मजेदार कोडी.....

स्वातीविशु's picture
स्वातीविशु in जनातलं, मनातलं
18 Feb 2012 - 12:52 pm

आपल्या रोजच्या जीवनात अनेक माणसे भेटतात. असेच माझ्या एका मैत्रिणीची आईने आम्हाला काही जुनी ग्रामीण कोडी सांगितली होती. सोडवा बरे.....

१.) हुमान हुमनी नाकात चिमणी.

२.) इवलेसे झाड त्याला घुंगरांचा भार.

३.) वरुन चालतो तांगडतिंगा, खालून चालतो धांगडधिंगा, मधल्या नारीचे नाव काय सांगा?

तुमच्याकडे असलेली कोडी पण सांगा बरे का.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ.श्रीराम दिवटे's picture

18 Feb 2012 - 1:00 pm | डॉ.श्रीराम दिवटे

तिसऱ्‍या कोड्याचे उत्तर चपाती असावे!

डॉ.श्रीराम दिवटे's picture

18 Feb 2012 - 1:07 pm | डॉ.श्रीराम दिवटे

सोडवा-
१. काळ्या रानात उभी तलवार
२. कान असून बहिरा
३. डोळे असून आंधळा
४. इवलीशी बकू तिला काजळ कुकू
५. हसता येईना दात वाकडे

डॉ. दिवटेंनी प्रतिसाद दिला रे SSSSSSSSSSSSSSS

धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर ............ होहोहोहोहो!

तेजायला! प्रश्नच आहेत की हे पण! उत्तर नव्हे. :(

अन्नू's picture

20 Feb 2012 - 7:26 pm | अन्नू


हा डॉक्टरांचा प्रतिसाद मीच पहील्यांदा पाहीला होता. परंतु त्यावेळी माझी बोलती बंद झाली होती, कारण मला वाटले मला डोळे आले की काय! म्हणून त्या दिवसापासून डोळ्यांची वेगवेगळी तपासणी करीत होतो..

स्वातीविशु's picture

18 Feb 2012 - 1:14 pm | स्वातीविशु

२. कान असून बहिरा - "चहाचा कप"

३. डोळे असून आंधळा - "बटाटा" असेल कदाचित.

वपाडाव's picture

20 Feb 2012 - 4:01 pm | वपाडाव

३. डोळे असून आंधळा - "बटाटा" असेल कदाचित.

'ऊस'ही असु शकतो...

डॉ.श्रीराम दिवटे's picture

18 Feb 2012 - 2:10 pm | डॉ.श्रीराम दिवटे

काळ्या रानात उभी तलवार म्हणजे केसांत मधोमध पाडलेला भांग.
डोळे असून आंधळे सिताफळ.
इवलीशी बकू तिला काजळ कुकू म्हणजे गुंजा.
हसता येईना दात वाकडे म्हणजे तिफन किंवा तीन दातांचा नांगर!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2012 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा

हे ओळखा पाहू...!

१)हिच्यासह मला फिरण्याचा छंद...पण लोकांमधे गेलो की बोल्ती बंद...!

२)जानवं असुन अवैदिक...!

३)मार्मिक असुनही अवांतर...!

४)खाचेत कार्डं,,,दातात पैसे...!

अन्नू's picture

20 Feb 2012 - 7:36 pm | अन्नू

हिच्यासह मला फिरण्याचा छंद...पण लोकांमधे गेलो की बोल्ती बंद...!

= बायको!

मार्मिक असुनही अवांतर

वरच्या उत्तराच्या विरुद्द = नवरा! ;)

हिच्यासह मला फिरण्याचा छंद...पण लोकांमधे गेलो की बोल्ती बंद...!

गुर्जींची Activa / गाय छाप तंबाकू

जानवं असुन अवैदिक...!

नाय महित ब्वा

मार्मिक असुनही अवांतर...!
मिपा ;)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2012 - 2:22 pm | अत्रुप्त आत्मा

@मार्मिक असुनही अवांतर...!
मिपा

५० फक्त's picture

18 Feb 2012 - 3:34 pm | ५० फक्त

@मार्मिक असुनही अवांतर...! = शिल्पा ब यांचे प्रतिसाद.

प्रचेतस's picture

18 Feb 2012 - 3:50 pm | प्रचेतस

अवांतराबद्दल सहमत, पण मार्मिकतेबद्दल शंका आहे.

स्पा's picture

18 Feb 2012 - 3:56 pm | स्पा

अवांतराबद्दल सहमत, पण मार्मिकतेबद्दल शंका आहे.
कोणाच्या हो वल्ली भाऊ
सांगा ना

प्रचेतस's picture

18 Feb 2012 - 4:04 pm | प्रचेतस

विचार तर करा.
असे एकदम घायकुतीला येऊ नका.

मा. श्री. स्पाजी कधीपासुनच घा यकु तीला आलेत, आता याबद्दल तुम्हाला काय सांगायचं म्हंजे , परत त्यात त्या क्रोशाच्या धाग्यावर रेवतीआजीनी ओपन ऑफर दिली आहे, त्यात माझी सुद्धा व्यनिमधली ऑफर आहेच अजुन,

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 2:03 pm | अत्रुप्त आत्मा

@शिल्पा ब यांचे प्रतिसाद.>>> मेलो

चौकटराजा's picture

18 Feb 2012 - 6:27 pm | चौकटराजा

आमच्या लहान पणीचे काही -

१) एवढीशी डबी त्यात छुन्नक छैय्या , उघडून पहाते तो अगग्गो बय्या
२) अक्कर चक्कर मक्कर त्याला अन्नास पन्नास दारं माझं कोडं ओळखेल त्या देईन पुणं सारं

अन्नू's picture

20 Feb 2012 - 7:48 pm | अन्नू

एवढीशी डबी त्यात छुन्नक छैय्या , उघडून पहाते तो अगग्गो बय्या

सानिकास्वप्निल यांच्या किचनमधला पाकृचा डबा! Smiley

१) एवढीशी डबी त्यात छुन्नक छैय्या , उघडून पहाते तो अगग्गो बय्या
२) अक्कर चक्कर मक्कर त्याला अन्नास पन्नास दारं माझं कोडं ओळखेल त्या देईन पुणं सारं

निवेदिता-ताई's picture

18 Feb 2012 - 9:45 pm | निवेदिता-ताई

राजकन्येने विणला शेला
गुंडाळता येईना पसरत गेला..!!!!!!

निवेदिता-ताई's picture

18 Feb 2012 - 9:48 pm | निवेदिता-ताई

डोळे असून आंधळा.....नारळ

हुमान हुमनी नाकात चिमणी......तपकीर हे उत्तर असावे बहुतेक