नाते प्राजक्ताचे
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले.
अरे देवा! आता पुन्हा पाचा वर जावून शून्यावर यायचे.जाऊ द्या थोडं भिजल्याने काय होणार आहे ?
मिसळपाव