Skip to main content

गंमत शब्दांची ( रंगपचमी धमाल).

लेखक कलंत्री
Published on रवीवार, 04/03/2012
रंग आणि शब्दांची धमाल करुन आपल्या भाषेतील असणार्‍या अनेक शब्दातील रंग असलेला शब्द ओळखू या. १. एक वाद्य - - - रं ग. २. एका रागाचे नाव - रंग. ३. मन / अंतःकरण - - रंग. ४. बु ध्दीबळाचा खेळ याचे एक नाव - - रंग. ५. निपुण, कुशल, वाकबगार - रंग - ६. हाताच्या / पायाच्या शेवटच्या बोटाचे नाव - रंग - ७. घोडा - रंग - ८. विष्णु, कृष्ण -रंग -- ९. हनुमान --रंग -- १०. त्वचेमधील असणारे द्रव्य रंग-- ११. नाट्यगृह रंग---, रंग--- १२. रांगोळीचे चित्र रंग-- १३. अनुवाशिंक गुणांचे संक्रमण या मुळे होते रंग-- १४. रंग देण्याच्या कामाची मजूरी रंग--- १५. भाताची एक जात -रंग- : साभार लोकसत्ता.

वाचन संख्या 6945
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

१. एक वाद्य :ज ल त रं ग. २. एका रागाचे नाव - रंग. ३. मन / अंतःकरण : अंत रंग. ४. बु ध्दीबळाचा खेळ याचे एक नाव - - रंग. ५. निपुण, कुशल, वाकबगार : पा रंग त ६. हाताच्या / पायाच्या शेवटच्या बोटाचे नाव : क रंग ळी ७. घोडा - रंग - ८. विष्णु, कृष्ण -रंग -- (श्रीरंग?) ९. हनुमान: ब ज रंग ब ली १०. त्वचेमधील असणारे द्रव्य :रं ग द्र व्य ११. नाट्यगृह: रं ग मं दि र, रं गा य त न १२. रांगोळीचे चित्र: रं गा व ली / रं ग चि त्र १३. अनुवाशिंक गुणांचे संक्रमण या मुळे होते रंग-- १४. रंग देण्याच्या कामाची मजूरी रंग--- १५. भाताची एक जात -रंग-

२. एका रागाचे नाव सारंग. (अर्थात ही रागिणी आहे) ४. बुध्दीबळाचा खेळ याचे एक नाव चतुरंग. ७. घोडा - रंग - (तुरग?) ८. विष्णु, कृष्ण -रंगनाथ १३. अनुवाशिंक गुणांचे संक्रमण या मुळे होते रंगसूत्रे? १४. रंग देण्याच्या कामाची मजूरी रंग---? १५. भाताची एक जात -रंग-?

In reply to by प्रास

१३. अनुवाशिंक गुणांचे संक्रमण या मुळे होते रंगसूत्रे?
रंगसूत्रे कि गुणसुत्रे??

In reply to by अन्या दातार

मुळात गुणसूत्रेच पण कदाचित 'रंग' (वर्ण) या अनुवंशिक गुणांचे संक्रमण 'रंगसूत्रे' करत असावी.... ;-)

In reply to by प्रास

नको नको. लाडका नातू आहे तो. याशिवाय दाखवण्याच्या कार्यक्रमाला मुलीला समजलं की हा मार खाऊ शकतो तर लगेच पसंती येईल.;)

कालच्या दै. सकाळच्या बालमित्र पुरवणी मध्ये हे शब्द्कोडे वाचल्याचे स्मरते आहे. स्वतःच्या नावावर का खपवल्या जात आहे?

In reply to by प्यारे१

मी कालच्या लोकसत्ताच्या अंकात हे वाचले आणि उत्तरे यांचा स्त्रोत लोकांना मिळु नये म्हणून संदर्भ टाकला नाही. बाकी स्त्रोत किंवा साभार म्हणून वर्तमानपत्राचा दाखला देता आला असता. धन्यवाद.