प्रत्यक्षातला 'मोहन भार्गव'...
आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही.
सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प. आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकांचे फारसे लक्ष न गेलेली एक बातमी मनात घर करून राहिली.-
"'नासा'त काम केलेला अठ्ठावीस वर्षांचा एक तरुण संशोधक दूर कुठेतरी बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात पांगराडोळे तहशीलातून बुलढाणा जिल्हा परिषदेवर निवडून आला."
कोण आहे हा वेडपट मनुष्य? असा एक प्रश्न चटकन मनात उभा राहिला म्हणून जालावर शोधले तर त्याच्याबद्दल विकीपासून सर्वत्र असलेली माहिती मिळत गेली. कदाचित चुकून दिलेली परवानगी असेल पण 'पब्लिक' असलेली गूगल+(पिकासा)वरची त्याची अमेरिकेतील प्रकाशचित्रेही पहायला मिळाली.
आणि मग भावी पिढीला आदर्श ठरू शकेल असे एक व्यक्तिमत्त्व समोर उभे रहात गेले - "बाळासाहेब दराडे".
एका लेखात सामावणारे हे व्यक्तीमत्त्व नाही याची जाणीव आहे. अगदीच थोडक्यात सांगायचे तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराजवळील परडा दराडे नावाच्या एका लहानशा गावात जन्म झालेला हा मुलगा औरंगाबादला नेहरू इंजिनियरिंग कॉलेजमधून २००५ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाला. इथे भारतात कॉग्निझंट सारख्या कंपनीत काही काळ नोकरी करून तो युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी मधून एम.एस. (इलेक्ट्रिकल) झाला. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान समजल्या जाणार्या नॅनोटेक्नॉलॉजीवर (मेम्स) काम करताना नासाच्या 'मार्स रोव्हर' प्रोजेक्टमध्ये सोलर सेल्स संशोधनाचे काम करण्याची त्याला काही काळ संधी मिळाली. Research Student at Spintronics and Vacuum Nanoelectronics Lab, Uni of Cincinnati असणे म्हणजे काय- ते आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. तिथले त्याचे भावी जीवन अगदी सुखावह झाले असते याबद्दल शंकाच नाही. चटकन वेध घेणार्या हिरव्या डोळ्यांचा हा उमदा तरूण तिथेच अमेरिकेत राहिला असता तर... तर भविष्यात त्याला काय काय करणे आणि होणे शक्य होते त्याची आपण कल्पना करू शकतो.
ते सारे ठोकरून तो परत का आला? याचे कारण एपीजे अब्दुल कलाम? की आण्णा हजारे? की श्रीश्री रविशंकर? की आपल्या गावातल्या माणसांसाठी काहीतरी चांगले केले पाहिजे ही लहानपणापासूनची प्रामाणिक इच्छा? कसेही असो. त्याला गावाकडे परत यावेसे वाटले. ज्या निवडणुकांना आम्ही नाके मुरडतो, मतदानालाही जात नाही अशा निवडणुकीत तो अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिला. पैसा आणि 'पार्टी' या दोहोंचे पाठबळ नसताना अनेक अनुभवी राजकारण्यांना धूळ चारून निवडून आला. सिनसिनाटी युनिव्हर्सीटीत 'आर्ट ऑफ लिविंग' चा प्रचार करणारा आणि आणा हजारेंच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणारा हा ध्येयवादी तरूण निवडून येतो ही घटना अत्यंत आशादायक आहे.
या ध्येयवादी तरुणाची भारताच्या राजकारणात चांगल्या अर्थाने भरभराट होवो आणि त्याच्या गावाला, त्याच्या जिल्ह्याला, त्याच्या राज्याला आणि त्याच्या देशाला एक चांगला नेता मिळो ही सदिच्छा.

वाचने
7073
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
है शाबास! विसुनाना, हे आशादायक वृत्त प्रसारित करण्याबद्दल आभार!
वा!
धन्यवाद
एकदम मस्त! भारी वाटलं.
जब्रा.
हम्म....
In reply to हम्म.... by मन१
ह्म्म
वा! छान बातमी! मस्तच वाटलं वाचून.
वा!
बातमी छानच पण अक्षरक्षः
धन्स विसुनाना........
अभिनंदन...
या ध्येयवादी तरुणाची
लागली होती बातमी..पण आज डिटेल
शुभेच्छा.
अभिनंदन आणि अभिनंदन, पण
In reply to अभिनंदन आणि अभिनंदन, पण by ५० फक्त
तुम्हाला फार फरक पडणार नाही
मोठा डिसिजन आहे हा.
बाळासाहेबांना हार्दिक
खुप कौतुक वाटतंय.
वसन्त गोवारीकर हेच मोहन भार्गव
थोड जास्तच होतय.
अश्या ध्येयवादी तरुणांकडून
कुछ तो बात है.
धन्यवाद/ चर्चा सुरू रहावी
दराडे प्रत्यक्षातले मोहन
सर्व उत्तम आहे.. आणि