प्रेरीत

अज्ञातकुल जे न देखे रवी...
आकाशीचे मन कोरे निरभ्र होते चांदणे सुखावत होते रज कैफाने झाडाआडुन मी होतो वेधत खेळ ऐहिकाचा पाऊल टाकले क्षितिजावर चंद्राने ती भोर सावळ्या चतुर्दशीची होती डौलात ठाकली कोर; पोर सगुणा जणु होती पाहून ऐट चुकले ठोके हृदयाचे एव्हाना ती आरूढ काळजावरती झाली होती आभास नव्हे; हा श्वास खास जगण्याचा ही साद अशी की अंतर्नाद सणाचा अचरासह चर ऐशा किमयेचा शेला मी साक्ष एक; प्रेरीत नित्य; ह्या नव्या युगाचा ........................अज्ञात
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

3 टिप्पण्या 1,152 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

ती भोर सावळ्या चतुर्दशीची होती डौलात ठाकली कोर; पोर सगुणा जणु होती पाहून ऐट चुकले ठोके हृदयाचे एव्हाना ती आरूढ काळजावरती झाली होती
..............!!

शुचि नवीन

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अप्रतिम!!!