उच्चपदस्थाला मोठे गुन्हे माफ केले जातात हे वाईट आहे.

या प्रकारात सर्वस्वी मद्यधुंद चालकाचीच चुकी आहे आणी त्याची शीक्षा त्याला कायद्यानुसार मि़ळायलाच हवी. चिरडले गेलेले लोक काय करत होते हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. नुकसान भरपाई सरकारकडुन नव्हे तर त्या दोषी चालकाकडुनच व्हायला हवी. हेच जर एखाद्या एस्टिमु़ळं झालं असतं तर काय म्हणाला असता, आणि तुमच्या म्हणण्यानुसार त्याला कायद्यानुसार शिक्षा मिळायला हवी हे मान्य पण मग त्याचा गुन्हा सुद्धा कायद्यानुसारच ठरायला हवा ना, मनुष्यवध करणे आणि अप्रत्यक्षरित्या मनुष्यच्या मृत्युला कारणीभुत होणे यात फरक आहे ना.

काय हो पारा, हा लेख लिहिताना तुम्ही थोडी घेउनच लिहिला होता की नै? खरं खरं सांगा!! अन शुद्धीत असताना असे मुर्खासारखे दारु पिउन चालवण्याला मान्यता देणारे असाल तर तुम्हालाच आठवडाभर "आत" टाकलं पाहीजे.

फुटपाथ हा फुट - पाथ म्हणजे पायी चालण्याचा मार्ग असतो. त्यावरून गाडी चालविणे (अपघात न करताही) गुन्हा मानला पाहीजे. दारू पिऊन गाडी चालविणे हा वरील गुन्ह्याची तिव्रता वाढवितो त्यात जर कोणाचा जीव गेला असेल (जागृत किंवा निद्रिस्त) तर गुन्ह्याची तीव्रता पराकोटीची मानली पाहिजे. पुण्यात पुर्ण शुद्धीत (?) असणारे मोटरसायकलवाले वाहतुक तुंबली की सरळ फुटपाथवर मोटरसायकली चढवून त्यावरून चालवितात. फुटपाथवर आपण सुरक्षित आहोत अशा विचारात चाललेल्या वृद्धांना, लहान मुलांना स्त्रियांना ह्या अचानक, फुटपाथवर, आलेल्या मोटरसायकलस्वाराचा धक्का लागतो. बाचाबाची होते. मोटरसायकल स्वार काही थांबत नाही, हाती लागत नाही. लागलाच तरी वृद्ध, लहान मुले, महिला त्याचे काही वाकडे करू शकत नाही. हे शुद्धीत असणारे तथाकथित सुशिक्षित आणि सुसंस्कृत (?) मोटरसायकलस्वार 'प्यायलेले' नसले तरी गुन्हेगारच आहेत. फुटपाथ चालण्यासाठी असतो. त्यावर झोपणे गैर मानून (गुन्हा न मानता) स्थानिक अधिकार्‍यांनी अशा लोकांना प्रतिबंध केला पाहीजे. तसेच, फुटपाथवर विक्री करणार्‍या लोकांवरही कडक कारवाई करून (तो गुन्हा मानून, कारण विनापरवाना विक्री करणे गुन्हा आहे) प्रतिबंध केला पाहिजे. फुटपाथवर विक्रेते बसल्यावर तिथेही गिर्‍हाईकांची गर्दी होऊन सामान्य नागरिकास फुटपाथवर चालणे दुरापास्त होऊन रस्त्यांवरून चालावे लागते. अशा माणसास वाहनाचा धक्का लागून अपघात झाला तर जबाबदार कोण? तिथले फुटपाथवरचे विक्रेते आणि त्यांच्यावर कारवाई न करणारे अधिकारी. पण कोणावरही कारवाई होताना दिसत नाही. कोणीतरी 'अण्णा हजारे' बनून उभे राहिल्याशिवाय राज्यकर्ते सक्रिय होणारच नाहीत का? ह्या सर्व अपघातांना हे राज्यकर्ते, स्थानिक अधिकारी वर्ग तितकेच जबाबदार आहेत असे मला वाटते.

लोकसंख्या नियंत्रण हा आज भारतासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अशावेळी सरकार काही देखील उपाय योजना करत नसताना, अलिस्टर परेरा सारखे लोक स्वतः समाजासाठी पुढे होऊन जर उपाय योजना करत असतील तर त्यांना उलट भारतरत्न किंवा गेला बाजार पद्मश्री वैग्रे देऊन गौरवायला हवे. ब्यारिस्टर परारा

In reply to by परिकथेतील राजकुमार

पेठांमधले लोक जुन्या काळात वावरत असतात असे म्हणतात ते काही खोटे नाही. ;) लोकसंख्या हा प्रश्न आहे असे म्हणण्याची पद्धत (इसवीसनाच्या) विसाव्या शतकात होती. एकवीसाव्या शतकात त्याला "प्रचंड मनुष्यबळ" असे म्हणून देशाचे बलस्थान म्हणण्याची पद्धत आहे. :P

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्याबरोबरच दारु पिउन देशाची आर्थिक घडी व्यवस्थीत बसवण्याचे काम पण अ‍ॅलिस्टर परेरा सारखी माणसं करत असतात त्यासाठी त्यांचा आणखी गौरव व्हायला हवा ;)

> त्याच्या हातून मनुष्यवध झाला, त्याने तो केला नाही. त्याचा हेतू त्या माणसांना मारण्याचा नसला तरी त्याच्या हातनं चुकीने का होईना ते मरण पावले म्हणूनच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावला आहे. जर प्लॅन करून एखाद्याला मारले असते तर खुनाचा गुन्हा लागला असता.

आग लागली होती असे दिसत आहे. आता इतकी मत-मतांतरे, वाद प्रतिवाद झाल्यावर मी काही लिहिणे म्हणजे तेच तेच परत लिहिल्यासारखे होईल. माझा मुद्दा इतकाच होता, किंबहुना अजूनही आहे. कि कायदा भावनिक नसतो, नसावा. एखाद्या गुन्ह्याची दिलेली शिक्षा ही त्या गुन्ह्याच्या प्रमाणे ठरवली जावी, त्याच्या परिणामांच्या प्रमाण नसावे. मूळ मुद्दा असा की, त्या व्यक्तीने रस्ता सोडून गाडी पदपथावर चढवली : गैर. तो काही कारणवशात गाडी चालवण्यास सक्षम नसताना (येथे दारू) त्याने गाडी चालवली : गैर. ह्याच दोन मुद्यांच्या आधारे ह्या दाव्याकडे पाहिलं जावं. (दारूबरोबरच इतर अनेक औषधे किंवा इतर काही माणसाला गाडी चालवण्यास अक्षम बनवतात त्याबद्दलही कायद्यात काहीतरी तरतूद असावी हे पूर्णपणे मान्य !)